मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५
‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी गणेशोत्सव
'ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी
गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई, दि. २६ ऑगस्ट
दादर येथील 'ब्राह्मण सेवा मंडळा’च्या गणेशोत्सवाचे यंदा
शतकमहोत्सवी वर्ष असून धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबतच श्री गणेश याग, श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण सेवा मंडळाची स्थापना १० डिसेंबर १९१६ रोजी झाली. मात्र पहिला गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी ‘मुकुंद मॅन्शन’ मध्ये साजरा झाला.
२९ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ हा काव्यमय नाट्यप्रयोग सादर होणार आहे. मुक्ता बर्वे यांच्यासह अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य, अंजली मराठे हे कलाकार कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजता संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी यांचा ‘संकर्षण via स्पृहा’ हा कार्यक्रम होणार आहे.
गणेशोत्सवातील अन्य कार्यक्रम
३० ऑगस्ट, ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’. वक्ते : मा. ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.), मुलाखतकार : जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर.
३१ ऑगस्ट ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’- वक्ते : प्रद्योत पेंढारकर, मुलाखतकार : सर्वेश देशपांडे.
३ सप्टेंबर पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने माणिक वर्मा यांनी सुमधुर गायलेल्या गाण्यांचा कार्यक्रम ‘हसले मनी चांदणे’.
५ सप्टेंबर २०२५ वारकरी कीर्तन – ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील.
सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या तत्त्वावर दिला जाणार आहे. ब्राह्मण सेवा मंडळ, भवानीशंकर मार्ग, दादर पश्चिम येथे होणा-या या सर्व कार्यक्रमाची वेळ रात्री आठ अशी आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा