रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

अत्रे ग्रंथालयातर्फे तीन दिवसीय व्याख्यानमाला

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अत्रे ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला डोंबिवली, दि. २३ नोव्हेंबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्र के अत्रे वाचनालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.‌ प्र के अत्रे वाचनालय २०१७ मध्ये डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिर संस्थानाला ३० वर्षांसाठी हस्तांतरित करण्यात आले. ही व्याख्यानमाला दररोज संध्याकाळी सात वाजता श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली-पूर्व येथे होणार आहे. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी 'संविधान सर्वांसाठी' या विषयावर संविधान अभ्यासक माधव जोशी आपले विचार मांडणार आहेत. २७ नोव्हेंबर रोज 'मला शिवराय व्हायचंय' या विषयावर अतिश अविनाश कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. तर २८ नोव्हेंबर रोजी 'डिजिटल जगात सुरक्षितता;कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर संरक्षण' या विषयावर अभिषेक सोनार बोलणार आहेत. व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य असून डोंबिवलीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश मंदीर संस्थांनने केले आहे. प्र. के. अत्रे ग्रंथालयाचे सुमारे १ हजार ६०० सभासद असून ग्रंथालयात सुमारे ३९ हजार पुस्तके आहेत. येथे बारा तास मोफत वृत्तपत्र वाचनालय तसेच २५० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोयही उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: