एखाद्या आजाराचे निदान करण्यासाठीच्या विविध तपासण्या, कराव्या लागणाऱया शस्त्रक्रिया, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयाचे भरमसाठ देयक या करता येणारा भरमसाठ खर्च सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय माणसांच्या आवाक्याबाहेरचा असतो. मेडिक्लेम पॉलिसी जरी असली तरीही अनेकदा या सगळ्या दिव्यातून पार पडताना डोळे पांढरे होतात. अनेकदा साठवलेली सर्व पुंजीही खर्च करावी लागते. अशा सध्याच्या परिस्थितीत सर्वसामान्यांसाठी आधार ठरेल अशी एक आगळी आरोग्यमय जीवन योजना जनसेवा हेल्थ केअरने सादर केली आहे. वसई येथे हे जनसेवा हेल्थकेअर रुग्णालय लवकरच सुरु होणार आहे. प्रसाद राऊत, डॉ.रत्नाकर पाटील, प्रतिक राऊत, अभिजित पंडित आणि शैलेश ठाकूर या पाच जणांनी एकत्र येऊन हे शिवधनुष्य उचलायचे ठरविले आहे. भारतात पहिल्यांदाच जनसेवा हेल्थकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून 'झीरो बिलिंग'हही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

जनसेवा हेल्थ केअर रुग्णालयाच्या माध्यमातून मर्यादित सदस्यत्व योजनेअंतर्गत ही सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. केवळ वसई-विरार नव्हे तर मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतातील कोणीही नागरिक याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत रुग्णालयाचे आणि रुग्णालयातील विविध आरोग्य सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी रुग्णालययाचे वार्षिक सभासद शुल्क भरुन सदस्य होणे आवश्यक आहे. सदस्यांसाठीच ही सेवा उपलब्ध असणार आहे. या सेवा-सुविधासांठी जनसेवा हेल्थकेअर रुग्णालयाने ठेवलेले वार्षिक शुल्क हे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना सहज परवडण्यासारखे आहे. ५ ते ५० या वयोगटासाठी एका व्यक्तीसाठीचे वार्षिक शुल्क अवघे १ हजार ५०० रुपये इतके आहे. ५० ते ७० आणि ७० वर्षांपुढील वयोगटासाठी ते अनुक्रमे २ हजार रुपये व २ हजार ५०० रुपये इतके एका व्यक्तीसाठीचे आहे. जी व्यक्ती सदस्य झालेली असेल त्या एका व्यक्तीलाच याचा लाभ घेता येणार आहे.

वार्षिक शुल्क भरुन सभासद झाल्यानंतर मोफत वैद्यकीय सल्ला (ओपीडी), मोफत हॉस्पीटलायझेशन (आयपीडी), मोफत वैद्यकीय चाचण्या (रक्त व लघवी), मोफत एक्स रे, सोनोग्राफी, ईसीजी या सुविधा त्या व्यक्तिला मिळणार आहेत. तसेच जनरल सर्जिकल विभाग, अस्थीरोगतज्ज्ञ विभाग, मुत्ररोगतज्ज्ञ विभाग, वैद्यकीय चाचणी विभाग, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया अतिदक्षता विभाग, मेडिसिन विभाग, एक्स रे विभााग, सोनग्राफी विभग, ईसीजी विभाग या मोफत विशेष सुविधा तसेच औषधांच्या दरात १० टक्के सवलतही मिळणार आहे. वसई-विरार भागातील पहिले आणि मोठे स्टेनलेस स्टीलचे ऑपरेशन थिएटर असणारेही हे पहिलेच रुग्णालय असणार आहे. मेडिसीन (मलेरिया, डेंग्यू, टॉयफाईड, हार्टअॅटॅक, उच्च रक्तदाब,मधुमेह, अर्धांगवात व अन्य आजार) ऑर्थोपेडिक (क्नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, लहान-मोठे फ्रॅक्चर्स, अपघात, स्पाईन सर्जरिज व इतर) जनरल सर्जरिज् (स्तनाचा कर्करोग, रेक्टल कॅन्सर, अॅपेंडिक्स, हर्निया, मूळ्याध व इतर) युरोल़ॉजी(ब्लॅडर कॅन्सर, मुतखडा व इतर), पॅथोलॉजी (सीबीसी, मलेरिया पॅरासाईट, रक्तगट, युरिन व स्टुल आरआयएम, रक्तातील साखर व ग्लुकोज, किडणी, लिव्हर, लिपीड प्रोफाईल, कोलेस्टेरॉल) आणि डायग्नोस्टिक्स (सर्व प्रकारचे एक्स रे सोनोग्राफी, इसीजी) आदी विभाग रुग्णालयात असणार आहेत. त्याचाही भरलेल्या वार्षिक शुल्कातच लाभ घेता येणार आहे.

जनसेवा हेल्थकेअर रुग्णालयाचे आणखी एक खास वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक सदस्याचे इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेक़ॉर्ड (ईएमआर) ठेवले जाणार असून ते सर्व्हरवर सुरक्षित असेल. या संपूर्ण रुग्णालययात ११० खाटा (बेड्स) असून एसआयसीयु व आयसीयुचे प्रत्येकी एक असे दोन आणि चार सर्वसाधारण वॉर्ड्स असणार आहेत. रुग्णालयासाठी २१ तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्स व इतर १५४ जण असा एकूण १७५ जणांचा स्टाफ असणार आहे.
या पाच जणांनी जनसेवा हेल्थकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून सुरु केलेला हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. त्याचे अन्य ठिकाणीही अनुकरण होणे आवश्यक आहे. सामाजिक संस्था, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या पातळीवरही असा उपक्रम सुरु करता येऊ शकेल. मात्र त्यासाठी प्रखर इच्छाशक्तीची गरज आहे.
या बाबत अधिक माहिती व संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक
९१६८४९०२०२/९९२३५५६४८३/९८६०९३०२२२