मंगळवार, २० मे, २०२५
हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण आवश्यक
फोंडा,गोवा, दि. २० मे
हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण होणे आवश्यक असून हिंदू बलशाली व्हायलाच हवा, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी येथे केले.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात‘सनातन राष्ट्र आणि डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य'या सत्रात ते ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ या विषयावर बोलत होते.
‘चाणक्य फोरम’चे मुख्य संपादक तथा सेवानिवृत्त मेजर गौरव आर्य,पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रधान, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव,हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे समन्वयक सुनील घनवट व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या सरकारने याकडे लक्ष दिले नाही. हिंदू बलशाली होण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशाचे अवमूल्यन झाले, असेही सावरकर म्हणाले.
राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते. साधूसंतांच्या रक्षणासाठी श्रीरामाचा जन्म झाला. मुघलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोविंदसिंग यांचा जन्म झाला, असे गौरव आर्य यांनी सांगितले.
हिंदूंना धर्मशिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणवर्ग सुरू केले सद्यस्थितीत देशात समितीच्या वतीने ५०० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत, अशी माहिती नंदकुमार जाधव यांनी दिली.
पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रधान म्हणाले,
महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, त्याप्रमाणे हिंदूंच्या आस्थेचा विचार करून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा