भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त डॉ.आंबेडकर
यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी भेट देण्याचा उपक्रम येत्या १४ व १५ एप्रिल या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने याचे आयोजन केले आहे. या उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मुंबईत दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. नागपूर येथील दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार ही ठिकाणेही पाहता येणार असल्याचे देसाई म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांचे विचार,सामाजिक योगदान आणि भारतीय राज्य घटनानिर्मितीतील त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सांगितले.
उपरोक्त शहरात वरील दोन्ही दिवशी बसगाडीद्वारे या ठिकाणांना भेट देता येणार आहे. अधिक माहिती व सहलीत सहभागी होण्यासाठी
९९६९९७६९६६- मुंबई, ९६०७५२७७६३/९६५७०२१४५६-नाशिक
९७६४४८१९१३/ ७२१८७८३५१५- नागपूर या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा