गुरुवार, १ जानेवारी, २०२६

ध्वजारोहण, ग्रंथदालन, कवी कट्टा प्रकाशन कट्टा उदघाटनाने ९९ व्या साहित्य संमेलनाची सुरुवात

ध्वजारोहण, ग्रंथदालन, कवी कट्टा प्रकाशन कट्टा उदघाटनाने ९९ व्या साहित्य संमेलनाची सुरुवात सातारा, १ जानेवारी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गुरुवारी संमेलनस्थळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रंथदालन, कवी कट्टा प्रकाशन कट्ट्याच्या उदघाटनाने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. साताऱ्यातील ऐतिहासिक शाहू स्टेडियमवर हे संमेलन भरविण्यात आले आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.‌ साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन दालनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. तर नियोजित संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत कविकट्टा, गझलकट्टा आणि प्रकाशन कट्ट्याचे उदघाटन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: