रामदास कामत यांनी अनेक नाट्यपद
गायली असली तरी चित्रपटासाठी त्यांनी खूपच कमी पार्श्वगायन केलं. ‘मुंबईचा जावई’ या
चित्रपटासाठी त्यांनी गायलेलं ‘प्रथम तुजं पाहता’ हे एकमात्र चित्रपट गीत असावं. या
गाण्याचे गीतकार होते ग दि माडगूळकर आणि संगीतकार होते सुधीर फडके. सुधीर फडके
यांनी रामदास कामत यांना दूरध्वनी केला आणि ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील ‘प्रथम
तुज पाहता’ हे गाणे तुम्ही गावे अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले.
या रविवारी
गाण्याचं ध्वनिमुद्रण करायचं असून तुम्ही अवश्य यावे असा निरोप दिला. मात्र त्याच
दरम्यान म्हणजे शनिवारी बार्शी येथे रामदास कामत यांचा गाण्याचा कार्यक्रम होता आणि
रविवारीच गाण्याचं ध्वनिमुद्रण करायचं असल्यानं त्यांनी फडके यांना आपल्याला जमणार
नाही असं सांगितलं. परंतु फडके यांनी कसही करून हे जमवाच असा आग्रह झाला आणि कामत
यांनी त्याला हो म्हटले.
शनिवारी बार्शीचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्रीच्या गाडीने
मुंबईला परतायचं कामत त्यांनी ठरवलं. बार्शी चा कार्यक्रम पार पडला आणि कामात
मुंबईला येण्यासाठी निघाले. आरक्षण केलेलं नसल्याने तिकीट काढून ते कसेबसे गाडी
चढले. पुण्याला त्यांना बसायला मिळालं. रात्रभर झोप न झाल्यांन त्यांचा आवाज पार
बसला होता. रविवारी मुंबईत परतल्यानंतर त्यांनी फडके यांना आपण मुंबईत आल्याचं
कळवलं. पुण्याला त्यांना बसायला मिळालं. रात्रभर झोप न झाल्यांन त्यांचा आवाज पार
बसला होता. रविवारी मुंबईत परतल्यानंतर त्यांनी फडके यांना आपण मुंबईत आल्याचं
कळवलं.
फडके यांनी सांगितल्याप्रमाणे रामदास कामत गाण्याच्या ध्वनिमुद्रणस्थळी हजर
झाले. तिथे संगीतसाथीसाठी तबल्यावर वसंत आचरेकर, सारंगीवर राम नारायण आणि
संवादिनीवर प्रभाकर पेडणेकर ही मंडळी आलेली होती. माझा आवाज बसला आहे त्यामुळे मी
चांगलं गाऊ शकणार नाही असं रामदास कामत यांनी फडके यांना सांगून पाहिलं. परंतु
ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी गाण्याचं ध्वनिमुद्रण करणं गरजेचं होतं कारण
दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी कोल्हापूरला या गाण्याचं चित्रीकरण होणार होतं आणि
त्यासाठी रविवारी रात्रीच ध्वनिमुद्रित केलेलं गाणं कोल्हापूरला पाठवायचं होतं.
त्यामुळे रामदास कामत यांनी गळ्याचे काही व्यायाम करून आपला आवाज मोकळा केला आणि हे
गाणं ध्वनिमुद्रित झालं. आज इतक्या वर्षानंतरही हे गाणं रसिकांच्या ओठावर आहे आणि
स्मरणातही आहे. चित्रपटात पडद्यावर हे गाणं अरुण सरनाईक यांच्यावर चित्रित झालं
होतं.
प्रथम तुज पाहता या गाण्याची युट्युब लिंक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा