शनिवार, ३१ मे, २०२५

वक्फ बोर्ड; महाराष्ट्रातील अवैध जमिनींची छाननी होणार

वक्फ बोर्डसंबंधित जे पी सी समोर महाराष्ट्रातील अवैध जमिनींची यादी सादर होणार - जमिनीच्या कागदपत्रांसह ग्राहक पंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई, दि. ३१ मे पुण्यामध्ये गंज पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, नाना पेठ, कॅम्प ह्या सगळ्या भागातील एकूण चार हजार एकर जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर आहे. महाराष्ट्रातील काही छोट्या मोठया शहरात देखील वक्फ बोर्डने लोकांच्या जमिनी घेतल्या आहेत. अशा सर्वांनी जमिनीची कागदपत्रे घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वक्फ बोर्ड महाराष्ट्रसाठी खासदार मेधा कुलकर्णी 'जे पी सी मेंबर म्हणून काम पाहणार आहेत. खासदार कुलकर्णी यांच्याकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत म्हणणे सादर करणार आहेत.‌ संपर्क अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. मोफत मार्गदर्शन दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३० www.abgpindia.com इतर संपर्क क्रमांक विजय सागर 9422502315 श्री विलास लेले 9823132172 श्रीमती विजया वाघ 9075132920 श्री रवींद्र वाटवे 9422383785 श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909 श्री सुनील नाईक 9890330246 श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188 श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675 ठाणे स्मिता जामदार 9819438286, दिपक सावंत 9833398012 डोंबिवली राजेंद्र बंडगर 9975712153 विदर्भ प्रांत यवतमाळ डॉ. नारायण मेहेरे 7038358466 भंडारा श्री नितिन काकडे 9423605672 नागपूर श्री विलास ठोसर 7757009977 कोकण प्रांत सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971 देवगिरी परभणी श्री विलास मोरे 09881587087 मध्य महाराष्ट्र प्रांत श्री बाळासाहेब औटी 9890585384 कोल्हापूर श्री सुहास गुरव 09420493001 सांगली श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243 सातारा श्री जयदीप ठुसे, 9767666346 श्री केदार नाईक 9665571855 सोलापूर श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395 जळगांव डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327 नगर श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021 *नाशिक* श्री हिरा जाधव 9823599957 *धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555 *नंदुरबार* श्रीम.वदंना तोरवणे, मो .9156972786 ।।।। *सर्व महाराष्ट्रात हा मेसेज तत्काळ पसरवावा, हि विनंती.*

दोन दिवसीय स्टार्टअप प्रदर्शन

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दोन दिवसीय स्टार्टअप प्रदर्शन डोंबिवली, दि.३१ मे टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आज आणि उद्या (३१ मे व १ जून) डोंबिवलीत नव उद्योजकांसाठीचे स्टार्टअप प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदा पाचवे वर्ष आहे.हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत सर्वेश सभागृह, तळमजला, डोंबिवली पूर्व येथे भरविण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी २५ विविध प्रकारचे उद्योजक प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

'आयटीआय'ऑनलाईन प्रवेश; आत्तापर्यंत ९९ हजार ४९४ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

'आयटीआय'ऑनलाईन प्रवेश; आत्तापर्यंत ९९ हजार ४९४ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल मुंबई, दि. ३१ मे 'आयटीआय'ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या पंधरा दिवसांत सुमारे ९९ हजार ४९४ विद्यार्थांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ८७ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले असून ३५ हजार १२८ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. आयटीआयच्या प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी ४१९ शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार व ५८८ अशासकीय आयटीआयमध्ये ६१ हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार जागा आहेत. एक वर्ष कालावधीचे ४४ अभ्यासक्रम व दोन वर्ष कालावधीचे ३६ अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ मेपासून https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

रवींद्र वर्माने युद्धनौका व पाणबुड्यांची माहिती पुरविली

रवींद्र वर्माने मुंबई गोदीतील युद्धनौका व पाणबुड्यांची माहिती पाकिस्तानी तरुणीला पुरविली मुंबई, दि ३१ मे भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्याला पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला ठाण्यातील अभियंता रवींद्र वर्मा याने मुंबई गोदीतील युद्धनौका व पाणबुड्यांची संवेदनशील माहिती, रेखाचित्र व ध्वनिफीत नोट्स स्वरूपात दिल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.दहशतवाद विरोधी पथक अधिक तपास करत आहे. पाकिस्तान ‘इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह’ला मुंबई नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची माहिती दिल्याच्या आरोपाखाली कळवा येथे राहणाऱ्या अभियंता वर्मा याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने अटक केली‌. तो नवी मुंबईतील बेलापूर येथील खासगी कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करीत होता. तंत्रज्ञानाशी संबंधित असलेली ही कंपनी मुंबई नौदल गोदीला सेवा पुरविते. त्यानिमित्ताने वर्मा नौदल गोदीत येत जात होता.त्याच्याकडे नौदल गोदीचे नकाशे व छायाचित्रे मिळाल.समाज माध्यमावरून वर्माच्या संपर्कात असलेल्या एका तरुणीला ही माहिती त्याने पुरविली. ही तरुणी पाकिस्तानी गुप्तचर असल्याचा संशय असून हा 'हनी ट्रॅप'चा प्रकार असल्याचेसांगण्यात येत आहे.

शेजो न्यूज ॲण्ड व्ह्यूज ब्लॉग लवकरच नव्या स्वरूपात

लवकरच नव्या स्वरूपात नमस्कार, मी शेखर जोशी माझा https://shejonewsandviews.blogspot.com शेजो न्यूज ॲण्ड व्ह्यूज ब्लॉग लवकरच नव्या स्वरूपात सादर करत आहे.

सोमवार, २६ मे, २०२५

डोंबिवलीकर रमले 'अक्षरांच्या बागेत'!

डोंबिवलीकर रमले 'अक्षरांच्या बागेत'! -निनाद आजगावकर आणि सहकारी यांची भावसंगीत मैफल -तीन पिढ्यांनी सादर केली 'टाळ मृदंगाची धून' डोंबिवली, दि. २६ मे स्वरनिनाद आणि संगीतज्ञानानंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'अक्षरांच्या बागेत' या मराठी भाव संगीताच्या मैफलित डोंबिवलीकर मंत्रमुग्ध झाले. गायक निनाद आजगावकर आणि सहकारी गायकांनी अविट गोडीची सुरेल मराठी गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे ज्येष्ठ गायक व संगीतकार वसंत आजगावकर, त्यांचे सुपुत्र निनाद, निनाद यांच्या कन्या नीरजा या तीन पिढ्यांनी 'आली कुठुनशी कानी साद टाळ मृदुंगाची धून' हे अजरामर गाणे सादर केले. सर्वेश सभागृहात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मराठी भावसंगीताच्या सुवर्ण काळातील एकाहून एक अविट गाणी निनाद आजगांवकर, डॉ. शिल्पा मालंडकर आणि नीरजा आजगांवकर यांनी सादर केली. मिलिंद परांजपे ( कीबोर्ड), तुषार आग्रे (तबला), मनीष भुवड (हँडसॉनिक) यांनी संगीत साथ केली तर रश्मी आमडेकर यांनी निवेदन केले. ज्येष्ठ गायक वसंत आजगावकर कार्यक्रमास उपस्थित होते. श्रोत्यांच्या आग्रहावरून त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. कवी सोपानदेव चौधरी यांनी लिहिलेले आणि स्वतः आजगावकर यांनी संगीतबद्ध केलेले व गायलेले 'आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाची धून' हे अजरामर गाणे स्वतः आजगावकर, निनाद, नीरजा या तीन पिढ्यांनी सादर केले. उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपली दाद दिली. मराठी भावसंगीतात अमूल्य योगदान देणारे गीतकार, संगीतकार यांची लोकप्रिय तसेच अपरिचित गाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली.

कॅलिफोर्निया येथे तीन दिवसीय 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव

कॅलिफोर्निया येथे तीन दिवसीय 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव मुंबई, दि. २६ में सॅनहोजे, कॅलिफोर्निया येथे येत्या २५ ते २७ जुलै या कालावधीत नाफा' मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देऊळ' आणि 'भारतीय' चित्रपटांचे निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन'ची (नाफा) स्थापना करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पहिला 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव पार पडला होता. उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या सुमारे साडेपाच लाख मराठी माणसांपर्यंत मराठी चित्रपट पोहचविण्याचा प्रयत्न 'नाफा'च्या माध्यमातून घोलप करत आहेत. गेल्या वर्षीपासून दर महिन्याला एक मराठी चित्रपट 'उत्तर अमेरिका - कॅनडा'मध्ये प्रदर्शित होत आहेत. ‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘संगीत मानापमान’, ‘चिकीचीकी बुबुम्बुम’, ‘पाणी’, ‘गुलाबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘अशी ही जमवा जमावी’, ‘स्थळ’, ‘सलतात रेशीम गाठी’ इत्यादी चित्रपट आतापर्यंत अमेरिका आणि कॅनडामधील चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्रातील प्रदर्शनाच्याच दिवशी प्रदर्शित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील मातब्बर निर्मिती व वितरण संस्थांसोबत नाफाने करार केले आहेत. आमच्या 'देऊळ’ चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्ण-कमळ पुरस्कार मिळाल्यानंतर उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करावी असा विचार मनात होता. या विचाराशी सहमत असलेले पाचशेहून अधिक सदस्य अल्पावधीतच या कामाशी जोडले गेले. दोन लघुपटाची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून ‘फिल्म क्लब’च्या तयारीला लागलो. अनेक कलावंत, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफर्स, संकलक यांनी फिल्म क्लबमध्ये नोंदणी केली. त्यासाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा आयोजित केली. याशिवाय टॉक शोज, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, सचिन खेडेकर, समीर चौघुले, अभिजीत देशपांडे यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून आमचे काम सुरू असल्याचे घोलप यांनी सांगितले. यावर्षीच्या 'नाफा''मराठी चित्रपट महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.