गुरुवार, ३ एप्रिल, २०२५
- राज्यात कुठेही,कुठल्याही जिल्ह्यात
घरांची नोंदणी करता येणार
मुंबई, दि. ३ एप्रिल
महाराष्ट्रात येत्या १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात कुठेही, कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येणार असून ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली.
घर खरेदी-विक्री नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावे लागते, अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतीमान सरकारच्या १०० दिवसांच कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरिक्षकांनी व महानिरिक्षकांनी ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आणली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
आधार कार्ड आणि आयकर दस्तऐवजांच्या मदतीने ऑनलाईन फेसलेस नोंदणी करता येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई आणि उपनगरांत ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, आता येत्या १ मेपासून संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
-
राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव? शेखर जोशी राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महो...
-
ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे ही छायाचित्रे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील आहेत. छ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा