शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे

यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे- ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण ठाणे, दि. १३ सप्टेंबर आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी होत असल्याने यंदाच्या वर्षी नवरात्र दहा दिवसांचे असून २२सप्टेंबर ते १ आक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.‌ आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते. म्हणून नवरात्र निर्मिती शक्तीचा,आदिशक्तीचा उत्सव असून तो महिलांच्या सबलीकरणाचाही उत्सव असतो, असे सोमण यांनी सांगितले.‌ नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नाही तर तो सामाजिक, सांस्कृतिकही आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते, असेही सोमण म्हणाले.‌ नवरात्री नवरंग २०२५ -------------------------- १)सोम.२२सप्टें. सफेद/पांढरा २) मंगळ.२३ सप्टें. लाल ३) बुध.२४ सप्टें. निळा ४) गुरू.२५ सप्टें.पिवळा ५) शुक्र.२६ सप्टें. हिरवा ६) शनि.२७ सप्टें.करडा/ग्रे ७) रवि. २८ सप्टें.केशरी/भगवा ८) सोम.२९सप्टें. मोरपिशी/पिकाक ग्रीन ९) मंगळ.३० सप्टें. गुलाबी. १०) बुध.१ आक्टो. जांभळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: