शुक्रवार, १६ जून, २०२३

एकत्रित आलेली हिंदू शक्ती हिंदु राष्ट्र निर्माणासाठी जोडली जाईल- डॉ. चारुदत्त पिंगळे


डावीकडून डॉ.चारुदत्त पिंगळे, हरिशंकर जैन, श्रीराम ज्ञानीदास महात्यागी महाराज, भागिरथी महाराज, भागवताचार्य (अधिवक्ता)  राजीवकृष्णजी महाराज झा, महंत दीपक गोस्वामी

एकत्रित आलेली हिंदू शक्ती हिंदु राष्ट्र 

निर्माणासाठी जोडली जाईल- डॉ. चारुदत्त पिंगळे 

‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या उद्घोषात हिंदू राष्ट्र अधिवेशन  सुरू

फोंडा, गोवा. 

‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव’ म्हणजे एक प्रकारचे लोकमंथन असून या लोकमंथनातून एकत्रित आलेली ही हिंदू शक्ती हिंदू राष्ट्र निर्माणाच्या विश्वकल्याणकारी कार्यासाठी जोडली जाईल, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी आज (शुक्रवारी) येथे केले.


हिंदू जनजागृती समितीतर्फे श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या ‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवा’च्या अर्थात ‘हिंदू राष्ट्र अधिवेशना’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

खालिस्तानचा आतंकवाद, श्रीरामनवमी-हनुमानजयंती अशा सणांना दंगलींचे वाढलेले प्रमाण, समलिंगी विवाहाचे समर्थन,‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या व्यभिचाराला मान्यता, अश्लीलतेचे वाढते प्रस्थ, अनैतिकतेला संवैधानिक करण्याचे प्रयत्न यांसह अनेक आव्हाने सध्या हिंदूंसमोर आहेत. या सर्व समस्यांवर ‘सेक्युलर’ राज्यव्यवस्थेत कोणतेही उत्तर नसून शाश्वत हिंदु राष्ट्र हेच त्यावर उत्तर आहे, असेही डॉ. पिंगळे यांनी सांगितले. 



‘हलाल’च्या माध्यमातून चालू असणार्‍या आर्थिक आक्रमणाला उत्तर दिले पाहिजे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्र, व्यवसाय मुसलमान ताब्यात घेत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक व्यवसायात हिंदूंना जोडून आपली आर्थिक शक्ती वाढवून त्याला उत्तर द्यावे लागेल, असे मुंबई- दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले.

सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले लिखित अनमोल शिकवण’ (खंड १) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’, या हिंदी आणि मराठी या ग्रंथाचे प्रकाशन भागवताचार्य श्री राजीवकृष्णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, 

रामज्ञानीदास महात्यागी महाराज, अधिवक्ता हरिशंकर जैन, महंत दीपक गोस्वामी यांच्या हस्ते, तर डोंबिवली येथील दुर्गेश परुळकर यांच्या ‘महाभारतातील अलौलिक चरित्रे : खंड १, निष्काम कर्मयोगी भीष्म’ या ग्रंथाचे प्रकाशन दुर्गेश परुळकर, डॉ. चारुदत्त पिंगळे, केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर, प.पू. यतीमाँ चेतनानंद सरस्वती यांच्या हस्ते झाले. 

अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. दीपप्रज्वलनानंतर वेदमंत्रांचे पठण झाले. सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सत्यवान कदम यांनी केले.

 श्रृंगेरी येथील दक्षिणम्नाय श्री शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री भारती तीर्थ महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज यांचा ध्वनीचित्रफित संदेश दाखविण्यात आला. कर्नाटक येथील पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामी यांच्या संदेशाचेही वाचन करण्यात आले. 

अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदू जनजागृती समितीच्या HinduJagruti.org या संकेतस्थळावर तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेलवर करण्यात येत आहे. येत्या २२ जूनपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

१६ जून २०२३



बुधवार, १४ जून, २०२३

हिंदू राष्ट्र अधिवेशनात ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा

हिंदू राष्ट्र अधिवेशनात ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा  

हिंदू जनजागृती समितीतर्फे १६ ते २२ जून या कालावधीत फोंडा गोवा येथे होणा-या ११ व्या हिंदू राष्ट्र अधिवेशनात 'गोवा फाईल्स' वर चर्चा होणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पणजी, गोवा येथे दिली.

हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.‌ हिंदू जनजागृती समितीचे धर्मप्रचारक नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदू विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव, अधिवक्ता नागेश जोशी यावेळी उपस्थित होते.

काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला ‘दी कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने वाचा फोडली. त्यानंतर ‘दी केरळ स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना धर्मांतरित करून त्यांचा जिहादी आतंकवादासाठी वापर करण्याचे षड्यंत्र मांडण्यात आले. गोव्यातही पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझीशन’च्या नावाखाली जनतेवर केलेले अमानवी अत्याचार संपूर्ण देशाला कळणे आवश्यक आहे, असे शिंदे म्हणाले.

ख्रिस्ती धर्मगुरु पोप विश्वभरात अनेक ठिकाणी जाऊन ख्रिस्त्यांकडून झालेल्या अमानुष अत्याचारांची जाहीर माफी मागत असतात. तशी माफी गोव्यातील जनतेची त्यांनी आतापर्यंत का मागितलेली नाही ? असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला.

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महाराष्ट्रभरातील मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता राबवण्याचा उपक्रम चालू आहे. आतापर्यंत 131 हून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू केली असून देशभरात त्याचे मोठ्या प्रमाणात अनुकरण चालू झाले आहे. उत्तराखंड राज्यातही तीन मंदिरांनी याचे अनुकरण केले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, देहली आदी राज्यांतही याप्रमाणे राज्यस्तरीय मंदिर परिषदांचे भविष्यात आयोजन करण्यात येणार आहे, असे ‘सनातन संस्थे’चे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सांगितले.‌ 

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक नीलेश सिंगबाळ म्हणाले, या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, काशी-ज्ञानवापी मुक्तीसाठी न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, तेलंगाणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक कपिल मिश्रा, ‘विश्व हिंदु परिषदे’चे संपर्कप्रमुख धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांच्यासह अनेक उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. 

हिंदू राष्ट्राचे आंदोलन संवैधानिक मार्गाने होण्यासाठी, तसेच हिंदुहिताच्या मुद्द्यांवर न्यायालयीन संघर्ष करण्यासाठी अधिवक्त्यांची मोठी भूमिका आहे. या दृष्टीने या हिंदु राष्ट्र महोत्सवात दीडशेहून अधिक अधिवक्ते सहभागी होणार असल्याची माहिती हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नागेश जोशी यांनी दिली.‌

या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय पातळीवर, तसेच राज्य आणि जिल्हा पातळीवर हिंदु संघटनांच्या एकत्रिकरणातून ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करण्यासाठी प्रत्यक्ष नियोजन करण्यात येणार आहे. अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीच्या HinduJagruti.org या संकेतस्थळावर तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या फेसबुक पेजवरद्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.




शनिवार, १० जून, २०२३

हे कसले राष्ट्रवादी हे तर राष्ट्रघातकी

बहुसंख्य हिंदूंच्या भावनांची काळजी न करता धर्मांध, आक्रमक मुसलमान, ख्रिश्चन यांची काळजी ज्यांना वाटते, क्रूरकर्मा औरंगजेबाचे छायाचित्र स्टेटसला ठेवल्यानंतर कोल्हापुरात ताण तणाव निर्माण झाला म्हणून बहुसंख्य हिंदूंना दोषी ठरविणारे, पण मुळात क्रूरकर्मा औरंगजेबाचे स्टेटस का ठेवले? असा प्रतिप्रश्न न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला क्रूरकर्मा औरंगजेबाचा इतका पुळका का येतो? हा खरा प्रश्न आहे. आधी औरंगाबाद येथे संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे छायाचित्र नाचविल्यानंतर तसेच कोल्हापूर येथे औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यानंतर जो ताण तणाव, वाद निर्माण झाला त्यावर पवार यांनी मुळात क्रूरकर्मा औरंगजेबाचे छायाचित्र मिरवणुकीत का नाचवले? आक्षेपार्ह स्टेटस का ठेवले? याबद्दल चकार शब्द काढला नाही किंवा ज्या लोकांनी जाणीवपूर्वक छायाचित्र नाचवले, स्टेटस ठेवले ती कृती चुकीची, देशविघातक, समाजविघातक आहे, या चुकीबद्दल जे दोषी असतील त्यांना कायद्याने जी काही शिक्षा असेल ती झालीच पाहिजे, असे वक्तव्यही पवारांनी केले नाही. मात्र त्याचवेळी, काही लोक चुकीचे वागत असतील पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर, राज्य शासनाने सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही परिस्थिती बदलेल, शांतता प्रस्थापित होईल. त्याला सर्वांनी साथ द्यावी असे मात्र साळसूदपणे सांगतात. उपदेशाचा डोस हिंदूनाच पाजतात, हे अनाकलनीय आहे. हिंदूंनी जशास तसे उत्तर दिले त्याची पोटदुखी शरद पवार यांना झाली असावी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच मुस्लिमांचे लागूंचालन करत असतील, औरंगजेबाची भलामण करणा-यांच्या विरोधात मुग गिळून गप्प बसत असतील तर त्यांचे बगलबच्चे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपल्या साहेबांचीच री ओढणार. ते ही औरंगजेबाचीच भलामण, उदात्तीकरण करणार यात नवल ते काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष इलियास किरमाणी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहिले आणि औरंगाबाद जिल्ह्यात औरंगजेबाच्या महालाचे/ वास्तूचे संवर्धन करावे, अशी मागणी केली होती. याआधीही शरद पवार यांचे मानसपुत्र असलेल्या जीतेंद्र आव्हाड यांनाही औरंगजेबाचा पुळका आला होता. औरंगजेबाने संभाजीराजांना जिथे मारले तिथे विष्णूचेही मंदिर होते. औरंगजेब जर हिंदू द्वेष्टा असता तर त्याने हे मंदिरही फोडले असते, असे विधान आव्हान यांनी केले होते. मात्र सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आव्हाड यांनी सारवासारव केली. अहमदनगर, कोल्हापूर, संभाजीनगर, बीड येथे औरंगजेबाच्या पोस्टर भरून तणाव निर्माण झाला. मुळात क्रूरकर्मा औरंगजेब किंवा टिपू सुलतान हे भारताचे, हिंदुस्थानाचे राष्ट्रपुरुष नाहीत. ते आक्रमक आणि हिंदुद्वेष्टेच होते. त्यांनी भारतातील अनेक मंदिरे फोडली, हिंदू आया बहिणींवर अत्याचार केले. अशा क्रूरकर्मा औरंगजेब आणि टिपू सुलतानचा पुळका शरद पवार यांना किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला का येतो? हा खरा प्रश्न आहे. संभाजीनगर येथे बोलताना शरद पवार यांनी, मी संभाजीनगर म्हणणार नाही तर औरंगाबादच म्हणणार असे वक्तव्य केले. मात्र या वादग्रस्त वक्तव्यावर समाज माध्यमातून टीका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार असे बोललेच नाहीत असे सांगण्यात आले. कोल्हापुरातील घटनेनंतर लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही त्यामुळे दोन समाजात कटूता निर्माण होते असे आश्चर्यकारक, चीड आणणारे विधानही शरद पवार यांनी केले. शरद पवार यांना येथील मुस्लिम, ख्रिश्चन यांची काळजी वाटते. मात्र बहुसंख्या हिंदूंची काळजी वाटत नाही हे दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना 'जाणता राजा' म्हणू नका कारण समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना या नावाने संबोधले होते, असे पवार म्हणतात तर पुण्यात लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प एका रात्रीत हटविल्यानंतर ती कृती अयोग्य होती असे पवार कधीही बोलत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचेच पर्यायाने शरद पवार यांचे पिल्लू असलेल्या संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी ब्राह्मण ज्ञातीबद्दल आक्षेपार्ह टीका केली. पण त्याबाबत साधा निषेधचा सुरही पवार यांनी कधी आळवला नाही. ऋषितुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पवारांचेच मानसपुत्र जीतेंद्र आव्हाड यांनी अश्लाघ्य शब्दात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली. परंतु पवार यांनी आव्हाड यांचे कान उपटले नाहीत. पुरंदरे यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवरून अत्यंत खालच्या पातळीवरील शेरेबाजी त्यांच्याविषयी करण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आणि बगलबच्चे मोठ्या प्रमाणात होते. मात्र त्यावेळीही शरद पवार यांनी आपली नापसंती व्यक्त केली नाही. समाज माध्यमांतून अशा प्रकारची शेरेबाजी करणे, टीका करणे चुकीचे, अयोग्य आहे असेही कधी म्हणाले नाहीत. रामनवमी, गुढीपाडवा, शिवराज्याभिषेक दिन या दिवशी अर्थात हिंदूं सण, हिंदू अस्मिता दिनाच्यादिवशी धर्मांध मुस्लिमांकडून हिंदूंच्या मिरवणुकीवर, शोभायात्रांवर दगडफेक होते. मात्र तेव्हाही पवार कधी अवाक्षर काढत नाहीत. काही वर्षांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्लामी दहशतवादी विरोधात कठोर पावले उचलू असे वक्तव्य केले. त्यावेळी पवारांचा बगलबच्चा असलेल्या जीतेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केले. आता फ्रान्समधील घटनेचा भारताशी काय संबंध? किंवा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्लामी दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलू असे म्हटले तर आव्हाड किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात दुखायचे कारण काय? पण त्यावेळीही पवार यांनी आव्हाडांना खडसावले नाही. याच आव्हाडांनी पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँ या दहशतवादी तरुणीच्या नावाने रुग्णवाहिका सुरु केली. तेव्हाही पवार यांना जाब विचारावा वाटला नाही. याच आव्हाडांनी पॅलेस्टाईनमधील मुसलमानांना पाठिंबा म्हणून इथे 'सेव्ह गाझा' असे टी शर्ट घालून आंदोलन केले होते. तेव्हाही पवार यांनी चकार शब्द काढला नाही. म्यानमारमधील घटनेच्या निषेधार्थ मुंबईत रझा अकादमीने मोर्चा काढला. दंगल घडवली, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या 'अमर जवान ज्योती' ची नासधूस केली. मात्र त्याविरुद्धही शरद पवार यांनी कधी तोंड उघडले नाही. माजी खासदार निलेश राणे यांनी पवारांची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार आहेत असे ट्विट राणे यांनी केले होते. शरद पवार यांच्यावर समाज माध्यमातून अनेकदा 'बाबरमतीकर' अशी टीका केली जाते किंवा त्यांची तुलना औरंगजेबाशी केली जाते. इथे एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की समाज माध्यमांतून अशा प्रकारची टीका किंवा औरंगजेबाशी तुलना शरद पवार यांचीच का केली जाते? काँग्रेसचे नेतेही मुस्लिम लांगूलचालन करतात. पण काँग्रेसच्या नेत्यांची कधी औरंगजेबाशी तुलना केली गेली नाही. शरद पवार यांच्यावर या विषयावर जेवढी टीका केली जाते, तशी काँग्रेस नेत्यांवर का केली जात नाही? दरवेळी आपली किंवा आपल्याच पक्षाची तुलना औरंगजेबाशी का केली जाते? असा प्रश्न शरद पवार यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी स्वतःला विचारावा. पक्षाच्या नावात 'राष्ट्रवादी' असले तरी आपले विचार, कृती आणि उक्ती ही त्या विरोधात आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही कसले राष्ट्रवादी तुम्ही तर राष्ट्रघातकी असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. शेखर जोशी

मंगळवार, ३० मे, २०२३

बुरख्याच्या सक्तीला 'मूर्खपणा' म्हणण्याची हिंमत दाखविणार का?

बुरख्याच्या सक्तीला 'मूर्खपणा' म्हणण्याची हिंमत भुजबळ पुरोगामी आणि ब्रिगेडी मंडळी दाखवतील का? - हिंदू जनजागृती समितीचा सवाल मक्केतील ‘काबा’चे दर्शन घेण्यासाठी जाणारे सर्व मुसलमान पुरुष ‘पुजार्‍यांप्रमाणेच’ कमरेच्यावर वस्त्र घालत नाहीत, त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणण्याची हिंमत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांमध्ये आहे का ? मुसलमान महिलांची इच्छा असो वा नसो, त्यांच्यावर बुरख्याची सक्ती केली जाते, याला ‘मूर्खपणा’ म्हणण्याची हिंमत भुजबळ, पुरोगामी आणि ब्रिगेडी मंडळी दाखवतील का ? असा परखड प्रश्न हिंदू जनजागृती समितीने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील विविध मंदिरांनी लागू केलेल्या वस्त्रसंहितेवर टीका करतांना ‘मंदिरातील पुजारी उघडेबंब असतात. त्यांना पूर्ण कपडे घालण्यासाठी सांगा’, अशी हिंदु धर्माप्रती द्वेष दर्शवणारी टीका केली. त्याचाही समितीने तीव्र निषेध केला आहे. हेच लोक ‘हिजाब’चे समर्थन करतात आणि मंदिरांतील वस्रसंहितेवर टीका करतात, हा तथाकथित पुरोगाम्यांचा दुतोंडीपणा आहे. पोलिसांचा खाकी गणवेश, डॉक्टरांचा पांढरा कोट, वकीलांचा काळा कोट हे धर्मनिरपेक्ष शासनाने योजलेले ‘ड्रेसकोड’ चालतात. स्वत: भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतांना राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत ‘वस्त्रसंहिता’ लागू केली होती. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी यांना जीन्स पँट, टी-शर्ट, भडक रंगाचे वा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच स्लीपर वापरता येणार नाही. केवळ शोभनीय वस्त्र घालण्याचा नियम केला होता; मात्र मंदिरात केवळ संस्कृतीप्रधान वस्त्र घालण्याचे आवाहनही यांना चालत नाही. हा भारतीय संस्कृतीद्वेषच आहे. अशी भारतीय संस्कृती विरोधी भूमिका घेणार्‍यांना येत्या काळात जनता धडा शिकवेल, असे समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे

अमरावती येथील ८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार

अमरावती येथील ८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार - महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी नागपूर नंतर आता अमरावती येथील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर श्री. महाकाली शक्तीपीठ येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली.
अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थान, श्री महाकाली शक्तीपीठ,, श्री. बालाजी मंदिर (जयस्तंभ चौक), श्री. पिंगळादेवी देवस्थान (नेर पिंगळाई), श्री. संतोषी माता मंदिर, श्री. आशा-मनिषा देवी संस्थान (दर्यापूर), श्री. लक्ष्मी-नारायण देवस्थान (देवळी, अचलपूर), श्री. शैतुतबाग हनुमान मंदिर (परतवाडा), श्री. दुर्गामाता मंदिर, वैष्णौधाम या मंदिरांसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील २५ मंदिरांमध्ये येत्या २ महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आले. श्री महाकाली शक्तीपीठाचे पीठाधीश्वर पू. श्री. शक्ती महाराज देवस्थान सेवा समितीचे सचिव अनुप जयस्वाल यांनीही मनोगत व्यक्त केले. अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानच्या कोषाध्यक्ष मीनाताई पाठक

सोमवार, २९ मे, २०२३

देश आणि धर्म वाचविण्यासाठी हिंदू बोलत असतील तर ते 'हेट स्पीच’ आहे का ?

देश आणि धर्म वाचविण्यासाठी हिंदू बोलत असतील तर ते 'हेट स्पीच’ आहे का ? अधिवक्ता सुभाष झा यांचा परखड सवाल भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, आपला देश आणि धर्म वाचविण्याविषयी हिंदू बोलत असतील, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ? असा परखड प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ते सुभाष झा यांनी उपस्थित केला. हिंदू जनजागृती समिती आयोजित ‘हेट स्पीच’ की हिंदूंना लक्ष्य करण्याचे साम्यवादी षडयंत्र ?’या विषयावरील दूरदृश्य प्रणाली संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या देशात हिंदूंविरोधात अनेक राजकीय नेते आणि हिंदूविरोधी लोक नियमितपणे ‘हेट स्पीच’ करत आहेत, त्याविषयी कोणत्याही न्यायालयात अर्ज दाखल केला जात नाही. ‘हेट स्पीच’ म्हणजे काय ?’ याची व्याख्या सुस्पष्ट होणे आवश्यक आहे. सध्या न्यायाधीश निर्णय देतांना कायदे बनवायला लागले आहेत. कायदे बनवणे, हे न्यायाधीशांचे काम नसून ते संसदेचे काम आहे, असेही झा यांनी सांगितले. भारतात हिंदू आपल्या अस्तित्त्वाची लढाई लढत आहेत. गेल्या काही दशकांत निर्माण झालेले अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार, पाकिस्तान आदी देश भारतापासून तोडण्यात आले. यातील अनेक इस्लामी राष्ट्रे झाली. सध्या भारताचे इस्लामीकरण करण्याचा प्रयोग चालू आहे. या देशाचे पुन्हा अनेक तुकडे करून देशाचे विभाजन केले जाईल, या धोक्याविषयी हिंदूंना सजग केले पाहिजे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले नाही, तर भारताचे इस्लामीकरण होण्यास वेळ लागणार नाही,याकडेही झा यांनी लक्ष वेधले.
अमेरिकेमध्ये ‘इस्लामोफोबिया’विषयी कायदा करण्यात आला आहे. भारतात असा कायदा करता येणार नाही, म्हणून ‘हेट स्पीच’ ही पुढील आवृत्ती आणली आहे. हिंदूंच्या विविध सभांमधून हिंदूंमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे जिहादी अस्थिर झाले आहेत. हिंदूंच्या सभांत बोलणारे वक्ते, आयोजक यांच्याविरोधात तक्रारी दाखल करून त्यांच्यामध्ये भीती निर्माण केली जात आहे, असे ‘सुदर्शन चॅनल’चे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके म्हणाले.
२००८ पासून दरवर्षी जळगावमध्ये आम्ही हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेऊन जनजागृती करत आहोत.पण २५ डिसेंबर २०२२ या दिवशी सभा घेतल्यावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी कुठलीही घटना घडली नाही. तरीही प्रशासनावर दबाव आणून ९ मे २०२३ या दिवशी हिंदूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. २०१२ मध्ये मुंबईत रझा अकादमीने सभा घेऊन दंगल घडविली; मात्र वक्त्यांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. जळगावमध्ये काही झालेले नसतांना हिंदूंवर ‘हेट स्पीच’चे गुन्हे दाखल होतात, हे मोठे षड्यंत्र असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी सांगितले.

आता काही वर्षांत वंदे मेट्रो उपनगरी रेल्वे

आता काही वर्षांत वंदे मेट्रो उपनगरी रेल्वे मुंबईकरांचा प्रवास गारेगार आणि सुखकर वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर आता येत्या काही वर्षात मुंबईतील उपनगरीय प्रवाशांना वंदे मेट्रो उपनगरी रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे वंदे भारत एक्सप्रेस च्या धरतीवर २३८ वंदे मेट्रो उपनगरी लोकल मुंबईकरांना मिळणार आहेत. २३८ वातानुकलीत वंदे मेट्रो उपनगरी रेल्वेसाठी सुमारे २१ हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षात पहिली आणि पाच वर्षात संपूर्ण लोकल उपलब्ध होऊ शकतील केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ या तिघांच्या माध्यमातून या लोकलच्या बांधणीसाठी निधी उभारण्यात येणार आहे. सध्याच्या उपनगरी लोकल ११० किलोमीटर वेगाने धावतात, तर वंदे मेट्रो उपनगरी लोकलही १३० किलोमीटर वेगाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर राजधानी एक्सप्रेस १३० किलोमीटर वेगाने धावते त्यामुळे भविष्यात आता मुंबई उपनगरी लोकलही याच वेगाने जाऊ शकते. या २३८ वातानुकूलित वंदे मेट्रो उपनगरी रेल्वेसाठी स्वतंत्र कार शेड उभारण्यात येणार आहे त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई वंदे मेट्रो उपनगरी रेल्वेच्या पहिल्या आणि शेवटच्या डब्यातून माल वाहून नेण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ----