शनिवार, ३१ मे, २०२५

रवींद्र वर्माने युद्धनौका व पाणबुड्यांची माहिती पुरविली

रवींद्र वर्माने मुंबई गोदीतील युद्धनौका व पाणबुड्यांची माहिती पाकिस्तानी तरुणीला पुरविली मुंबई, दि ३१ मे भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्याला पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला ठाण्यातील अभियंता रवींद्र वर्मा याने मुंबई गोदीतील युद्धनौका व पाणबुड्यांची संवेदनशील माहिती, रेखाचित्र व ध्वनिफीत नोट्स स्वरूपात दिल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.दहशतवाद विरोधी पथक अधिक तपास करत आहे. पाकिस्तान ‘इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह’ला मुंबई नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची माहिती दिल्याच्या आरोपाखाली कळवा येथे राहणाऱ्या अभियंता वर्मा याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने अटक केली‌. तो नवी मुंबईतील बेलापूर येथील खासगी कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करीत होता. तंत्रज्ञानाशी संबंधित असलेली ही कंपनी मुंबई नौदल गोदीला सेवा पुरविते. त्यानिमित्ताने वर्मा नौदल गोदीत येत जात होता.त्याच्याकडे नौदल गोदीचे नकाशे व छायाचित्रे मिळाल.समाज माध्यमावरून वर्माच्या संपर्कात असलेल्या एका तरुणीला ही माहिती त्याने पुरविली. ही तरुणी पाकिस्तानी गुप्तचर असल्याचा संशय असून हा 'हनी ट्रॅप'चा प्रकार असल्याचेसांगण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: