शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५
ब्रह्माकुमारीजच्या आबुरोड येथील मुख्यालयात उद्या महा रक्तदान शिबिर
आबुरोड येथील मुख्यालयात
उद्या महा रक्तदान शिबिर
- ब्रह्माकुमारीजच्या देशभरातील सहा हजारांहून
अधिक सेवाकेंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन
आबूरोड (राजस्थान), दि. २२ ऑगस्ट
येथील ब्रह्माकुमारीज संस्थानचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या 'शांतीवन' येथे उद्या- २३ ऑगस्ट रोजी महाभव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्माकुमारीजच्या दिवंगत राजयोगिनी दादी प्रकाशमणि यांची पुण्यतिथी विश्वबंधू दिन म्हणून साजरी करण्यात येते. याचा एक भाग म्हणून ब्रह्माकुमारीजतर्फे संपूर्ण भारतभर तसेच नेपाळ येथे रक्तदानाचे महाअभियान आयोजित करण्यात आले आहे.
या महाअभियानची सुरुवात १७ ऑगस्ट रोजी गुरुग्राम येथे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. आता ब्रह्माकुमारीजतर्फे संपूर्ण देशात २२ ते २५ ऑगस्ट या कालावधीत सहा हजारांहून अधिक सेवाकेंद्रात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या महारक्तदान शिबिरात एक लाख रक्त पिशव्या जमा करण्याचे लक्ष्य आहे. तसेच या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
-
राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव? शेखर जोशी राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महो...
-
ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे ही छायाचित्रे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील आहेत. छ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा