
मुंबई, दि.१
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. मार्च २०२५ मध्ये मुख्यमंत्री सहाा्यता निधी कक्षामार्फत २ हजार ५१७ रुग्णांना २२ कोटींहून अधिक रकमेची मदत करतात आली. या आर्थिक मदतीतील सर्वाधिक मदत मेंदू विकारांवरील उपचारांसाठी करण्यात आली आहे.
मार्च महिन्यात मेंदू विकारांवरील उपचारांसाठी ४७१,कर्करोगावरील उपचारांसाठी ४२१,हिप रिप्लेसमेंटसाठी ३०६ रुग्णांना,
अपघातामधील शस्त्रक्रियेसाठी २४७, हृदयविकारांवरील उपचारांसाठी २३९,अपघातासंबंधित १८४, , गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी
१५०, बाल रोगांवरील उपचारांसाठी १४५ जणांना आर्थिक मदत देण्यात आली, अशी माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत आर्थिक मदत पोहोचविली जात आहे. समाजातील दानशुर व्यक्ती, संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहनही नाईक यांनी केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा