सोमवार, २१ एप्रिल, २०२५

योगी आदित्यनाथ यांना शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण लखनऊ, दि. २१ एप्रिल सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा येथे येत्या १७ ते १९ मे या कालावधीत‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे निमंत्रण सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील (डॉ.) चारुदत्त पिंगळे, जौनपूर, मडियाहू विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्रकुमार पटेल,विश्वनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते. सनातन संस्था’निर्मित श्रीरामाचे सात्त्विक चित्र असलेली मोठी प्रतिमा हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेली ‘हिंदू राष्ट्र आवश्यक क्यो ?’, ‘हिंदू राष्ट्र स्थापना की दिशा’, ‘हिंदू राष्ट्र खंडण एवं आक्षेप’ आणि ‘हलाल जिहाद’ ही हिंदी भाषेतील पुस्तके मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेट देण्यात आली. सध्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. अधिकाधिक हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमांतून अधिकाधिक हिंदूंना संघटित करण्याचे काम सुरू ठेवावे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन संस्थेच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: