धर्म/अध्यात्म/ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धर्म/अध्यात्म/ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ६ जून, २०२५

हिंदुद्वेषी एम्.एफ्. हुसेन यांच्या मुंबईतील चित्रांच्या लिलावावर बंदी घाला - हिंदू जनजागृती समितीची मागणी

हिंदुद्वेषी एम्.एफ्. हुसेन यांच्या मुंबईतील चित्रांच्या लिलावावर बंदी घाला - हिंदू जनजागृती समितीची मागणी मुंबई, ६ जून भारतमातेचे ‘रेप ऑफ इंडिया’नावाने अत्यंत विकृत, बिभत्स, नग्न व अश्लील चित्र रेखाटणारे वादग्रस्त चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव मुंबईत येत्या १२ जूनला होणार आहे. या लिलावावर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि हुसेन यांच्या गुन्हेगारी कृत्याचे उदात्तीकरण बंद केले जावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.‌ या प्रकरणी समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती याच्यासह मुंबईचे जिल्हाधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सादर केलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.‌ एम.एफ. हुसेन यांनी '२६/११' हल्ल्च्यायाच्या वेळी ‘रेप ऑफ इंडिया’ नावाच्या चित्रात भारतमातेचे नग्न व अपमानास्पद चित्र साकारून त्यांनी देशद्रोहाची परिसीमा गाठली. दुसऱ्या एका चित्रात भारतमातचे नग्न चित्रण काढून त्यावर विविध शहरांची नाव लिहिलेली दाखविली होती. माता सरस्वती, माता पार्वती, माता गंगा, माता यमुना आदी देवीदेवतांचे जाणीवपूर्वक विकृत, नग्न व अश्लील चित्रण करून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा त्यांनी अपमान केला असल्याचे समितीचे म्हणणे आहे. अशा अपमानास्पद चित्रांच्या विरोधात हुसेनविरोधात देशभरात १ हजार २५० हून अधिक पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. देशभरातही त्यांच्या प्रदर्शनांना विरोध झाला आणि अखेर हुसेन यांनी भारतातून पलायन करून कतारचे नागरिकत्व स्वीकारले होते. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव म्हणजे त्यांच्या आधीच्या राष्ट्रविरोधी व समाजविघातक कृत्यांना अप्रत्यक्षपणे समर्थन देणे होय. ‘कलात्मक स्वातंत्र्य’ या नावाखाली धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि देशविघातक व्यक्तींचे गौरव करणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही, असे समितीने या निवेदनात म्हटले आहे.‌ दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयाने हुसेन यांच्या प्रदर्शनातील चित्रे जप्त करण्याचे आदेश दिले असून त्याची चौकशी चालू आहे. यापूर्वी देशभरात हुसेन यांच्या अनेक चित्रप्रदर्शनांना विरोध झालेला आहे. ती प्रदर्शने रद्द झालेली आहे. हुसेनच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारही रद्द करण्यात आले आहेत. आणि त्यामुळे हुसेन यांच्या चित्रांचा प्रस्तावित लिलाव व विक्री त्वरित थांबवावी आणि त्यावर कायदेशीर बंदी घालावी. तसेच या चित्रांचे प्रदर्शन किंवा विक्री करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा कला दालनांवरही कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

कल्याण येथे हिंदू अस्मिता एकत्रीकरण – हिंदू मंचतर्फे आयोजन

कल्याण येथे हिंदू अस्मिता एकत्रीकरण – हिंदू मंचतर्फे आयोजन कल्याण, दि. ६ जून हिंदू मंचतर्फे शनिवार, ७ जून रोजी कल्याण येथे दुर्गाडी किल्ला विषयासंदर्भात हिंदू अस्मिता एकत्रीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
७ जून रोजी सकाळी सहा वाजता सर्व हिंदुत्ववादी संस्थां, संघटना, नागरिकांनी टिळक चौक, कल्याण (पश्चिम) येथे उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू मंचाचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी केले आहे.‌ किल्ले श्री दुर्गाडी आपल्या अस्मितेचा प्रश्न असून त्याबाबत आपण जागृत आहोत. गेली अनेक वर्षे एकत्र येऊन याबाबत संघर्ष करत असल्याचे हिंदू मंचचे म्हणणे आहे.

गुरुवार, ५ जून, २०२५

अयोध्येतील श्रीराम मंदिरात राम दरबारची प्रतिष्ठापना

अयोध्येतील श्रीराम मंदिरात राम दरबारची प्रतिष्ठापना अयोध्या, दि. ५ जून अयोध्येतील श्रीराम मंदिरात गुरुवारी राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात अन्य साद देवळात विविध देवतांचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राम दरबारात श्रीराम, सीता, लक्ष्मण, शत्रुघ्न, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाची मूर्ती असून पहिल्या मजल्यावर राम दरबारची स्थापना करण्यात आली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. या सोहळ्यात राम मंदिर परिसरात शेषावतार, भगवान शंकर, गणपती, मारुती, सूर्य, भगवती देवी आणि अन्नपूर्णा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.