डोंबिवलीकर दिनदर्शिका-उद्योगशील नगरीचं प्रतिबिंब
डोंबिवली नगरी सुशिक्षीतांचे शहर म्हणून ओळखले जाते. विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल येथे असते. विविध क्षेत्रात उच्चपदावर काम करणारी अनेक मंडळी ही डोंबिवलीकरच आहेत. गुढीपाडव्याला अर्थात हिंदू नववर्षाच्या निमित्ताने आता मुंबईसह संपूर्ण राज्यभरात स्वागतयात्रा/ शोभायात्रा काढण्यात येतात. पण त्याची मुहूर्तमेढ डोंबिवलीने रोवली आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱया कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणूनही डोंबिवलीकडे पाहिले जाते. अशा या डोंबिवलीत नेहमीच काहीतरी आगळे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण संपादक आणि प्रकाशक असलेल्या 'डोंबिवलीकर'मासिकाने प्रकाशित केलेली 'डोंबिवलीकर' दिनदर्शिका हा त्याचाच एक भाग आहे.

दरवर्षी खासगी किंवा शासकीय आस्थापनांकडून दिनदर्शिका प्रकाशित केल्या जातात. डोंबिवलीकरच्या दिनदर्शिकेचे वेगळेपण म्हणजे दरवर्षी एक नवी संकल्पना घेऊन दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. यंदाच्या दिनदर्शिकेची संकल्पना 'उद्योगशील' डोंबिवलीकर अशी आहे. डोंबिवली नगरीला विविध क्षेत्रात काम करणाऱया अनेक मान्यवरांनी सन्मािनत केले आहे. त्या त्या क्षेत्रात उच्च पदावर जाऊन अनेक डोंबिवलीकरांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. डोंबिवली नगरीतील ज्येष्ठ आणि तरुण उदयोगरत्नांचा सन्मान यंदाच्या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. 'डोंबिवलीकर' मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका तयार झाली आहे. डोंबिवली नगरीतील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिंचा परिचय सगळ्यांना करुन देण्याचा प्रयत्न या दिनदर्शिकेतून करण्यात येतो.
दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती निवडल्या जातात. २०१७ या वर्षासाठी उद्योजक ही संकल्पना घेण्यात आली आहे. अशा प्रकारची संकल्पना घेऊन गेली पाच वर्षे ही दिनदर्शिका प्रकाशित होत आहे. २०१७ च्या दिनदर्शिकेत १४४ ज्येष्ठ आणि तरुण डोंबिवलीकर उद्योजकांचा त्याच्या छायाचित्रांसह थोडक्यात परिचय यात करुन देण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पानावर तारीख, वार, पंचांग यासह त्या सर्वाचे एकत्र छायाचित्र आणि त्या महिन्याच्या मागील पानावर त्यांचा परिचय करुन देण्यात आला आहे.या बरोबरच दिनदर्शिकेत डोंबिवली शहरातील विविध सामाजिक संस्था, त्यांचा थोडक्याात परिचय, महत्वाचे नागरी संपर्क, दूरध्वनी क्रमांकही यात देण्यात आले आहेत. या सगळ्यामुळे ही दिनदर्शिका संग्राह्य झाली आहे.
डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे
prabhu.kapse@gmail.com
डोंबिवलीकर मासिक व दिनदर्शिकेसाठी संपर्क
०२५१-२४२०३७३
शेखर जोशी
1 टिप्पणी:
Very nice initiative by Dombivlikar they always come up with new ideas
टिप्पणी पोस्ट करा