मंगळवार, २७ जानेवारी, २०२६
श्री समर्थ सेवा मंडळातर्फे दासनवमीनिमित्त सज्जनगडावर विविध कार्यक्रम
श्री समर्थ सेवा मंडळातर्फे दासनवमीनिमित्त
सज्जनगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन
- २ ते ११ फेब्रुवारी दरम्यान दासबोध पारायण, प्रवचन,
कीर्तन आणि संगीत गायन, वादनाचा समावेश
मुंबई, दि. २७ जानेवारी
सातारा- सज्जनगडयेथील श्री समर्थ सेवा मंडळतर्फे दासनवमीनिमित्ताने येत्या २ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत सज्जनगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्रीमद् ग्रंथराज दासबोध पारायण, प्रवचन सेवा, कीर्तन सेवा, संगीत गायन सेवा इत्यादींचा समावेश आहे. संगीत गायन सेवेत एकल तबला, सतार, व्हायोलिन वादन तसेच शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन होणार आहे.
२ ते ११ फेब्रुवारी यादरम्यान सकाळी ८ ते १०.३० या वेळेत समर्थभक्त वैशंपायनबुवा रामदासी, समर्थभक्त डॉ. रसिका ताम्हणकर हे श्रीमद् ग्रंथराज दासबोध पारायण करणार आहेत तर सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत विविध मान्यवरांचे प्रवचन होणार आहे. यात २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत प्रा. अजित कुलकर्णी, ५ फेब्रुवारीला रवींद्र पाठक आणि ६ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत गुरुनाथ महाराज कोटणीस सहभागी होणार आहेत.
दररोज दुपारी ४ ते ६ या वेळेत कीर्तन सेवा सादर होणार आहे. २ व ३ फेब्रुवारीला कीर्तनकौस्तुभ हभप श्यामबुवा धुमकेकर (नागपूर), ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी हभप लक्ष्मीप्रसाद पटवारी कुलकर्णी (माजलगाव), ६ व ७ फेब्रुवारीला हभप नंदकुमार कर्वे बुवा, ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय कीर्तनकार हभप डॉ. चारुदत्त आफळे बुवा (पुणे), ९ आणि १० फेब्रुवारीला समर्थ भक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी (पुणे) यांचे कीर्तन सादर होणार आहे.
२ ते १० फेब्रुवारी या कालावधीत संध्याकाळी साडेसहा वाजता विविध कलाकार, वादक, गायक संगीत गायन सेवा सादर करणार आहेत. २ फेब्रुवारीला लालगुडी कृष्णन यांचे एकल कर्नाटकीय व्हायोलिन वादन होणार आहे. ३ फेब्रुवारीला पं. जयंत केजकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. ४ फेब्रुवारीला अभयसिंह वाघचौरे यांचे गायन, राघव नरेवाडीकर यांचे तबला, स्वानंद राजोपाध्ये यांचे हार्मोनिअम वादन होणार आहे.
५ ते १० फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या संगीत गायन सेवेत
अमेय कारुळकर, श्रेयस व्यास, अभिनव जोशी, गणेश मिस्त्री, सुशील गद्रे, उदय गोखले, श्रद्धा जोशी, श्रुती गोडबोले, सुहास चितळे, गणेश मेस्त्री, निबंध कानिटकर, हर्षल काटतरे सुशील गद्रे, उदय गोखले, राजेश्री वैरागकर, अजिंक्य पोंक्षे, पुर्वा पेठे, सावनी दातार, सुभाष परवार, कल्याणी देशपांडे, अद्वैत काशीकर, तनय रेगे, विघ्नेश जोशी, पं. राम देशपांडे, गंधार देशपांडे, अभिजीत बारटक्के हे गायक, वादक, निवेदक सहभागी होणार आहेत.
दासनवमी उत्सवानिमित्त होणा-या या विविध कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन, श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष अच्युतराव गोडबोले, कार्यवाह योगेशबुवा रामदासी, खजिनदार अभ्यंकरबुवा रामदासी यांनी केले आहे.
शेखर जोशी
२७ जानेवारी २०२६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
-
राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव? शेखर जोशी राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महो...
-
ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे ही छायाचित्रे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील आहेत. छ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा