शुक्रवार, १६ जून, २०२३

एकत्रित आलेली हिंदू शक्ती हिंदु राष्ट्र निर्माणासाठी जोडली जाईल- डॉ. चारुदत्त पिंगळे


डावीकडून डॉ.चारुदत्त पिंगळे, हरिशंकर जैन, श्रीराम ज्ञानीदास महात्यागी महाराज, भागिरथी महाराज, भागवताचार्य (अधिवक्ता)  राजीवकृष्णजी महाराज झा, महंत दीपक गोस्वामी

एकत्रित आलेली हिंदू शक्ती हिंदु राष्ट्र 

निर्माणासाठी जोडली जाईल- डॉ. चारुदत्त पिंगळे 

‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या उद्घोषात हिंदू राष्ट्र अधिवेशन  सुरू

फोंडा, गोवा. 

‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव’ म्हणजे एक प्रकारचे लोकमंथन असून या लोकमंथनातून एकत्रित आलेली ही हिंदू शक्ती हिंदू राष्ट्र निर्माणाच्या विश्वकल्याणकारी कार्यासाठी जोडली जाईल, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी आज (शुक्रवारी) येथे केले.


हिंदू जनजागृती समितीतर्फे श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या ‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवा’च्या अर्थात ‘हिंदू राष्ट्र अधिवेशना’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

खालिस्तानचा आतंकवाद, श्रीरामनवमी-हनुमानजयंती अशा सणांना दंगलींचे वाढलेले प्रमाण, समलिंगी विवाहाचे समर्थन,‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या व्यभिचाराला मान्यता, अश्लीलतेचे वाढते प्रस्थ, अनैतिकतेला संवैधानिक करण्याचे प्रयत्न यांसह अनेक आव्हाने सध्या हिंदूंसमोर आहेत. या सर्व समस्यांवर ‘सेक्युलर’ राज्यव्यवस्थेत कोणतेही उत्तर नसून शाश्वत हिंदु राष्ट्र हेच त्यावर उत्तर आहे, असेही डॉ. पिंगळे यांनी सांगितले. 



‘हलाल’च्या माध्यमातून चालू असणार्‍या आर्थिक आक्रमणाला उत्तर दिले पाहिजे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्र, व्यवसाय मुसलमान ताब्यात घेत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक व्यवसायात हिंदूंना जोडून आपली आर्थिक शक्ती वाढवून त्याला उत्तर द्यावे लागेल, असे मुंबई- दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले.

सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले लिखित अनमोल शिकवण’ (खंड १) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’, या हिंदी आणि मराठी या ग्रंथाचे प्रकाशन भागवताचार्य श्री राजीवकृष्णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, 

रामज्ञानीदास महात्यागी महाराज, अधिवक्ता हरिशंकर जैन, महंत दीपक गोस्वामी यांच्या हस्ते, तर डोंबिवली येथील दुर्गेश परुळकर यांच्या ‘महाभारतातील अलौलिक चरित्रे : खंड १, निष्काम कर्मयोगी भीष्म’ या ग्रंथाचे प्रकाशन दुर्गेश परुळकर, डॉ. चारुदत्त पिंगळे, केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर, प.पू. यतीमाँ चेतनानंद सरस्वती यांच्या हस्ते झाले. 

अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. दीपप्रज्वलनानंतर वेदमंत्रांचे पठण झाले. सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सत्यवान कदम यांनी केले.

 श्रृंगेरी येथील दक्षिणम्नाय श्री शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री भारती तीर्थ महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज यांचा ध्वनीचित्रफित संदेश दाखविण्यात आला. कर्नाटक येथील पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामी यांच्या संदेशाचेही वाचन करण्यात आले. 

अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदू जनजागृती समितीच्या HinduJagruti.org या संकेतस्थळावर तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेलवर करण्यात येत आहे. येत्या २२ जूनपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

१६ जून २०२३



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: