बुधवार, २८ जानेवारी, २०२६
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे 'सागरा प्राण तळमळला' कार्यक्रम
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे
'सागरा प्राण तळमळला' कार्यक्रम
डोंबिवली, दि. २८ जानेवारी
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या डोंबिवली आणि नागपूर शाखेतर्फे येत्या ८ फेब्रुवारी रोजी 'सागरा प्राण तळमळला' या सांगितीक अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. शुभा साठे यांनी कार्यक्रमाचे लेखन केले असून दिग्दर्शन डॉ. अनिकेत मुनशी यांचे तर पार्श्वसंगीत शशांक साठे यांचे आहे. कार्यक्रमात शुभा साठे, अनिकेत मुनशी यांच्यासह
डॉ. अनुराधा मुनशी, प्रा. गौरव गोंधळेकर, स्वाती गोंधळेकर, सुश्रुत मास्टे सहभागी होणार आहेत.
संध्याकाळी पाच वाजता सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. कुळकर्णी ब्रदर्स, डोंबिवली पूर्व, सुयोग मंगल कार्यालय यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमासाठी लाभले असून डोंबिवलीत होणारा हा सहावा प्रयोग आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
-
राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव? शेखर जोशी राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महो...
-
ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे ही छायाचित्रे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील आहेत. छ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा