शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

कोकणातील कातळशिल्पांचे जतन संवर्धन करणार

कोकणातील कातळशिल्प जतन संवर्धनसाठी पर्यटन विकास महामंडळ,निसर्गयात्री संस्थेत सामंजस्य करार - जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत राज्यात विविध कार्यक्रम मुंबई, दि. २७ सप्टेंबर कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.‌ पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी रत्नागिरीतील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राला भेट दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे झालेल्या कार्यक्रमात निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष तसेच कोकणातील कातळशिल्प शोधकर्ते व अभ्यासक सुधीर रिसबूड आणि प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने या दोघांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालय आणि संलग्नित सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवास येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक पर्यटन दिन उपक्रमात विविध स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना व्यवस्थापकीय संचालक नीलेश र . गटणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर , नाशिक, रत्नागिरी येथील प्रादेशिक कार्यालयात पर्यटकांचे स्वागत, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विविध पर्यटक निवासात पर्यटकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, हॉटेल रिसॉर्ट चे प्रख्यात वास्तुविशारद खोझेमा चितलवाला व वन्यजीव पर्यटन तज्ज्ञ संजय देशपांडे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: