सोमवार, १९ मे, २०२५
अधर्माचा प्रतिकारासाठी समाज घडविण्याची आवश्यकता- स्वामी गोविंद देवगिरीजी
अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला
तयार करण्याची आवश्यकता- स्वामी गोविंद देवगिरीजी
फोंडा, गोवा, दि. १८ मे
अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला तयार करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या आड येणार्या कायद्यांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून सनातन धर्माच्या प्रसाराचे कार्य ही साधना, ईश्वराची उपासना आहे, असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी रविवारी येथे केले.
सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोंडा गोवा येथे तीन दिवसीय सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवातील
‘सनातन राष्ट्र संकल्प’ सभेत ते बोलत होते.
सनातन संस्थेचे संपूर्ण कार्य आध्यात्मिकतेच्या पायावर उभे असून सनातन संस्था भारत राष्ट्राला एक समजून काम करत आहे. श्रीमद् भगवद्गीता युद्धाच्या भूमीवर सांगितलेला ग्रंथ असून सनातन संस्थेनेही या ग्रंथाप्रमाणेच अध्यात्मापासून युद्धापर्यंत जागृती केली असल्याचे स्वामी गोविंद देवगिरीजी म्हणाले.
सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करा, असे आवाहन उत्तरप्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी केले. अल्पसंख्यांकांमुळेच लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर यांसह अनेक समस्यांना हिंदू बळी पडत आहेत. प्रतिदिन १० हजार लोकांचे धर्मांतर होत आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर आहे, असे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले. ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘धर्मदूत’ बनण्याचा संकल्प करू या, असे चारुदत्त पिंगळे म्हणाले.
अयोध्या येथील महंत श्री राजूदासजी महाराज, स्वामी बालकानंद गिरीजी महाराज, सुदर्शन वाहिनीचे सुरेश चव्हाणके, स्वामी आनंद स्वरूप, धर्मयशजी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.
शनिवार, १७ मे, २०२५
सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला सुरुवात;
सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ
- गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
फोंडा,गोवा- दि. १७ मे
गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदू धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे केले.
सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक
डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ ते १९ मे या कालावधीत फार्मागुडी,फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ.सावंत बोलत होते.
गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री बह्मेशानंद स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते देवकीनंदन ठाकूर,केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक,भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, ‘सुदर्शन न्यूज’चे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस,अभय वर्तक उपस्थित यावेळी होते.
पूर्वी गोव्यात लोक समुद्र तसेच अन्य गोष्टी पाहाण्यासाठी येत होते. गोव्यात सनातन संस्थेचे कार्य सुरू झाल्यानंतर आता नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी गोव्यात येतात. गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सवामुळे
येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेल, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने डॉ. जयंत आठवले यांना शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला, तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी डॉ.आठवले यांच्या हस्ते मुख्ममंत्री डॉ. सावंत यांच्याकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला.
सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत असून हा ऐतिहासिक क्षण आहे, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.गोवा ही ‘बीच’वर बसण्याची नव्हे,तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी असल्याचे देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितले.राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवून शक्तीची उपासना करा,असे आवाहन ब्रह्मेशानंद स्वामी यांनी केले. सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव धर्मभक्तांना आध्यात्मिक बळ,नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करेल, असे चेतन राजहंस यांनी सांगितले.खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार
गोव्याचे वीजमंत्री श्री. सुदीन ढवळीकर, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची अधिक माहिती
SanatanRashtraShankhnad.in या
संकेतस्थळावर मिळू शकेल.
कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उदघाटन
कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या
नूतन इमारतीचे रविवारी उदघाटन
कल्याण, दि. १७ मे
कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे
उदघाटन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
नूतन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याणमधील चक्की नाका, सेंट लॉरेन्स स्कूलजवळ, उंबर्डे येथे बांधण्यात आले आहे.
शुक्रवार, १६ मे, २०२५
अंदमानला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार
अंदमान येथील सेल्युलर जेल परिसरात
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार
- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार
पोर्ट ब्लेअर, दि. १६ मे
अंदमान येथील सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे.त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी शुक्रवारी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि सावरकर स्मारकाबाबतची महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली.
ॲड शेलार अंदमान निकोबार दौऱ्यावर असून त्यांनी सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या काळ कोठडीत ठेवण्यात आले होते तिथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.
सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी कारावास भोगला त्या सेल्युलर जेलचा परिसर, अंदमान निकोबार या बेटाशी महाराष्ट्रातील तमाम सावरकरप्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडल्या गेल्या आहेत.या परिसरात सावरकरांचे उचित स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे.याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही विनंतीपत्र लिहिले असल्याचे ॲड.शेलार यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या स्मारकाच्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांचे भव्य पुतळे,शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना असल्याचे ॲड. शेलार म्हणाले.
'शंखनाद महोत्सवा'च्या निमित्ताने गोव्यात वाहन फेरी
'शंखनाद महोत्सवा'च्या निमित्ताने गोव्यात भव्य वाहन फेरी
फोंडा (गोवा), दि. १६ मे
फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून सुरू होणा-या 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्
निमित्ताने शुक्रवारी येथे भव्य वाहनफेरी काढण्यात आली.दुचाकी, चारचाकी आणि बस गाड्यांचा यात समावेश होता.
भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अरुण देसाई यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन केल्यानंतर फोंडा येथील सनातन आश्रमापासून वाहनफेरीला सुरुवात झाली.पुढे कवळे -तिस्क फोंडा, शांतीनगर जंक्शन, गोवा बागायतदार, फोंडा पोस्ट ऑफीस कार्यलय-फोंडा येथील जुने बसस्थानक-श्री हनुमान मंदिर, कुर्टी-फर्मागुडी येथील किल्ल्याजवळ सांगता झाली. वाहनांवर फडकणारे भगवे ध्वज
उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.‘हर हर महादेव’,‘सनातन धर्माचा विजय असो,‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले, ही वाहनफेरी म्हणजे भक्तीची दिव्य वारी आहे.
महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी तसेच थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट
द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
गुरुवार, १५ मे, २०२५
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास मनाई
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास मनाई
- पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी
ठाणे,दि.१५
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. येत्या ३ जूनपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता २०१३च्या कलम २२३ आणि इतर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
बुधवार, १४ मे, २०२५
दृष्टीदोषावर मात करून शार्दुल औटी शाळेत प्रथम
दृष्टीदोषावर मात करून शार्दुल औटी
शाळेत ९७.८० टक्के गुण मिळवून प्रथम
डोंबिवली, दि. १४ में
दृष्टीदोषावर मात करून शार्दुल औटी या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवून टिळकनगर शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला.
कु.शार्दुल वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून दृष्टीदोषाने ग्रासलेला आहे. शार्दुलच्या डोळ्यांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून आता त्याच्या एकाच डोळ्याला दृष्टी आहे. आपल्या दृष्टीदोषावर जिद्दीने, चिकाटीने मात करून अथक परिश्रमाने त्याने हे यश संपादन केले आहे.
स्वबळावर व स्वकर्तृत्वावर परीक्षा देण्याची इच्छा असल्याने दिव्यांग असूनही त्याने परीक्षेसाठी त्यासंदर्भात कोणतीही सवलत घेतली नाही ही बाब विषेश उल्लेखनीय. शार्दुलला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन आयआयटी संगणक अभियांत्रिकीशाखेत पुढील शिक्षण घ्यायचे आहे.
पालक आणि शाळेचे शिक्षक यांच्याकडून शार्दुलला मोलाचे मार्गदर्शन लाभले. शार्दुलच्या यशाबद्दल टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर पालकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...








