सोमवार, २९ मे, २०२३
आता काही वर्षांत वंदे मेट्रो उपनगरी रेल्वे
आता काही वर्षांत वंदे मेट्रो उपनगरी रेल्वे
मुंबईकरांचा प्रवास गारेगार आणि सुखकर
वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर आता येत्या काही वर्षात मुंबईतील उपनगरीय प्रवाशांना वंदे मेट्रो उपनगरी रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे वंदे भारत एक्सप्रेस च्या धरतीवर २३८ वंदे मेट्रो उपनगरी लोकल मुंबईकरांना मिळणार आहेत.
२३८ वातानुकलीत वंदे मेट्रो उपनगरी रेल्वेसाठी सुमारे २१ हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षात पहिली आणि पाच वर्षात संपूर्ण लोकल उपलब्ध होऊ शकतील केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ या तिघांच्या माध्यमातून या लोकलच्या बांधणीसाठी निधी उभारण्यात येणार आहे.
सध्याच्या उपनगरी लोकल ११० किलोमीटर वेगाने धावतात, तर वंदे मेट्रो उपनगरी लोकलही १३० किलोमीटर वेगाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर राजधानी एक्सप्रेस १३० किलोमीटर वेगाने धावते त्यामुळे भविष्यात आता मुंबई उपनगरी लोकलही याच वेगाने जाऊ शकते.
या २३८ वातानुकूलित वंदे मेट्रो उपनगरी रेल्वेसाठी स्वतंत्र कार शेड उभारण्यात येणार आहे त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई वंदे मेट्रो उपनगरी रेल्वेच्या पहिल्या आणि शेवटच्या डब्यातून माल वाहून नेण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
----
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा