कर्तव्य पथावर भारतीय स्त्री शक्तीचा आविष्कार!
पुढील वर्षी म्हणजे २०२४ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्य पथावर होणा-या संचलनात भारतीय स्त्री शक्तीचा आविष्कार सादर होणार आहे. या संचलनात संपूर्ण महिला पथकांचा सहभाग असा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील संचलनामध्ये फक्त महिलांची पथके, बॅण्ड, सादरीकरण आणि चित्ररथ असावेत, यावर विचार सुरु आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण महिला पथक, महिला अधिकारी कर्तव्यपथावरील संचलनामध्ये सहभागी होत आहेत. यावर्षी २६ जानेवारीला झालेल्या ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये भारताने आपले लष्करी सामर्थ्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविले. त्यावेळी ‘स्त्री शक्ती’ ही मध्यवर्ती संकल्पना होती. २०२३च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये भारतीय हवाई दलाच्या १४४ जवानांच्या संचलन तुकडीचे नेतृत्व एका महिला अधिकाऱ्याने केले होते.
देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा १९५०मध्ये मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर पार पडला होता. १९५१पासून राजपथावर संचलन होत आहे. विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश, अनेक विभाग, राज्ये आणि मंत्रालये दरवर्षी कला, संस्कृती, वारसा आणि सामर्थ्याचे दर्शन घडवतात.
२०२३च्या संचलनामध्ये केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांच्या चित्ररथांची ‘नारी शक्ती’ ही प्रमुख संकल्पना होती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा