मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५
कल्याण गायन समाज संस्थेला सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार जाहीर
कल्याण गायन समाज संस्थेला
सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार जाहीर
- गणेशोत्सवाचे व्यवस्थापन यावर्षी श्रीराम सेवा मंडळाकडे
कल्याण, दिनांक,२६ ऑगस्ट
शास्त्रीय संगीत, गायनाचा प्रचार आणि प्रसाराचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या कल्याणमधील गायन समाजाला सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार समितीतर्फे देण्यात येणारा यंदाचा शताब्दी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अलीकडेच कल्याण गायन समाजाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष असून गणेशोत्सवाचे व्यवस्थापन यावर्षी श्रीराम सेवा मंडळा कडे आहे
पुरस्कार वितरणाचा सोहळा येत्या २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सुभेदारवाडा शाळा येथील सभागृहात होणार आहे. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक प्रा. डाॅ. नरेशचंद्र, शताब्दी पुरस्कार समिती न्यायासाचे चिटणीस डाॅ. रत्नाकर फाटक, ज्येष्ठ वकील ॲड. सुरेश पटवर्धन, श्रीकांत जोशी, भालचंद्र जोशी, मुयरेश आगलावे हे संचालक, श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंपी उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाव्रती, संस्थांना प्रेरणा म्हणून सुभेदारवाडा गणेशोत्सवातर्फे शताब्दी पुरस्कार दिला जातो. शताब्दी वर्षात झालेल्या २५ हजार रूपयांच्या निधी संकलनातून जमा झालेली रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत ठेऊन त्यात देणगीदारांनी दिलेल्या देणगीची भर घालून त्या व्याजातून हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा कार्यक्रम २ सप्टेंबर रोजी होणार आहे.
सुभेदार वाडा गणेशोत्सवात यंदा 'शिव साम्राज्य' ही संकल्पना घेऊन सजावट करण्यात येणार असून प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी सुभेदार वाड्याच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या महालाचे नेपथ्य केले आहे. २८ ऑगस्ट रोजी पांडुरंग बलकवडे यांचे 'शिवरायांची अष्टक्रांती' या विषयावर व्याख्यान होणार असून ३० ऑगस्ट रोजी मावळा बोर्ड गेमच्या निर्मात्यांशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. १ सप्टेंबर रोजी युवा शाहीर रामानंद उगले यांचा 'महाराष्ट्राची लोकगाणी' हा कार्यक्रम होणार असून सर्व कार्यक्रमांची वेळ रात्री साडेआठ अशी आहे. ४ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता 'कल्याणकर नवदुर्गा पुरस्कार' वितरण सोहळा व अचला वाघ यांचे 'शिवकालीन स्त्रिया' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
४ आणि ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १२ या वेळेत शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा