सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

आचार्य अत्रे चौक, आरे मेट्रो स्थानकातून पहिली मेट्रो गाडी आता सकाळी ५.५५ ला सुटणार

आचार्य अत्रे चौक, आरे मेट्रो स्थानकातून पहिली मेट्रो गाडी आता सकाळी ५.५५ ला सुटणार - १५ सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरू मुंबई, दि. १५ सप्टेंबर कुलाबा-वांद्रे-आरे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक आणि आरे मेट्रो स्थानकावर सकाळी ६.३० ऐवजी आता सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे. आरे ते बीकेसी मार्गिका ऑक्टोबर २०२४ मध्ये तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्गिका मे २०२५ मध्ये सुरू झाली. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून सोमवार ते शनिवारदरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो गाड्या चालवल्या जातात. तर रविवारी मात्र सकाळी ८.३० ते रात्री १०.३० अशी मेट्रो सेवेची वेळ होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: