शनिवार, २८ जानेवारी, २०२३
संस्कृत राजभाषा व्हावी' असे सांगणारे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे अभिनंदन
शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३
ओम सदगुरू प्रतिष्ठानतर्फे श्रीगुरुचरित्र पारायण सप्ताह
सोमवार, २३ जानेवारी, २०२३
सुट्टीच्या फक्त आठवणी उरल्या- बाळासाहेब ठाकरे
रविवार, २२ जानेवारी, २०२३
'बाप पळविणा-या टोळीला' उघडे पाडण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी गमावली
शनिवार, २१ जानेवारी, २०२३
समाजशास्त्रीय संशोधक ग्रंथकार- नारायण गोविंद चापेकर
महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लसमधील लेखमालिका. यातील दुसरा लेख. आजच्या ( २१ जानेवारी २०२३) च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. विस्मरणातील बदलापूरकर
समाजशास्त्रीय संशोधक ग्रंथकार
नारायण गोविंद चापेकर
शुक्रवार, २० जानेवारी, २०२३
व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांक
कथाकार, कादंबरीकार, नाटककार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांच्यावर ग्रंथसखा प्रकाशनाने 'व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांक' प्रकाशित केला आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी स्वतः लिहिलेले, व्यंकटेश माडगूळकर यांनी अन्य काहीजणांविषयी लिहिलेले आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यावर लिहिलेले लेख असे या ग्रंथाचे स्वरूप आहे.
माडगूळकर यांनी लिहिलेली पहिली कथा जुलै १९४६ मध्ये 'अभिरुची'त प्रसिद्ध झाली होती. ती संपूर्ण कथा या ग्रंथात देण्यात आली आहे. या कथेचे नाव 'काळ्या तोंडाची' असे होते. माडगूळकर यांनी लिहिलेल्या 'बनगरवाडी'चा बहुतांश भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी, जर्मन आदि भाषांमध्ये अनुवाद झाला. 'माणदेशी माणसे' आणि 'बनगरवाडी'ने माडगूळकर यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. स्वतः माडगूळकर यांनी 'बनगरवाडी' विषयी लिहिलेले दोन लेख तर प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर आणि दिगंबर पाध्ये यांनी लिहिलेले लेख ग्रंथात आहेत. 'कथा वाड्मयातील उच्चांक' अशा शब्दात शेजवलकर यांनी 'बनगरवाडी'विषयी लिहिले आहे.
माडगूळकर यांनी वडिलांविषयी लिहिलेला 'दादा', साहित्यिक पु.भा. भावे यांच्यावर लिहिलेला 'एक स्पार्टन योद्धा' तसेच माडगूळकर यांनी लिहिलेले सुरुवातीचे दिवस, माझ्या लिखाणामागील कळसूत्रे आणि अंबाजोगाई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून केलेले संपूर्ण भाषणही वाचायला मिळते. यासह रवींद्र पिंगे, व.दि. कुलकर्णी, रविमुकुल, गंगाधर गाडगीळ यांनी माडगूळकर यांच्यावर लिहिलेले लेखही आहेत.
वेगवेगळ्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले हे लेख व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांकात घेण्यात आले आहेत. माडगूळकर यांनी स्वतः लिहिलेले आणि त्यांच्यावर लिहिण्यात आलेले हे सर्व लेख या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतात.
मराठी साहित्याचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि माडगूळकर साहित्यप्रेमी यांच्यासाठी हा विशेषांक एक संदर्भ ग्रंथ ठरला आहे. कॅ. आशिष दामले या विशेषांकाचे संपादक असून श्याम जोशी हे कार्यकारी संपादक आहेत.
संपर्क
ग्रंथसखा प्रकाशन
९३२००३४१५६
बुधवार, १८ जानेवारी, २०२३
फक्त निलंबन नको, अशा उमेदवारांना निवडणूक लढवायला बंदी करा नाहीतर पाडा
![]() |
छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने |
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील पाच जागांसाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत होणाऱ्या लढतीवरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असून वाद प्रतिवाद सुरू आहेत. शह काटशहाचे राजकारण सुरू आहे.
यातही नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे नेते व आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली होती मात्र आपले सुपुत्र सत्यजित तांबे यांच्यावरील प्रेमापोटी डॉक्टर सुधीर तांबे यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली. इकडे सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिलेली नव्हती त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला. तांबे पिता पुत्राच्या एकाच वेळी काँग्रेस आणि भाजप यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू होत्या. झाल्या प्रकाराची दखल घेऊन नेहमीप्रमाणे सत्यजित यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर सत्यजित तांबे यांच्यावर निरंभानाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
![]() |
छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने |
विधान परिषदेवरील रिक्त जागा असो किंवा विधान परिषदेवर निवडून द्यायच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागा असोत. या सर्व जागांवर खरे तर पक्षासाठी आजवर घाम गाळलेल्या, प्रामाणिक कार्यकर्त्याची किंवा त्या त्या क्षेत्रातील मान्यवर अनुभवी व्यक्तींची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्षश्रेष्ठी किंवा पक्षातील बड्या नेत्यांशी जवळीक असलेल्या तसेच 'मनी' मसल पॉवर' असलेल्या लोकांना उमेदवारी मिळते. हे करण्यात सर्वच राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. 'पार्टी विथ डिफरन्स' म्हवून घेणारा भाजपही याला अपवाद नाही.
लोकसभा, विधानसभा किंवा अगदी महापालिका, नगरपालिका निवडणुकीसाठीही उमेदवारी देताना 'जिंकून येण्याची क्षमता' हा आणि त्या उमेदवाराची मनी, मसल पॉवर किती आहे? हेच पाहिले जाते. मग तो उमेदवार आपल्या पक्षातील असो किंवा दुसऱ्या पक्षातून आयात केलेला असो. पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आपल्याला या निवडणुकीत उमेदवारी मिळेल म्हणून काम सुरू केलेले असते मात्र ऐनवेळी त्यांना ठेंगा दाखवला जातो. पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म दिले जात नाहीत आणि भलत्याच व्यक्तीची उमेदवार म्हणून निवड केली जाते किंवा त्याला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून पाठिंबा दिला जातो. आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा अन्याय होतो.
![]() |
छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने |
या सगळ्यात अशा प्रकारे पक्ष बदलणाऱ्या, आपल्या फायद्यासाठी तत्वांना सोडचिठ्ठी देणाऱ्या उमेदवाराचे काहीच नुकसान होत नाही. कारण त्यांनी आधीच्या पक्षाकडून आमदार, खासदार किंवा अन्य महत्त्वाची राजकीय पदे उपभोगलेली असतातच. आणि आता त्यांनी ज्या नव्या राजकीय पक्षात उडी मारलेली असते तिथूनही ते निवडून येतात आणि या पक्षबदलुंचे पुन्हा एकदा सर्व काही सुरळीत चालू राहते.
याला कुठेतरी आळा बसणे आवश्यक आहे. अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी जे पक्ष बदलतील किंवा पक्षभंग करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशा लोकांवर फक्त निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. तर निवडणूक आयोगाने या लोकांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली पाहिजे. पण, पण येथे सर्वपक्षीय राजकारणी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून अशा प्रकारची सुधारणा, नियम करण्यास किंवा पक्षाच्या घटनेत बदल करण्यास कधीही तयार होणार नाहीत. त्यामुळे अशा पक्षबदलू लोकांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणे किंवा न्यायालयत जनहित याचिका दाखल करणे हा एक मार्ग जागरूक नागरिकांच्या हातात आहे. यात कितपत यश येईल किंवा नाही हा भाग वेगळा.
![]() |
छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने |
किंवा अशा उमेदवारांना पाडणे हा आणखी एक पर्याय जागरूक मतदार म्हणून आपण निवडू शकतो. त्यामुळे मतदारांनी ठरवून असा पक्षबदलू उमेदवार पाडला तर कदाचित सर्वपक्षीय राजकारण्यांच्या वागण्याला चाप बसू शकेल, अशी किमान अपेक्षा करायला हरकत नाही.
मंगळवार, १७ जानेवारी, २०२३
बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा
पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे येत्या २१ ते २९ जानेवारी या कालावधीत बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष असून सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत या बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात वाचकांना सहभागी होता येणार आहे. आपल्याकडे असलेली जुनी (चांगल्या स्थितीतील) वाचून झालेली पुस्तके येथे देऊन त्या बदल्यात तिथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांमधून आपल्याला अन्य पुस्तके घेता येणार आहेत. पुस्तकांच्या या आदानप्रदानामुळे आपल्याकडील वाचून झालेली पुस्तके अन्य वाचकांना वाचायला मिळू शकतील तर आपण न वाचलेली पुस्तके आपल्याला घेता येतील.
२१ 'जानेवारीला अभिनेते महेश कोठारे यांची प्रकट मुलाखत, २२ जानेवारी या दिवशी 'वाचन संस्कृती आणि कृतज्ञता' या विषयावर प्रल्हाद पै यांचे व्याख्यान, २३ जानेवारीला वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
लेखक प्रणव सखदेव यांची मुलाखत- २४ जानेवारी, माझ्या कवितेचा प्रवास- अशोक नायगावकर- २५ जानेवारी, स़ंत साहित्य- डॉ. अरुणा ढेरे- २६ जानेवारी, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांची मुलाखत- २७ जानेवारी असे कार्यक्रम होणार आहेत. २८ जानेवारीला वैद्य परिक्षित शेवडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि 'ॲनालायझर न्यूज'चे सुशिल कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार, २९ जानेवारी रोजी पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचा समारोप होणार आहे.
महाजन यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी पाच तर अन्य सर्व कार्यक्रमांची वेळ संध्याकाळी सहा अशी आहे.
पुस्तक आदानप्रदान सोहळ्याच्या निमित्ताने काॅफी टेबल पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. अभिनेते, अभिनेत्री, पत्रकार, लेखक, कवी अशा ७५ व्यक्तींनी लिहिलेले रंजक लेख, अनुभव, गोष्टी बरच काही या पुस्तकात असणार आहे. अशोक सराफ, श्रीधर फडके, सुधीर गाडगीळ, अच्युत गोडबोले, गुरु ठाकूर अशा अनेक मान्यवरांचे लेख या कॉफी टेबल बुक मध्ये असणार आहेत.
पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे सर्व कार्यक्रम डोंबिवली पूर्व येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाती होणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिक श्रोते, वाचक यांना विनामूल्य प्रवेश आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 7506296034 /9833732713 खालील लिंकवर क्लिक करूनही आपला सहभाग नोंदविता येणार आहे.
https://www.aadanpradan.com
गुरुवार, १२ जानेवारी, २०२३
'रेखा' 'चित्रा'ची गोष्ट!
मंगळवार, १० जानेवारी, २०२३
प्रथम तुज पाहता
सार्वजनिक वाचनालयाचे जनक- सदाशिव मोरेश्वर साठे
यंदा मकर संक्रांत १५ जानेवारीला
![]() |
ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण |
यंदाच्या वर्षी शनिवार, १४ जानेवारी रोजी रात्री ८-४४ वाजता सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांत रविवार १५ जानेवारी रोजी आली आहे अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
निरयन मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो, असे सोमण यांनी सांगितले.
वर्ष २०० मध्ये निरयन मकर संक्रांत २२ डिसेंबरला तर १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांत १४ जानेवारीलाच येत होती. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ ला तर कधी १५ जानेवारीला येत राहील. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला तर २०२४, २०२७ मध्ये निरयन मकर संक्रांत १५ जानेवारीला तर २०२५, २०२६, २०२९, २०३० मध्ये १४ जानेवारीला येणार असल्याचे सोमण म्हणाले.
![]() |
छायाचित्र- गुगलच्या सौजन्याने |
आपली पंचांगे निरयन पद्धतीची असल्याने सूर्य निरयन राशीत प्रवेश करतो त्यावेळी आपण मकर संक्रांत साजरी करतो. सूर्याने जर रात्री मकर राशीत प्रवेश केला तर दुस-या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. कोणतीही वाईट घटना घडली की, 'संक्रांत आली' असे म्हटले जाते,पण ते योग्य नाही. धनू राशीतून मकर राशीत सूर्याने प्रवेश करणे वाईट कसे असेल ? या दिवसापासून दिनमान वाढत जाते ते वाईट कसे म्हणता येईल ? तिळगूळ देऊन गोड बोलायला शिकविणारा हा दिवस वाईट कसा असू शकेल ? संक्रांतीदेवीने जर या दिवशी दुष्ट राक्षसाला ठार मारले असेल तर ते वाईट असेल का ? मकर संक्रांतीचा सण अशुभ नाही. मकर संक्रांतीच्यावेळी अनेक खोट्या व चुकीच्या अफवा पसरविल्या जातात त्यावरही विश्वास ठेवू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सूर्याचे स्वागत करण्यासाठी रंगीबेरंगी पतंग उडविण्याची प्रथा आहे. परंतू पतंग उडविण्यासाठी धारदार नॅायलॅानच्या मांजाचा वापर करू नका, असे आवाहनही सोमण यांनी केले.
![]() |
छायाचित्र गुगलच्या सौजन्याने |
मकर संक्रांती पुण्यकालात मातीच्या सुगडात ( सुघटात ) ऊस, बोरे, शेंगा , गाजर, ओले हरभरे वगैरे त्यावेळी शेतात पिकणारे पदार्थ आणि तिळगूळ दान देण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीला काळी वस्त्रे परिधान करण्याची पद्धत आहे. कारण हे दिवस थंडीचे असतात. काळ्या रंगाची वस्त्रे शरीर उबदार ठेवतात. थंडीच्या दिवसात तीळ आरोग्यास चांगले असतात. म्हणून तीळाचे पदार्थ करून खाण्यास सांगितलेले आहेत. ज्यांच्याशी वर्षभरात भांडण झाले असेल, अबोला धरला गेला असेल तर एकमेकांना तिळगूळ देवून मने एकत्र आणणारा, गोड बोला असा संदेश देणारा हा गोड सण आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदान , अन्नदान, तिळगूळ दान देण्याची प्रथा आहे. परंतू आधुनिक काळात विद्यादान, श्रमदान, ग्रंथदान , रक्तदान, सामाजिक- शैक्षणिक संस्थाना अर्थदान करणे हे ही तितकेच पुण्यदायक आहे असेही सोमण यांनी स्पष्ट केले.
©️ शेखर जोशी
-----
याच विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांच्याशी केलेली बातचीत
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...