सोमवार, १२ मे, २०२५

दहशतवादाच्या विरोधात'ऑपरेशन सिंदूर' हेच भारताचे धोरण- पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहशतवादाच्या विरोधात'ऑपरेशन सिंदूर' हेच भारताचे धोरण- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली, दि. १२ मे दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' हेच भारताचे यापुढे धोरण राहील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. ऑपरेशन 'सिंदूर' नंतर देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. 'ऑपरेशन सिंदूर' संपलेले नाही तर स्थगित करण्यात आले आहे. निर्दोष, निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या कुटुंबीयांसमोर अतिशय निर्घृणपणे गोळ्या घालून मारणे हा दहशतवादाचा बिभत्स, क्रूर चेहरा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ऑपरेशन 'सिंदूर' हे फक्त नाव नाही, तर देशाच्या कोट्यवधी नागरिकांच्या भावनेचे प्रतिबिंब, न्यायाची अखंड प्रतिज्ञा असल्याने सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, ६ मे च्या रात्री उशिरा आणि ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने आमच्या या प्रतिज्ञेला परिणामात बदलताना पाहिले. दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही. रक्त व पाणी एकाच वेळी वाहू दिले जाणार नाही. दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या विषयावरच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते‌. आम्ही आमच्या अटी व शर्तींवरच उत्तर देऊ, असेही पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: