शुक्रवार, १५ मे, २०२६
धार येथील 'भोजशाळा' हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला ऐतिहासिक यश
धार येथील 'भोजशाळा' हे हिंदू मंदिरच;
मंदिरमुक्तीच्या लढ्याला ऐतिहासिक यश
- नवलकिशोर शर्मा, हिंदू जनजागृती समितीची प्रतिक्रिया
इंदूर, १५ मे
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक 'भोजशाळा' हिंदूंचेच पवित्र श्री वाग्देवी (श्री सरस्वती) मंदिर आहे, यावर इंदूर उच्च न्यायालयाने कायद्याची आणि पुराव्यांची मोहर उमटवली आहे. हा निकाल म्हणजे केवळ एका वास्तूचा विजय नसून शतकानुशतके दडपल्या गेलेल्या ऐतिहासिक सत्याचा आणि परकीय इस्लामी आक्रमकांनी अतिक्रमित केलेल्या मंदिरांच्या मुक्ती लढ्याचा भव्य विजय आहे, अशी प्रतिक्रिया भोजशाळा मुक्ती आंदोलनाचे प्रमुख नवलकिशोर शर्मा आणि हिंदू जनजागृती समितीने व्यक्त केली आहे.
धार येथील भोजशाळेच्या मुक्तीसाठी हिंदू जनजागृती समितीने केवळ रस्त्यावर आंदोलने केली नाहीत, तर राष्ट्रीय स्तरावर व्यापक जनजागृती केली. गोवा येथे होणाऱ्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) या राष्ट्रीय व्यासपीठावरून दरवर्षी या संदर्भात कायदेशीर आणि धोरणात्मक ठराव मंजूर करून लढ्याची दिशा ठरवली. देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मध्यप्रदेश सरकार आणि केंद्र सरकारकडे याविषयी सातत्याने दाद मागितली. न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावनांना आणि समितीच्या प्रदीर्घ आंदोलनाला न्याय मिळाला असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितले.
भारतातील हिंदूंची केवळ एक-दोन देवस्थाने आक्रमित झालेली नाहीत. तर परकीय आक्रमकांनी आणि धार्मिक कट्टरतावाद्यांनी हिंदूंच्या सहिष्णुतेचा फायदा घेऊन हजारो मंदिरांवर अनधिकृतपणे अतिक्रमणे केली आणि त्यावर स्वतःचा खोटा अधिकार सांगितला. अयोध्या आणि धार (भोजशाळा) येथील निकालांनी हे सिद्ध केले आहे की, असत्याचा बुरखा फार काळ टिकत नाही. आता काशीच्या ज्ञानवापीपासून ते मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीपर्यंतची सर्व आक्रमित क्षेत्रे मुक्त करण्याची वेळ आली आहे, असेही हिंदू जनजागृती समितीकडून सांगण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव? शेखर जोशी राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महो...
-
सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने बाप्पाला निरोप! - डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूक डोंबिवली, दि. ७ ...
-
'आवाज'चा अमृत महोत्सव! शेखर जोशी 'विनोदी वार्षिक' असे बिरूद मिरविणाऱ्या 'आवाज' या वार्षिकाचा यंदाचा दिवाळी अंक ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा