विस्मरणातील अंबरनाथकर या लेखमालिकेतील पुढील लेख. कामगारांचे कैवारी पुरुषोत्तम वासुदेव ऊर्फ भाऊसाहेब परांजपे महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस ४ मार्च २०२३ ![]() |
महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस/ ४ मार्च २०२३ |
शनिवार, ४ मार्च, २०२३
कामगारांचे कैवारी
शुक्रवार, ३ मार्च, २०२३
गड-दुर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार - पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
गड-दुर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी
स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार
- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
महाराष्ट्रातील सर्व गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण करण्यासाठी आणि त्यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना येत्या तीन महिन्यांत करण्यात येईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे दिले.
‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लोढा यांनी आझाद मैदानात येऊन समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळी बोलताना लोढा यांनी हे आश्वासन दिले.
ठराविक कालमर्यादा ठरवून सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यात येतील, तसेच उर्वरित सर्व मागण्यांच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर सर्व दुर्गप्रेमी संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात येईल, असेही लोढा यांनी सांगितले.
महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’ आयोजित ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्या’त राज्यभरातून गड-दुर्गप्रेमी संघटनांचे सुमारे दीड हजारांहून अधिक शिवप्रेमी सहभागी झाले होते. मुंबईतील मेट्रो चित्रपटगृह ते आझाद मैदान काढण्यात आलेल्या मोर्च्यात नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदेश देशपांडे, धर्मवीर संभाजी महाराज यांची दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील आणि सरनोबत अंतोजीराजे गाडे पाटील यांचे वंशज अमित गाडे, वीर कोयाजी बांदल यांचे वंशज अक्षय बांदल, मोरोपंत पिंगळे यांचे वंशज विश्वजित देशपांडे, कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज अप्पासाहेब गायकवाड, वीर शिवा काशिद यांचे वंशज आनंदराव काशिद, पंताजीकाका बोकील यांचे वंशज गौरव बोकील या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांचा सहभागही लक्षवेधी होता,
‘समस्त हिंदु बांधव संघटने’चे रविंद्र पडवळ, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, वसई येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संचालक भार्गव श्री बी.पी. सचिनवाला, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पिठाच्या ‘धर्मसभा-विद्वत्संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, ‘सनातन संस्थे’च्या धर्मप्रसारक अनुराधा वाडेकर यांच्यासह समस्त हिंदू बांधव संघटना, शिवराज्याभिषेक समिती, मराठा वॉरीयर्स, गड-दुर्ग संवर्धक संघटना, दुर्गवीर प्रतिष्ठान, श्री शंभूदुर्ग प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी (महिला शाखा), युवा मराठा महासंघ, शिववंदनेश्वर प्रतिष्ठान, स्वतंत्र सवर्ण सेना, हिंदु धर्मजागरण, सनातन संस्था, अखिल भारतीय मराठा सेवा महासंघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी गड-दुर्गप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे समन्वयक सुनील घनवट म्हणाले, विशाळगडावर शंभरहून अधिक अनधिकृत पक्की बांधकामे झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले. अशाच प्रकारे रायगड, लोहगड, कुलाबा, वंदनगड, दुर्गाडी किल्ला यांसह राज्यातील महत्त्वाच्या ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवर अवैधपणे घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांवरील ही अतिक्रमणे शिवप्रेमींच्या श्रद्धांवर आघात करणारी तर आहेतच, तसेच प्रचंड चीड आणणारीही आहेत. याला पुरातत्व विभागाचे जे अधिकारी उत्तरदायी असतील, त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करावी.
अनेक गड-दुर्गांच्या ठिकाणी होणारे मद्यपान, विद्रूपीकरण, अस्वच्छता आदी अपप्रकार थांबवावेत, तसेच अनेक गड-दुर्गांची मोठ्या प्रमाणावर झालेली पडझड, ढासळलेले बुरूज, तोफांची दुरावस्था थांबविण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष घालावे.
शासनाने गड-दुर्ग संवर्धनासाठी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच गडांची नियमित स्वच्छता आणि पावित्र्यरक्षण यांसाठी शासनाने गड-दुर्गप्रेमी संघटनांचे साहाय्य घ्यावे. पुरातत्त्व खात्याने सर्व गड-दुर्गांची योग्य माहिती आणि कायदेशीर बाबी सांगणारे संकेतस्थळ चालू करावे. त्यात नागरिकांना तक्रार करण्याची सोय असावी. गड-दुर्ग रक्षणासाठी स्थापन करण्यात येणार्या महामंडळात गड-दुर्ग संवर्धनासाठी कार्य करणारे प्रतिनिधी, मावळ्यांचे वंशज, गड परिसरातील दुर्गप्रेमी-शिवप्रेमी यांना सहभागी करावे, आदी विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या.
गुरुवार, २ मार्च, २०२३
कसबा पोटनिवडणूक निकाल; भाजपने आत्मपरीक्षण करावे आणि कॉंग्रेसने हुरळू नये
'
आधी कोथरूड आता कसबा गृहित धरणा-यांना धडा शिकवा' अशी चर्चा समाज माध्यमांतून रंगली होती. आज निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारांना गृहीत धरणा-या भाजपला मतदारांनी खरोखरच धडा शिकवला, असे म्हणावे लागेल. ठेच लागल्यामुळे भाजपने आत्मपरीक्षण करावे आणि कॉंग्रेसने, पर्यायाने महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये, हा कसबा पोटनिवडणूक निकालाचा धडा आहे.
मतदारांना कोणीही, कोणत्याही राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय पक्षांनी गृहीत धरू नये. सुजाण आणि सुबुद्ध मतदार कधी, केव्हा आणि कसा धडा शिकवितील हे अनाकलनीय आहे. कसबा हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. २८ वर्षांनंतर पहिल्यांदाचा भाजपला येथे पराभवाची धूळ चारली गेली. कसब्यातील नाराजांनी 'नोटा' मताधिकार वापरून की
की उमेदवार पाहून भाजपला धडा शिकवला? महापालिका किंवा नगरपालिका निवडणुकीत अनेकदा स्थानिक प्रश्न, दिलेला उमेदवार, त्याची ओळख हेच महत्वाचे ठरते. महापालिका पातळीवर राष्ट्रीय राजकारण, प्रश्न फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत. कसब्यातील पोटनिवडणूक विधानसभेची असली आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात होणारी होती, राज्यात भाजप व शिवसेना (शिंदे गट) सत्ताधारी होते. तरीही भाजपला पराभव पत्करावा लागला याचे मुळात जाऊन चिंतन करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व ताकद पणाला लावूनही भाजपचा बालेकिल्ला ढासळला.
'पार्टी विथ डिफरन्स' अशी टिमकी वाजविणा-या भाजपची भगवी कॉंग्रेस होत चालली आहे. कॉंग्रेस (आय) असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो. दोन्हीही काँग्रेसला मत देऊच नये. आज देशातून दोन्ही काँग्रेस आपल्या कर्माने संपत चालल्या आहेत, त्यांना त्यांच्या कर्माने संपू दे. भाजप, विशेषतः महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधील आयारामांना पायघड्या घालून भाजपमध्ये प्रवेश दिला. 'आयारामांना पायघड्या आणि निष्ठावंतांचे पोतेरे' कशासाठी? दोन्ही काँग्रेसमधील ओवाळून टाकलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मोठे करून त्यांची सोय कशासाठी लावली गेली? हे राजकारण तत्कालिक फायद्याचे ठरले तरी दीर्घकाळ ते सोयीचे किंवा फायद्याचे न ठरता अडचणीचेच ठरू शकते.
खरे तर पोटनिवडणुकीत मृत झालेल्या महिला किंवा पुरुष लोकप्रतिनिधींच्या निकटच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाते. हे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा. पण सर्व राजकीय पक्ष हाच निकष लावतात आणि भाजपनेही चिंचवडमध्ये तोच निकष लावला तर हाच न्याय कसब्यात का लावला गेला नाही? की पोटनिवडणुक होती म्हणून भाजपने जुगार खेळायचे ठरवले?
या आधी कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आणि ब्राह्मण वर्गाची नाराजी ओढवून घेतली. पण कोथरुडकरांना जे जमले नाही ते कसबाकरांनी करून दाखवले. काही वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही डोंबिवलीकर मतदारांनी भाजपला धडा शिकविला होता. डोंबिवलीत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या अधिकृत उमेदवारांना पाडून त्या प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक निवडून आले होते.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली होती. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळाली. इथे जयश्री जाधव विजयी झाल्या. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत रमेश कटके यांच्या पत्नीला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या. भाजपने इथे आधी उमेदवार उभा केला आणि नंतर माघार घेतली.
कसब्यातील रासने यांचा पराभव आणि धंगेकर यांचा विजय भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धक्कादायक आहे. काही दिवसांपू्र्वी झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही भाजपला पराभवाचा धक्का बसला. कसब्यातील सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठेतील ब्राह्मण समाज हे भाजपचे पारंपरिक मतदार आहेत आणि तरीही येथे कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होणे धक्कादायक आहे. यापुढे सर्वसामान्य मतदाराला गृहित धरू नये, असा धडा कसब्यातील मतदारांनी भाजपसहित सर्व राजकीय पक्षांना दिला आहे. या विजयामुळे कॉंग्रेसला पर्यायाने महाविकास आघाडीला आनंदाचे भरते आले आहे. पण म्हणून कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीने किंवा भाजप विरोधकांनी हुरळून जाऊ नये. असेच चित्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल या भ्रमात राहू नये. धंगेकर यांच्या विजयाने संपत चाललेल्या दोन्ही काँग्रेसना, शिवसेनेला थोडी धुगधुगी मिळाली, एवढाच याचा अर्थ आहे. भाजपनेही एकूणच आपल्या धोरणांचा, निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे.
राजकारणात कोणीही आणि कोणताही पक्ष धुतल्या तांदुळासारखा स्वच्छ नसतो. कोणी होऊन गेले ते सन्माननीय अपवाद म्हणता येतील. सध्याच्या 'मनी, मसल पॉवर' आणि 'निवडून येणे' हीच क्षमता असलेल्या राजकारणात सर्वसामान्य मतदारांच्या हातात 'दगडापेक्षा वीट मऊ' एवढाच पर्याय असतो. आता दगड की वीट निवडायची? तो शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. असो.
पण एकदा कधीतरी निवडणूक आयोगाने जो नकाराधिकार मतदानाचा अधिकार (नोटा) दिला आहे, त्याला सर्वाधिक मते मिळावीत आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला कमी मते पडून सर्वाधिक मते घेतलेल्या उमेदवाराची निवडणूक रद्द व्हावी अशी इच्छा आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत जाऊ दे पण किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकदा तरी असे घडू दे. कसब्यातील ऐतिहासिक निकालाने एक वेगळी वाट चोखाळली गेली आहेच तसेच 'नोटा' बाबतीत व्हावे.
शेखर जोशी
२ मार्च २०२३
मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३
'सहस्रबुद्धे आणि मंडळी' शताब्दी स्मरणिका
![]() |
कृष्णाजी विश्वनाथ ऊर्फ बाबुराव सहस्रबुद्धे |
निस्वार्थी कार्यकर्ता- गंगाधर महादेव उर्फ पंत जोशी
शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३
दोन्ही काँग्रेसशी करता संग शिवसेनेचा होई अंत
मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३
विश्वासार्हता गमावलेल्या शरद पवार यांच्यावर विश्वासच कसा ठेवलात?
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...