गुरुवार, १ जानेवारी, २०२६

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांची 'साहित्य दिंडी'!

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांची 'साहित्य दिंडी'! सातारा, दि. १ जानेवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संमेलनासाठी सातारा दाखल होण्यापूर्वी पुणे, सातारा, सांगली येथील साहित्यिकांच्या निवासस्थानी आणि स्मारकाला भेट दिली. सातारा येथे आजपासून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांच्या या भेटीमध्ये विश्वास पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट दिली आणि त्यांना अभिवादन केले. सातारा जिल्ह्यातील आणि खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळाला तसेच आधुनिक मराठी कवितेचे जनक बासी मर्ढेकर यांच्या मरडे येथील स्मारकाला भेट दिली. बुधवारी सकाळी पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र येथे जाऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांना नंतर रेठरे हरणाक्ष येथे लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जन्म व तिला भेट दिली. तसेच साताऱ्या त आगमन होण्याआधी पाटील यांनी कराड येथे प्रीती संगमावर जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला आदरांजली वाहिली.‌ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या नंतर पाटील यांनी मुंबईत आचार्य अत्रे यांच्या स्मारकाला तसेच घाटकोपर येथील शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला तसेच कादंबरीकार रवा दिघे आणि नाटककार कवी विवाह शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या स्मारकालाही भेट देऊन अभिवादन केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: