बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाच्या विषयावरील 'कुर्ला टू वेंगुर्ला'

ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाच्या विषयावरील 'कुर्ला टू वेंगुर्ला' - येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित मुंबई, दि. १० सप्टेंबर ग्रामीण भागातील तरुणांच्या रखडणाऱ्या लग्नाचा विषय 'कुर्ला टू वेंगुर्ला' या आगामी चित्रपटात मांडण्यात आला असून हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांचे असून चित्रपटात वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत, अमेय परब, शेखर बेटकर, अनघा राणे इत्यादी कलाकार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: