गुरुवार, १५ मे, २०२५

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास मनाई

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास मनाई - पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी ठाणे,दि.१५ ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. येत्या ३ जूनपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता २०१३च्या कलम २२३ आणि इतर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: