![]() |
नंदन नीलकेणी |
नंदन नीलेकणी तुम्हाला दंडवत!
आपण ज्या शाळेत, महाविद्यालयात शिकतो, शिक्षण पूर्ण करतो ती शाळा, महाविद्यालय यांच्या बाबतीत आपण सर्वजण कृतज्ञ असतो. आणि असलेच पाहिजे. शाळा/ महाविद्यालयाप्रती असलेली ही कृतज्ञता प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परिने व्यक्त करत असतो.
'आयआयटी' मुंबईचे माजी विद्यार्थी आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी कृतज्ञता म्हणून 'आयआयटी' मुंबईला तब्बल ३१५ कोटी रुपयांची (३८.५ मिलियन डॉलर्स) देणगी दिली आहे. 'आयआयटी' मुंबईत पायाभूत सुविधांची निर्मिती, उदयोन्मुख क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी नीलकेणी यांनी ही देणगी दिली आहे.
'आयआयटी'ला एका माजी विद्यार्थ्याकडून मिळालेली ही आजवरची सर्वांत मोठी देणगी आहे. या आधीही नीलेकणी यांनी ८५ कोटींची देणगी 'आयआयटी' मुंबईला दिली होती. या देणगीतून नवीन वसतिगृहे बांधणे, स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला वीजपुरवठा करणे आणि देशाचे पहिले विद्यापीठ इनक्यूबेटर स्थापित करणे यासाठी होती.
ही देणगी केवळ आर्थिक मदत नाही, तर आर्थिक मदतीपेक्षाही अधिक आहे. ज्या संस्थेने मला खूप काही दिले त्या संस्थेप्रती हे ऋण आहे, असे नीलकेणी सांगतात.
२१ जून २०२३
२ टिप्पण्या:
अभिनंदनास पात्र। अशा दानशूर व्यक्तीला दंडवत।
यान्च्या औदार्यबाददल बोलण्याचीही आमची पात्रता नाही???!
एका तरी ED FAME नेत्याने असे काही कोटी दिलेत का ?
टिप्पणी पोस्ट करा