मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५
रोह्यातील 'एक गाव एक गणपती' सार्वजनिक गणेशोत्सव कौतुकास्पद आणि अनुकरणीय
रोह्यातील 'एक गाव एक गणपती' सार्वजनिक गणेशोत्सव कौतुकास्पद आणि अनुकरणीय
- राज्यातील महापालिका क्षेत्रात 'एक प्रभाग एक गणपती' संकल्पना राबविण्याची गरज
शेखर जोशी
रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त न्यासाचे यंदा १०४ वे वर्ष असून रोह्यातील 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना स्तुत्य, कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.
मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात 'एक गाव एक गणपती' नव्हे तर 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे आणि खरोखरच मनावर घेतले तर ही गोष्ट अशक्य नाही. रस्ते अडवून, पादचारी आणि वाहन चालक यांना अडथळा होईल असा मंडप न उभारता शहरातील बंदिस्त सभागृहात हा गणेशोत्सव साजरा केला जावा, ती काळाची गरज आहे.
अर्थात हे करण्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती हवी. केवळ आणि केवळ लोकानुनयाला बळी न पडता सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन, चर्चा करून 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हिच गोष्ट सार्वजनिक नवरात्रौत्सव, दहिहंडी उत्सवाच्या बाबतीतही करता येईल.
स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने तरी भाजपची सत्ता असलेल्या महापालिका, नगरपालिका क्षेत्रात किंवा भाजपचे नगरसेवक असलेल्या किमान एका तरी प्रभागात 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत आणि इतर राजकीय पक्षापुढे एक नवा मापदंड व आदर्श निर्माण करावा. मनसेचे राज ठाकरेही महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या गप्पा करत असतात. त्यांनीही किमान दादर भागात, ते राहतात त्या प्रभागात तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही आपापल्या कार्यक्षेत्रात 'एक प्रभाग एक गणपती' साठी प्रयत्न करावेत.
गणपती मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ ( शिवसेना एकसंघ असताना) यांनी काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले होते. बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता होती. प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधनाचा वारसा सांगणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मनावर घेतले असते आणि शुभा राऊळ यांना पाठिंबा दिला असता तर कदाचित ही गोष्ट घडून गेली असती. पण उद्धव ठाकरे यांनी ती हिंमत दाखवली नाही.
पुरोगामी असलेल्या आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा जप करणाऱ्या शरद पवार यांनी तरी बारामती किंवा पश्चिम महाराष्ट्रातील त्यांची राजकीय ताकद असलेल्या किमान एका तरी गावात 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबवून दाखवावी.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा