शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

चतुरंग प्रतिष्ठानची सवाई एकांकिका स्पर्धा

राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या एकांकिकांची 'चतुरंग सवाई' स्पर्धा - ३, ४ जानेवारीला प्रवेश अर्ज स्वीकारणार - १०, ११ जानेवारीला प्राथमिक फेरी - २५ जानेवारीला अंतिम फेरी मुंबई, दि. २ जानेवारी नाट्यक्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानच्या सवाई एकांकिका स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या एकांकिकाच स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी होऊ शकतात. चतुरंग प्रतिष्ठानच्या सवाई एकांकिका स्पर्धेचे यंदा ३७ वे वर्ष असून स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीसाठीचे प्रवेश अर्ज येत्या ३ आणि ४ जानेवारी २०२६ या दोन दिवसातच स्वीकारले जाणार आहेत. प्राथमिक फेरी येत्या १० आणि ११ जानेवारी रोजी होणार असून प्राथमिक फेरीतून निवडण्यात येणाऱ्या सात एकांकिकांची अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेचे पूर्ण भरलेले प्रवेश अर्ज आवश्‍यक त्या कागदपत्रांसहित येत्या तीन आणि चार जानेवारी रोजी दुपारी चार ते आठ या वेळेत चतुरंग प्रतिष्ठान, डी /ई, माहीमकर बिल्डिंग, बांगडवाडी, गिरगाव, मुंबई- ४००००४ येथे स्वीकारले जाणार आहेत. सवाई एकांकिकेचे माहितीपत्रक, नियमावली, प्रवेश अर्जासाठी संबंधितांनी chaturang1974@gmail.com या ई मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठानने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: