सोमवार, १९ मे, २०२५
अधर्माचा प्रतिकारासाठी समाज घडविण्याची आवश्यकता- स्वामी गोविंद देवगिरीजी
अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला
तयार करण्याची आवश्यकता- स्वामी गोविंद देवगिरीजी
फोंडा, गोवा, दि. १८ मे
अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला तयार करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या आड येणार्या कायद्यांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून सनातन धर्माच्या प्रसाराचे कार्य ही साधना, ईश्वराची उपासना आहे, असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी रविवारी येथे केले.
सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोंडा गोवा येथे तीन दिवसीय सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवातील
‘सनातन राष्ट्र संकल्प’ सभेत ते बोलत होते.
सनातन संस्थेचे संपूर्ण कार्य आध्यात्मिकतेच्या पायावर उभे असून सनातन संस्था भारत राष्ट्राला एक समजून काम करत आहे. श्रीमद् भगवद्गीता युद्धाच्या भूमीवर सांगितलेला ग्रंथ असून सनातन संस्थेनेही या ग्रंथाप्रमाणेच अध्यात्मापासून युद्धापर्यंत जागृती केली असल्याचे स्वामी गोविंद देवगिरीजी म्हणाले.
सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करा, असे आवाहन उत्तरप्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी केले. अल्पसंख्यांकांमुळेच लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर यांसह अनेक समस्यांना हिंदू बळी पडत आहेत. प्रतिदिन १० हजार लोकांचे धर्मांतर होत आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर आहे, असे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले. ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘धर्मदूत’ बनण्याचा संकल्प करू या, असे चारुदत्त पिंगळे म्हणाले.
अयोध्या येथील महंत श्री राजूदासजी महाराज, स्वामी बालकानंद गिरीजी महाराज, सुदर्शन वाहिनीचे सुरेश चव्हाणके, स्वामी आनंद स्वरूप, धर्मयशजी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा