शुक्रवार, १६ मे, २०२५

अंदमानला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार

अंदमान येथील सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार - सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार पोर्ट ब्लेअर, दि. १६ मे अंदमान येथील सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे.त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी शुक्रवारी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि सावरकर स्मारकाबाबतची महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली. ॲड शेलार अंदमान निकोबार दौऱ्यावर असून त्यांनी सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या काळ कोठडीत ठेवण्यात आले होते तिथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले. सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी कारावास भोगला त्या सेल्युलर जेलचा परिसर, अंदमान निकोबार या बेटाशी महाराष्ट्रातील तमाम सावरकरप्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडल्या गेल्या आहेत.या परिसरात सावरकरांचे उचित स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे.याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही विनंतीपत्र लिहिले असल्याचे ॲड.‌शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या स्मारकाच्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांचे भव्य पुतळे,शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना असल्याचे ॲड. शेलार म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: