मंगळवार, २४ जून, २०२५
आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले
आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला
सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले
- महापालिकेतील तत्कालिन सत्ताधारी
दोन्ही काँग्रेसने आपलाच हट्ट पूर्ण केला
शेखर जोशी
डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाट्यगृहाला डोंबिवलीकर असलेले ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार पु. भा. भावे यांचे किंवा नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचे नाव देण्यात यावे, अशी मागणी तत्कालिन एकसंघ शिवसेना व भाजप यांनी केली होती. सर्वसामान्य रसिकांनाही तसे वाटत होते.
पण तेव्हा कडोंमपात सत्तेवर असलेल्या कॉग्रेस व एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ती मागणी डावलली आणि नाट्यगृहाला हट्टाने सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले. शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, महापालिकेच्या एखाद्या शाळेला, शैक्षणिक संस्थेला त्यांचे नाव दिले असते तर ते योग्य ठरले असते. नाट्यगृहाला त्यांचे नाव देणे अप्रस्तुतच होते. पण तेव्हा महापालिकेतील दोन्ही काँग्रेसनी आपला हट्ट कायम ठेवला आणि पु. भा. भावे किंवा नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचे नाव नाही म्हणजे नाही देऊ दिले.
'भावे' या नावाची दोन्ही काँग्रेसला जर ॲलर्जी होती तर बहुजन समाजातील पण नाट्य क्षेत्रातीलच लेखक, नाटककार, अभिनेता, अभिनेत्री यांचे नाव का नाही दिले? अभिनेते अरुण सरनाईक या नावाचा पर्यायही पुढे आला होता असे आठवते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनीही तेव्हा आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे कान उपटले नाहीत किंवा सावित्रीबाई फुले हे नाव नको, असा आदेशही दिला नाही. पवार यांनी मनात आणले असते तर कॉग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी बोलून ते सावित्रीबाई फुले हे नाव देणे अगदी सहज टाळू शकले असते, पण त्यांनी सोयिस्कर मौन बाळगले. आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला अखेर सावित्रीबाई फुले यांचेच नाव दिले गेले. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकसंघ शिवसेनेत गेलेले आणि शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले पुंडलिक म्हात्रे तेव्हा कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर होते.
शरद पवार यांचे हे असेच आहे. त्यांना एखादी गोष्ट घडून यावी असे वाटते तेव्हा ते सक्रिय होतात. आपल्या पाठिराख्यांना सर्व पातळ्यांवर कामाला लावतात आणि त्यांना जे हवे आहे ते घडवून आणतात. आणि त्यांच्या मनातच नसले, एखादी गोष्ट घडायला नको असे ते ठरवतात तेव्हा मी त्या गावचाच नाही, असे म्हणत निष्क्रिय राहतात. याचा अनुभव आजपर्यंत वेळोवेळी महाराष्ट्राने घेतला आहे.
शेखर जोशी
२४ जून २०२५
खासगी रेडिओ जॉकींना मानाचे पान आकाशवाणी जॉकींचा मात्र अपमान
खासगी रेडिओ जॉकींना मानाचे पान
आकाशवाणी जॉकींचा मात्र अपमान
शेखर जोशी
महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यासाठी खासगी एफएम रेडिओच्या जॉकींना मानाचे पान आणि आकाशवाणीच्या रेडिओ जॉकींचा मात्र अपमान असे चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेण्यासाठी निवड करण्यात आलेले सर्व रेडिओ जॉकी खासगी एफएम रेडिओ चे होते, आकाशवाणी मुंबई, विविध भारती किंवा आकाशवाणी एफएम रेडिओच्या जॉकींना यात डावलून एका प्रकारे आकाशवाणी मुंबईचाच अपमान करण्यात आला.
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रेडिओचे आपल्या सर्वांच्याच भावविश्वात मानवाचे स्थान आहे. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे आकाशवाणीचे घोषवाक्य आहे. आजवर हजारो, लाखो विविध कार्यक्रम, गाणी आकाशवाणी ने सादर केली. अनेक गायक, गायिका, गीतकार, संगीतकार, अन्य कलाकार आकाशवाणीने घडविले. आकाशवाणीच्या या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि
आशा रेडिओ पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आता दरवर्षी हा कार्यक्रम होणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम व पुरस्कार सुरू केल्याबद्दल ॲड. शेलार यांचे अभिनंदन. पण झाला प्रकार मात्र खटकणारा.
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
खरेतर आकाशवाणी मुंबई केंद्र या सर्व खासगी एफएम रेडिओंचा जन्मदाता. रेडिओ प्रसारणातील 'भीष्म पितामह'. भारतातील पहिले रेडिओ प्रसारण मुंबईतून, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या माध्यमातून २३ जुलै १९२७ या दिवशी सुरू झाले. आकाशवाणी मुंबईसह विविध भारतीने अनेक उत्तमोत्तम निवेदक महाराष्ट्राला दिले. आता आकाशवाणी मुंबईची एफएम रेडिओ स्टेशनही आहेत. यापैकी निवृत्त झालेल्या किंवा विद्यमान असलेल्या निवेदकांपैकी एकाही निवेदकाला मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलाविण्यात आले नाही? हा खरा कळीचा मुद्दा आहे.
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
मुलाखतीच्या कार्यक्रमात एक/दोन रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मराठीतून प्रश्न विचारले, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मराठीतून उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या नावात 'महाराष्ट्र' असे नाव असताना हिंदीचे लटांबर का होते? मुंबईत राहून या रेडिओ जॉकींना फक्त एक प्रश्न मराठीतच का विचारता आला नाही? त्यासाठी हिंदीचा वापर का केला? दाखविण्यासाठी तरी का होईना या रेडिओ जॉकींनी मराठीत प्रश्न विचारावा, असे वाटले नाही. मुलाखत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सूत्रसंचालकांनी सहा रेडिओ जॉकी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात पॅनेल डिस्कशन आहे असे सांगितले. त्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार तत्काळ आसनावरून उठून व्यासपीठावर गेले आणि हे पॅनेल डिस्कशन नाही तर रेडिओ जॉकी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत हे स्पष्ट केले. हा प्रकारही हास्यास्पद होता.
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेण्यासाठी ज्या खासगी एफएम रेडिओ जॉकींची निवड करण्यात आली होती त्याच खासगी एफएम रेडिओंनी मराठी गाणी डाऊन मार्केट आहेत असे सांगून आपल्या खासगी एफएम रेडिओवरून ती प्रसारित करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यावेळी मनसेने आवाज उठविल्यानंतर खासगी एफएम रेडिओवर काही वेळ मराठी गाण्यांच्या प्रसारासाठी देण्यात आला. पण बहुदा अजूनही मुंबईतील काही खासगी एफएम रेडिओचा अपवाद वगळता अन्य खासगी एफएम रेडिओवर मराठी गाणी प्रसारित होत नाहीत आणि होत असतील तर तोंडी लावण्यापुरतीच. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या मुलाखत कार्यक्रमात ही बाब ठळकपणे दाखवून द्यायला हवी होती.
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
आकाशवाणी मुंबई केंद्राचे पूर्वीचे मुंबई ब केंद्र आणि आत्ताची अस्मिता वाहिनी, विविध भारती यांच्या योगदाची दखल घेऊन या पहिल्या महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात 'आकाशवाणी मुंबई'चा विशेष पुरस्कार देऊन सन्मान सन्मान करण्यात आला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरले असते. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या ज्येष्ठ निवृत्त निवेदकांचाही विशेष सन्मान करायला हवा होता. पुढील वर्षी (२३ जुलै २०२६) आकाशवाणी मुंबई केंद्र ९९ व्या वर्षांत पदार्पण करेल. त्यामुळे पुढील वर्षीच्या महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात तरी आकाशवाणी मुंबईचा योग्य तो सन्मान होईल अशी अपेक्षा आहे.
शेखर जोशी
२४ जून २०२५
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
शनिवार, २१ जून, २०२५
तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग आणि वारीचा अवमान सहन करणार नाही
तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग आणि
वारीचा अवमान सहन करणार नाही
- समस्त वारकरी संप्रदाय व संघटनांचा इशारा
पुणे, दि. २१ जून
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरच्या वारीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र सध्या काही अपप्रवृत्ती वारीच्या पवित्र परंपरेत घुसखोरी करून संत साहित्य, अभंग, धर्मग्रंथ व वारकरी श्रद्धास्थानांविषयी अपप्रचार करत आहेत. वारकरी संप्रदाय व संघटना हा अवमान सहन करणार नाही, असा इशारा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यासह वारकरी संत आणि मान्यवरांनी दिला.
समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संघटना व हिंदु जनजागृती समिती वतीने पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. समरसतेच्या नावाखाली काम करणारे तथाकथित तसेच नक्षवादी कारवायांमध्ये ज्यांचे कार्यकर्ते पकडले आहेत, अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कबीर कला मंच यांसह ज्यांच्यावर शहरी नक्षलवादाच्या गुन्ह्यांची नोंद आहे, असे इतर पुरोगामी वारीत शिरले आहेत. ही बाब शासनाने गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही कराडकर यांनी केली.
नक्षलवादाचा आरोप असणार्या संघटनांचे मुखवटे काढून त्यांचे खरे चेहरे उघड केले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये नक्षलवादाच्या आरोपाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हे वारीच्या माध्यमातून अंनिस, कबीर कला मंच, पुरोगामी छुपा अजेंडा राबवत आहेत. शहरी नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.
देहूप्रमाणे वारकर्यांची सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य-मांस मुक्त करावीत, असे ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाच्या विचारधारेविरोधी कार्य करणार्यांना जशास-तसे उत्तर देण्यास वारकरी सक्षम असल्याचे ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी म्हणाले. संत, महापुरुष यांवर टिका करणार्यांच्या विरोधी त्वरित कायदा करावा, अशी मागणी ह.भ.प. राम महाराज कदम यांनी केली. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या
रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २१ जून
रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओवरील कार्यक्रमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविले आहे. त्यामुळे रेडिओचे महत्व कधीही कमी होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने
महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्याचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध एफएम रेडिओ वाहिन्यांच्या सिद्धू, अक्की, अर्चना, ब्रजेश, भूषण, सपना भट या रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका
आशा भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे यावेळी उपस्थित होते.
लहानपणी दिवसाची सुरूवात रेडिओ ऐकण्यापासून व्हायची. 'विविध भारती' वरील सकाळची गाणी अगदी न चूकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच जुळला गेलो. रेडिओचे महत्व पूर्वीपासून असून आजही ते अबाधीत आहे.
रेडिओ हे समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहोचण्याचे सशक्त माध्यम असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांनी या मुलाखतीत रेडिओवरील संगीत ऐकणे, गाणी लिहिणे आदी छंदाविषयीही सांगितले. शीघ्र कविता करत फडणवीस यांनी गाणेही गायले.
या कार्यक्रमात आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार २०२५ विश्वनाथ ओक यांना प्रदान करण्यात आला. आशा सर्वोत्कृष्ट पुरूष निवेदक पुरस्कार रेडिओ मिर्ची वाहिनीचे रेडिओ जॉकी जितूराज, आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार रेड एफ एम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मल्लिशा यांना प्रदान करण्यात आला.
आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार रेडिओ सिटीला, आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्राचा पुरस्कार विकास भारती रेडिओ केंद्र नंदूरबार यांना देण्यात आला. यासह अन्य १२ गटात रेडिओ पुरस्कार देण्यात आले.
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनीही मनोगत व्यक्त केले.
शुक्रवार, २० जून, २०२५
बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस अभ्यासक्रमासाठीची अतिरिक्त सीइटी येत्या १९ व २० जुलै
बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस अभ्यासक्रमासाठीची
अतिरिक्त सीइटी येत्या १९ व २० जुलै होणार
मुंबई, दि. २० जून
बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस या अभ्यासक्रमासाठी
येत्या १९ व २० जुलै रोजी अतिरिक्त सीइटी घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) शुक्रवारी देण्यात आली.
या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल २५ हजार ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमासाठी आणखी एक प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार ही परीक्षा होणार आहे.
परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना लवकरच त्यांच्या लॉगिन आयडीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिक माहिती
mahacet.org या संकेतस्थळावर मिळेल.
पुस्तकात वह्यांची पाने देण्याचा प्रयोग फसला- सुराज्य अभियान
पुस्तकात वह्यांची पाने देण्याच्या प्रयोगात
शासनाचे १३५ कोटी रुपयांचे नुकसान
- सुराज्य अभियानाकडून चौकशीची मागणी
मुंबई, दि. १९ जून
विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पुस्तकातच वह्यांची पाने देण्याच्या प्रयोगात शासनाचे १३५ कोटी रुपये वाया गेले आहेत. आणि हा निर्णय बदलण्याची वेळ आली असून याची चौकशी केली जावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ने केली आहे.
मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांना निवेदन देण्यात आले असून या चुकीच्या निर्णयासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी‘सुराज्य अभियान’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी या निवेदनात केली आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०२३–२४ पासून इयत्ता २ री ते ८ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे लेखन साहित्य उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव पाठ्यपुस्तकांमध्ये काही पाने लिहिण्यासाठी जोडण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ही पाने अपुरी ठरली आणि विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच वह्याही घ्याव्या लागल्या. परिणामी दप्तराचे वजन कमी होण्याऐवजी वाढलेच. शिवाय वह्यांची पाने जोडल्यामुळे पाठ्यपुस्तकांची जाडी आणि किंमत वाढल्याचे निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
हा निर्णय प्रायोगिक स्वरूपात काही शाळांमध्ये अमलात आणून त्याचा आढावा घेतला गेला असता, तर शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळता आले असते. शिक्षण क्षेत्रातील निर्णय अभ्यासपूर्वक आणि प्रात्यक्षिक तपासणीच्या आधारे घेणे आवश्यक आहे, हे या घटनेतून अधोरेखित होते, असे मुरकुटे यांनी सांगितले.
बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे शैक्षणिक वर्ष २०२३–२४ मध्ये ७२ कोटी रुपये आणि २०२४–२५ मध्ये ६३.६३ कोटी रुपये, असा एकूण १३५.६३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च शासनाला करावा लागला. २८ जानेवारी २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयात ‘सदर योजनेचा आढावा घेतला असता, पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकवलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही’,असे स्पष्ट
करण्यात आले आहे.
गुरुवार, १९ जून, २०२५
प्रयोगात्मक कलांच्या अभ्यासासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीत संशोधन केंद्र
प्रयोगात्मक कलांसाठी पु.ल. देशपांडे कला अकादमीत
शाहीर साबळे यांच्या नावाने संशोधन केंद्र
- सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई, दि. १९ जून
महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचे सखोल संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागातर्फे पु.ल. देशपांडे कला अकदामीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी येथे केली. या केंद्राला शाहीर साबळे यांचे नाव देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले
सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत ॲड. शेलार बोलत होते.सांस्कृतिक कला संचनालयाचे संचालक बिभीषण चवरे,
संबंधित अधिकारी, लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ज्या कलांमध्ये महाराष्ट्राच्या जढणघडणीचे ऐतहासिक संदर्भ दडलेले आहेत. त्यांचा उलगडा करुन संशोधन व अभ्यास होण्याची गरज आहे. त्यासाठी हे संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे ॲड. शेलार म्हणाले.
बुधवार, १८ जून, २०२५
ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक, लेखक मारुती चितमपल्ली यांचे निधन
ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक आणि लेखक
मारुती चितमपल्ली यांचे निधन
सोलापूर, दि. १८ जून
ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे बुधवारी संध्याकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अलिकडेच त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. वन्यजीव अभ्यासक म्हणूनही त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
चितमपल्ली यांनी वन विभागात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. वन्यजीवनावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. चितमपल्ली यांनी लिहिलेली 'पक्षी जाय दिगंतरा', 'चकवा चांदणं,' जंगलाचं देणं’, ‘रानवाटा’, ‘शब्दांचं धन’, ‘रातवा’, ‘मृगपक्षीशास्त्र’ (संस्कृत-मराठी अनुवाद), ‘घरट्यापलीकडे’, ‘पाखरमाया’, ‘निसर्गवाचन’, ‘सुवर्णगरुड’, ‘आपल्या भारतातील साप’ (इंग्रजी-मराठी अनुवाद) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात चितमपल्ली यांचा विशेष सहभाग होता. राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती, छत्रपती संभाजीनगरच्या मराठी अभ्यासक्रम मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येहही ते सहभागी झाले होते.
'देफ' ना दुसरे शरद पवार होण्याची हौस ती किती?
'देफ' यांचा मास्टर स्ट्रोक!
दुसरे 'शरद पवार' होण्याची हौस ती किती?
शेखर जोशी
आमच्या पक्षात कोणी येणार असेल तर निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करतो. त्यांच्याकडून फक्त हीच अपेक्षा असते की, त्यांनी त्यांचा जुना इतिहास आणि वागण्याची जी पद्धत असेल ती बाजूला ठेवून आता भारतीय जनता पार्टीच्या नियमांनुसार वागले पाहिजे.
- देवेंद्र फडणवीस
----------------------
भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांची ईडी चौकशी सुरू झाली त्या राष्ट्रवादीतील अनेकांना आणि इतरांनाही पक्षात प्रवेश दिला होताच. आता बडगुजर निमित्ताने भविष्यात अशा अनेक 'वाल्यां'ना 'वाल्मिकी' करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला. देफ यांचा मास्टर स्ट्रोक! या न्यायाने आता आणखी कोणा कुख्यातांना प्रवेश देणार? यादी तयार असेल ना? 'देफ' हे दुसरे शरद पवार होत चालले आहेत, नव्हे झालेच आहेत.
भाजपच्या स्थानिक पातळीवरील अनेकांचा या प्रवेशला विरोध होता. तो विरोध डावलून, मोडून काढून हा प्रवेश झाला आहे.
अर्थात हे निर्णय देफ एकटे घेत नसणार. मोदी, शहा यांच्याशी चर्चा करूनच वाल्यांना वाल्मिकी करून घेण्यासाठी लाल गालिचा अंथरला जात असणार. 'निष्ठावंतांचे पोतेरे आणि आयारामांसाठी पायघड्या'. आता संजय राऊत यांनाही पक्षात प्रवेश देऊन त्यांनाही त्यांचा जुना इतिहास आणि वागण्याची पद्धत बदलण्याची संधी जरुर द्यावी. भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते
माधव भांडारींसारख्यांना अजूनही विधान परिषदेची उमेदवारी दिली जात नाही. आणि जुना इतिहास व वागण्याची पद्धत बदलण्याची 'प्रविण' असणाऱ्यांना 'प्रसाद' मिळतो.
शेखर जोशी
१८ जून २०२५
-----------------------------
सहा वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर २०१९ या दिवशी फेसबुकवर पोस्ट केलेली कविता.
https://www.facebook.com/share/p/19BmQ2mNyA/
देवेंद्रू तू दयाळू
पक्षप्रवेश दाता
केले घोटाळे मी
अभय दे आता
पक्षात प्रवेश देऊनी
केले मला तू पावन
जुने सर्व विसरुनी
अपराधांवर घाल पांघरुण
तुझ्याच पावलांशी
लाभली ही स्वस्थता
आता सुटकेचा निश्वास
'ईडी'पासूनही मिळे मुक्तता
'पार्टी विथ डिफरन्स'
तुझे गुणगान गाता
तुझ्यामुळेच मी झालो
'वाल्या'चा वाल्मिकी'आता
©️शेखर जोशी
११ सप्टेंबर २०१९
एसटी महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर भाडेतत्त्वावरील खासगी बस चालविण्यात येणार
एसटी महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर
भाडेतत्त्वावरील खासगी बस चालविण्यात येणार
मुंबई, दि. १८ जून
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर लवकरच भाडेतत्त्वावरील खासगी बस चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
व्हॉल्वो कंपनीला एसटीचा लोगो, उत्पन्न देणारे मार्ग, तिकीट सेवा, एसटीचे आगार, थांबे प्रदान करण्यात येणार असून त्या बदल्यात खासगी कंपनीला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी १० ते १२ टक्के हिस्सा एसटी महामंडळाला देण्याचे नियोजन आहे. एसटीच्या ताफ्यात ३० शयनयान आणि ७० आसनी अशा १०० व्हॉल्वो बस दाखल होणार आहेत.
यामुळे तोट्यातील एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने मोर्चा रद्द - हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश
पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला
परवानगी न मिळाल्याने मोर्चा रद्द
- हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश
मुंबई, दि. १८ जून
आझाद मैदानात बुधवारी काढण्यात येणाऱ्या ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी न दिल्याने हा मोर्चा अखेर निघालाच नाही. मोर्चा रद्द करण्यात आला. हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संस्था, संघटनांनी मोर्चास तीव्र विरोध करून मोर्चाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती.
मोर्चा रद्द झाल्याने सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्नशील हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश मिळाले, तर समाजात धार्मिक तेढ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद समर्थक पॅलेस्टाईनप्रेमी गटाचा स्पष्ट पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केली.
मुंबई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी मोर्चास परवानगी नाकारली. २०१२ मधील आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. २०१२ मध्ये म्यानमार प्रकरणाच्या निषेधार्थ रझा अकादमीतर्फे काढण्यात आलेला मोर्चा हिंसक दंगलीत रूपांतरित झाला होता. तशीच परिस्थिती पुन्हा या मोर्चाच्या माध्यमांतून उदभवण्याची शक्यता होती.
हिंदू राष्ट्र समन्वय समितीसह, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, भाजप, शिवसेना (शिंदे गट), हिंदु एकता जागृत समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, मानव सेवा प्रतिष्ठान आणि भूमीपूत्र सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे मुंबई पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांची मुख्यालयात भेट घेऊन मोर्चाला अनुमती देऊ नये, अशी मागणी केली होती. ‘हमास’सारख्या क्रूर दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या व हमासच्या हिंसाचारावर मौन बाळगणाऱ्या या मोर्चावर बंदी घालावी, असे या सर्वांचे म्हणणे होते.
मंगळवार, १७ जून, २०२५
‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घालण्याची मागणी
आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी
‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घालण्याची मागणी
मुंबई, दि. १७ जून
मुंबईत २०१२ मध्ये झालेल्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उद्या (१८ जून) रोजी मुंबईत आझाद मैदानात निघणाऱ्या ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्च्यावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना, संस्था, व्यक्ती यांनी केली आहे.
मुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, तसेच मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांना याविषयी सविस्तर निवेदन देण्यात आले असल्याचे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
म्यानमारमध्ये मुसलमानांवर होत असल्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मोर्चाचे रूपांतर दंगलीत झाले होते. ‘अमर जवान ज्योती’ची विटंबना, पोलीस आणि प्रसार माध्यमांच्या गाड्यांची जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची हानी, महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ला असे प्रकार यावेळी घडले होते, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.
मंगळवारी निघणाऱ्या मोर्चाबाबत अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी 'एक्स' (ट्विटर) या समाज माध्यमातून माहिती दिली असून डाव्या संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याचे स्वरूप एकतर्फी, भारताच्या परराष्ट्र धोरणाविरोधात आणि इस्रायलसारख्या मित्र राष्ट्राविरोधात आहे. 'हमास' या दहशतवादी संघटनेने केलेल्या हिंसाचारावर आंदोलक मौन बाळगतात आणि भारतातील मुस्लिम समाजाला चिथावणी देण्याचे काम करतात, असा आरोपही समितीने केला आहे.
१८ जून रोजी निघणाऱ्या या मोर्चामुळे मुंबईत पुन्हा धार्मिक तेढ व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदूंवरील अत्याचार, काश्मिरी विस्थापन, बांगलादेशातील हिंसा किंवा भारतावरील दहशतवादी हल्ले या प्रश्नांवर ही आंदोलक मंडळी कधीही रस्त्यावर उतरली नाहीत. हे आंदोलन मानवतावादी नसून भारतविरोधी, हिंदूविरोधी आणि अप्रत्यक्षपणे दहशतवादास समर्थन देणारे आहे. त्यामुळेच, या मोर्च्यावर बंदी घालावी आणि आयोजकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.
देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत - २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण
देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत
- २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण
मुंबई दि. १७
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने येत्या २१ जून रोजी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव' पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी मुंबईत दिली.
मराठी निवेदक, अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन व्हावे, असा आमचा प्रयत्न असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.
प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात 'आशा रेडिओ गौरव पुरस्कार' ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने देण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट रेडीओ केंद्र, कम्युनिटी रेडिओ, मनोरंजन कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, पुरुष निवेदक, महिला निवेदक इत्यादी गटातही पुरस्कार देण्यात येणार असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येणार आहेत. संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करायची आहे. मानचिन्ह आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार असून तसेच रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्यांत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी, किस्से यांचेही सादरीकरण होणार आहे.
येत्या २१ जून रोजी नरिमन पॉइंट, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार, १६ जून, २०२५
नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा' घडण्याची शक्यता? - गाढी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी
नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा'घडण्याची शक्यता?
-गाढी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम तातडीने
पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी
-देवद ग्रामस्थांकडून सिडकोला निवेदन सादर
पनवेल,दि.१६ जून
सिडकोकडून गाढी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या नियोजनातील काही त्रुटींमुळे हा पूल अद्याप सुरू झालेला नाही.त्यामुळे येथे असलेल्या अरुंद पाईपलाईन पुलाचा वापर केला जात आहे. या पुलाचे बांधकाम लवकरच लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी देवद ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात 'सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यात आले आहे.
'सिडको'ने गाढी नदीवर एक नवीन पूल बांधला असून त्यावर आत्तापर्यंत ११ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. नियोजनातील त्रुटींमुळे हा पूल अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे हा पूल सार्वजनिक वापरासाठी खुला केलेला नाही. येथे असलेल्या अरुंद पाईपलाईन पुलाचा वापर केला जात आहे. मुळात हा पाईपलाईन पूल वाहनांसाठीचा नाही. पण तरीही नदीवरील या पुलाचा वाहनचालक, पादचाऱ्यांकडून वापर केला जात आहे. ही परिस्थिती अतिशय धोकादायक असून कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
अरुंद पाईपलाईन पुलावरील वाहतुकीमुळे नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा' घडण्याची भीतीही या निवेदनात व्यक्त करण्यात येत आहे. या निवेदनाची प्रत 'नैना' चे मुख्य नियोजकार, सिडकोचे मुख्य अभियंता यांनाही देण्यात आले आहे.
रविवार, १५ जून, २०२५
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा; चबुतऱ्यालगतची जमीन खचली
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा;
चबुतऱ्यालगतची जमीन खचली
सिंधुदुर्ग, दि. १५ जून
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले असून, त्या ठिकाणी जमीन खोलवर खचल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने, चबुतरा आणि पुतळा भक्कम असून त्याला कोणताही धोका निर्माण झालेला नाही.
मात्र चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे देण्यात येणा-या
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
मुंबई, दि. १५ जून
विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे देण्यात येणा-या यावर्षीच्या ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमात झाले. पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा दरवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधून ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येतो.
वांद्रे – कुर्ला संकुल येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास ‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’चे कार्यकारी संचालक अनंत गोयंका प्रमुख पाहुणे तर ‘टाइम्स नेटवर्क’च्या समुह संपादक व ‘टाइम्स नाऊ नवभारत’च्या मुख्य संपादक नाविका कुमार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
ज्येष्ठ पत्रकार समीर कर्वे (मुद्रीत माध्यम), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक माध्यम), शैलेश गायकवाड (समाज माध्यम) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल ‘साप्ताहिक विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर यांचाही सन्मान करण्यात आला. पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल ‘मुंबई समाचार’ला तर गेली ७७ वर्षे कार्यरत असलेल्या ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे मुंबई ब्युरो प्रमुख सुधांशु जोशी यांनी या पुरस्कार स्वीकारला.
समाज माध्यम पुरस्कारांमध्ये यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक आणि इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर व अमोल जामदारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले यांचाही सन्मान करण्यात आला.
कोकण रेल्वेवर रविवारपासून पावसाळी वेळापत्रक
कोकण रेल्वेवर रविवारपासून पावसाळी वेळापत्रक
मुंबई, दि. १५ जून
कोकण रेल्वेवर रविवारपासून (१५ जून) पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणासाठी दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते.
मात्र, यावर्षी कोकण रेल्वेने पूर्वपावसाळी आणि इतर पायाभूत कामे पूर्ण केल्याने पावसाळी वेळापत्रकात सुधारणा करून ते १० जूनऐवजी १५ जूनपासून लागू करण्यात आले आहे.
यंदा ३१ ऑक्टोबरऐवजी २० ऑक्टोबरपर्यंतच पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शनिवार, १४ जून, २०२५
विश्व मराठी संमेलन येत्या डिसेंबर मध्ये नाशिकला
विश्व मराठी संमेलन येत्या डिसेंबर मध्ये नाशिकला
नाशिक, १४ जून
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन येत्या २६ ते २८ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहकार्य या संमेलनास लाभले आहे. पहिली दोन विश्व मराठी संमेलने मुंबईत झाली होती तर तिसरे विश्व मराठी संमेलन अलीकडेच पुण्यात पार पडले होते.
विश्व मराठी संमेलनात ज्येष्ठ सहित्यिकाला देण्यात येणाऱ्या 'साहित्य भूषण' या पुरस्काराची रक्कम यंदापासून दहा लाख रुपये करण्यात आली आहे. याआधी ही रक्कम पाच लाख रुपये होती.
समीक्षक आणि नाटककार जयंत पवार स्मृती संमेलन येत्या २२ जूनला मालवण येथे
समीक्षक आणि नाटककार जयंत पवार
स्मृती संमेलन येत्या २२ जूनला मालवण येथे
मुंबई, दि. १४ जून
ज्येष्ठ समीक्षक, कथाकार, नाटककार जयंत पवार स्मृती संमेलन येत्या २२ जून रोजी मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यदिग्दर्शक अनिल गवस यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.
समाज साहित्य प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण- मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे संमेलन मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परवडेकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर 'जयंत पवार यांचे कथात्म साहित्य'या विषयावर डॉ. दत्ता घोलप यांचे व्याख्यान होणार आहे. 'जयंत माणूस आणि लेखक, कलावंत' या विषयावर संमेलनाध्यक्ष गवस यांची प्रगट मुलाखतही यावेळी होणार आहे.
समाज साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या मराठीतील ७५ कवींच्या 'सृजन रंग' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तसेच निमंत्रित कवी संमेलनही होणार आहे.
शुक्रवार, १३ जून, २०२५
हिंदू धर्म आणि देवतांवर श्रद्धा आहे
त्यांनाच सेवेत घ्यावे-सनातन संस्थेची मागणी
-शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुस्लिम कर्मचारी
हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती कडून स्वागत
मुंबई, दि. १३ जून
हिंदूंची मंदिरे ही श्रद्धास्थाने असून ज्यांची हिंदू धर्म आणि देवता यांच्यावर श्रद्धा आहे,अशांनाच मंदिरसेवेत घ्यावे,अशी मागणी, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे. तर शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृतीनेही स्वागत केले आहे.
केवळ शनिशिंगणापूरच नव्हे, तर सर्वच देवस्थानांनी ही भूमिका घेऊन सेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणीही वर्तक यांनी केली आहे.
दरम्यान श्री शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले आहे.
शासनाच्या नियंत्रणात असलेल्या अन्य देवस्थानांमध्येही अन्यधर्मीय कर्मचारी असतील तर त्यांची चौकशी करून त्यांनाही तत्काळ सेवामुक्त करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.
रॅगिंग विरोधातील नियमावलीचे पालन न केल्याने ८९ शिक्षण संस्थांना 'युजीसी' कडून नोटीस
रॅगिंग विरोधातील नियमावलीचे पालन न केल्याने
८९ शिक्षण संस्थांना 'युजीसी' कडून नोटीस
रॅगिंग विरोधातील नियमावलीचे गांभीर्याने पालन न केल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील ८९ संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. या संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 'आयआयटी' मुंबई, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि पुण्यातील स्पाइसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठांचा समावेश आहे.
या संस्थांनी येत्या ३० दिवसांच्या आत संपूर्ण अहवाल सादर न केल्यास मान्यता अथवा संलग्नता रद्द करण्यात येईल असा इशारा 'युजीसी'ने दिला आहे.
विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, आत्महत्या यांना आळा घालण्यासाठी 'युजीसी' ने २००९ मध्ये रॅगिंग विरोधी नियमावली लागू केली होती. या नियमांचे पालन करणे प्रत्येक शैक्षणिक संस्थेस बंधनकारक असूनही देशभरातील अनेक संस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे युजीसीकडून ही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
भारतीय रेल्वे: सरकारमान्य मृत्यूचा सापळा! ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांचा लेख
भारतीय रेल्वे;सरकारमान्य मृत्यूचा सापळा!
अजित गोगटे
इंट्रो
भारतात प्रवासी आणि मालाची रेल्वेने वाहतूक करण्याचे अधिकार/ मक्तेदारी अधिकार केंद्र सरकारकडे आहे. सरकारनेच १९८९ मध्ये केलेल्या रेल्वे कायद्यात प्रवासी आणि मालाची सुरक्षित वाहतूक कशी केली जाईल याची कायदेशीर चौकट ठरवून सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी स्वत:स्वीकारली आहे.मात्र भारतात धावणारी प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडी या चौकटीचे उल्लंघन करून चालविली जात असल्याने भारतीय रेल्वे हा सरकारमान्य मृत्यूचा सापळा आहे,
असेच म्हणावे लागेल.
भारतीय रेल्वे: सरकारमान्य मृत्यूचा सापळा!
अजित गोगटे
रेल्वे कायद्यानुसार प्रत्येक प्रवासी गाडीच्या प्रत्येक डब्याची कमाल प्रवासी क्षमता किती असेल व मालगाडीच्या प्रत्येक वाघिणीची माल भरण्याची कमाल क्षमता किती असेल हे ठरविण्याचे बंधन आहे. रेल्वे प्रशासनाला ही कमाल क्षमता केंद्र सरकारकडून मंजूर करून घ्यावी लागते. प्रवाशांची व मालाच्या वजनाची ही कमाल क्षमता ठरविण्यामागे ‘सुरक्षित प्रवास’ हाच मूळ हेतू आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक प्रकारच्या प्रवासी गाडीच्या प्रत्येक डब्याची अशी सरकारने ठरवून दिलेली कमाल प्रवासी क्षमता त्या डब्यात व रेल्वेच्या आवारात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल अशा प्रकारे हिंदी, इंग्रजी व स्थानिक भाषेत लिहिणेही कायद्याने बंधनकारक आहे. रेल्वे याची अंशत:अंमलबजावणी करते. म्हणजेप्रवासी गाड्यांच्या डब्यांमध्ये प्रवासी क्षमतेचा आकडा दर्शविणारा संदेश तीन भाषांमध्ये लिहिलेला असतो. मात्र तो ‘अमूक प्रवाशांना बसण्यासाठी’ अशा प्रकारे लिहिलेला असतो. म्हणजे लिहिलेली संख्या ही प्रवाशांची कमाल संख्या आहे, हे त्यावरून स्पष्ट होत नाही.
मजेची गोष्ट म्हणजे प्रवासी गाड्यांच्या डब्यांमध्ये प्रवाशांची कमाल संख्या लिहवी, असे कायदा सांगत असला तरी डब्यातून त्याहून अधिक प्रवासी प्रवास करू शकत नाहीत किंवा रेल्वेने त्याहूनअधिक प्रवाशांना प्रवास करू देऊ नये, असे कायदा सांगत नाही. मात्र मालगाड्यांच्या बाबतीत मात्र कायद्याची भाषा याच्या अरदी विपरित आहे. त्यात मालगाडीच्या प्रत्येक वाघिणीची माल भरण्याच्या वजनाची कमाल क्षमता ठरविलेली आहे. एवढेच नव्हे तर त्याहून जास्त माल भरण्यास मज्जाव आहे व जास्त माल भरला असेल तर तो खाली उतरवून टाकण्याची आणि ज्याने जास्त माल भरला असेल त्याला दंड करण्याचीही तरतूद आहे. यावरून असे स्पष्ट दिसते की, रेल्वे कायद्याला आणि तो कायदा करणाºया सरकारला फक्त मालाच्या सुरक्षित वाहतुकीची काळजी आहे व प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीची अजिबात नाही.
याच रेल्वे कायद्यानुसार संपूर्ण देशासाठी एक मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त (Chief Commissioner of Railway safety) व प्रत्येक विभागीय रेल्वेसाठी एकेक रेल्वे सुरक्षा आयुक्त नेमलेला असतो. रेल्वेची वाहतूक संरक्षितपणे केली जाईल, याची खात्री करणे व अपघात झाल्यास चौकशी करून त्याची जबाबदारी निश्चित करणे हे या सुरक्षा आयुक्तांचे काम असते. हे काम निष्पक्षपणे केले जावे यासाठी रेल्वे वगळून अन्य सरकारी अधिकाºयांची या आयुक्तपदी नेमणूक केली जाते. मुख्य आयुक्तांनी दरवर्षी आपल्या कामाचा अहवाल द्यायचा असतो व सरकारने तो संसदेत सादर करायचा असतो. माझ्या पत्रकारितेच्या चार दशकांच्या कालावधीत सुरक्षा आयुक्तांच्या अहवालात गाड्यांमधील कमाल प्रवासी संख्येचे सर्रास अनुभवाला येणार्या उल्लंघनाचा कधीही साधा उल्लेखही केला गेल्याचे माझ्या स्मरणात नाही. कमाल प्रवासी संख्या सरकारने या आयुक्तांच्याच सल्ल्याने ठरविलेली असते. पण आपणच ठरवून दिलेल्या या मर्यादेचे रेल्वेकडून पालन होते की नाही, हेही हे आयुक्त कधी पाहात नाहीत.
रेल्वेच्या कोणत्याही गाडीत तेथे लिहिलेल्या कमाल संख्येहून जास्त प्रवासी प्रवास करत असतात, हे प्रत्येकाला अनुभवास येणारे वास्तव आहे. मुंबईच्या उपनगरी लोकलगाड्यांमध्ये तर गाडीच्या कमाल प्रवासीसंख्येची ही मर्यादा दुपटी-तिपटीने ओलांडली जाते. धावत्या लोकलमधून खाली पडून प्रवाशांचा मृत्यू होणे हा याचाच परिणाम आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या क्षेत्रात दरवर्षी सरकारी तीन हजार प्रवासी धावत्या गाडीतून पडून जीव गमावत असतात. अशा प्रत्येक मृत्यूसाठी रेल्वेला आठ लाख रुपयांची भरपाई द्यावी लागले. म्हणजे एकट्या मुंबईतील उपनगरी वाहतुकीत कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल रेल्वेला दरवर्षी सुमारे २४० कोटी रुपयांचा अप्रत्यक्ष भूर्दंड सोसावा लागतो. आपणच कायदे करायचे. आपणच त्याचे उल्लंघन करायचे व त्याचा भूर्दंड करांच्या स्वरूपात जनतेच्या माथी मारायचा, असा हा सरकारचा उरफाचा मक्तेदारी धंदा आहे.
प्रत्येक विभागीय रेल्वेच्या कारभाराची संपूर्ण जबाबदारी महाव्यवस्थापकांवर असते. प्रवासी गाड्यांमधून प्रवास करणाºया प्रवाशांची सुरक्षितता आणि जीव धोक्यात येईल अशी कोणतीही कृती हेतूपुरस्सर करणाºया किंवा अपेक्षित कृती करण्यचे टाळून सुरक्षितता धोक्यात आणणाºया कोणत्याही व्यक्तीवर खटला भरून त्यास पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षाही याच रेल्वे कायद्यात आहे. हे कलमा रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनांही लागू होते. खरे तर रेल्वेतून पडून होणाºया प्रवाशाच्या प्रत्येक मृत्यूबद्दल महाव्यवस्थापकांना अशी शिक्षा होऊ शकते व तशी व्हायलाही हवी. कारण कायद्याचे हे हेतूपुरस्सर उल्लंघन त्यांच्याच डोळ्यादेखत दररोज होत असते.
सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना कमाल प्रवासी संख्येची मर्यादा घालून देणारा असा कायदा रस्ते वाहतुकीच्या संबंधीही आहे. तेथेही कायद्याचे तंतोतंत पालन करून प्रवासी गाड्यांमधून निर्धारित कमाल संख्येएवढ्याच प्रवाशांची वाहतूक करण्याचे रेल्वेने मनात आणले तरी ते वास्तवात अशक्य आहे, हे मान्य. पण हा कायदा केला तेव्हा तो करणा-यांना या वस्तुस्थितीची पूर्ण कल्पना होती. तरीही त्यांनी कायद्यात या तरतूदी केल्या. यावरून मुळात पालन न करण्याच्या उद्देशानेच हा कायदा केला गेला, हे उघड आहे. आपण संसदेवर निवडून पाठविलेल्या लोकप्रतिनिधींचे कायदे करणे हेच मुख्य काम असते. परंतु मंजूर करत असलेला कायदा ते वाचतही नाहीत. अन्यथा प्राप्त वस्तुस्थितीत ज्याची अंमलबजावणी कधीच होऊ शकत नाही, असा केवळ कागदावर राहणारा हास्यास्पद कायदा त्यांनी केलाच नसता. पण रेल्वेचा हा सरकारमान्य मृत्यूचा सापळा रचला जाण्यास नागरिक म्हणून आपणही तेवढेच जबाबदार आहोत. आपण याविषयी सरकारला व आपल्या लोकप्रतिनिधींना कधीही जाब विचारत नाही. लोकप्रतिनिधी त्याच्या खासदार निधीतून किती सार्वजनिक शौचालये, बांधतो, किती गल्लीबोळांमध्ये पेवरब्लॉक बसवितो, किती पडक्या चाळींची दुरुस्ती करतो आणि किती गणपती उत्सवांत व दहीहंड्यांमध्ये मिरवितो यावरून आपल्या दृष्टीने तो ‘कार्यसम्राट’ ठरत असतो.
( ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)
गुरुवार, १२ जून, २०२५
अंबरनाथच्या साप्ताहिक आहुतीचे हिरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण!
अंबरनाथ येथील 'साप्ताहिक आहुती'ने ११ जून रोजी हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले. स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव त्रिवेदी आणि त्यांच्या पत्नी मनोरमाबेन त्रिवेदी यांनी ११ जून १९६६ रोजी 'साप्ताहिक आहुती' सुरू केले. मुंबईच्या मोठ्या वृत्तपत्रात स्थानिक बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळत नाही हा 'आहुती' सुरू करण्यामागील मुख्य उद्देश होता. वसंतराव त्रिवेदी यांचे सुपुत्र गिरीश वसंत त्रिवेदी हे 'साप्ताहिक आहुती' चे संपादक असून त्यांना वडीलबंधू, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
येत्या १ जानेवारी २०२६ रोजी साप्ताहिक आहुतीचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन विशेषांक प्रकाशित करण्याचा तसेच हिरक महोत्सवी वर्षांत विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय साप्ताहिक आहुतीचे संपादक गिरीश त्रिवेदी यांनी साप्ताहिक आहुतीच्या ताज्या अंकातील संपादकीयात व्यक्त केला आहे.
स्थानिक पातळीवर गेली ५९ वर्षं साप्ताहिक प्रकाशित करणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. त्यासाठी साप्ताहिक आहुतीच्या सर्व चमूला शुभेच्छा. हिरकमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त अभिनंदन आणि शुभेच्छा. या निमित्ताने साप्ताहिक आहुतीच्या सौजन्याने 'आहुती'च्या संपादकीयचा हा संपादित अंश.
अंबरनाथच्या साप्ताहिक आहुतीचे
हिरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण!
मुंबई येथील मोठ्या वर्तमानपत्रात स्थानिक बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळत नाही म्हणून साप्ताहिक आहुतीची मुहूर्तमेढ वसंतराव त्रिवेदी यांनी रोवली. सामाजिक बांधिलकी जपत हे साप्ताहिक सुरु आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, अध्यात्मिक अशा विविध उपक्रमांना सचित्र आणि सविस्तर प्रसिद्धी देण्याच्या हेतूनेच आहुतीची सुरुवात करण्यात आली. गेल्या ५९ वर्षात खून, मारामारी, बलात्कार आदी गुन्हे स्वरूपाच्या बातम्या देण्याचे कटाक्षाने टाळले आहे. या पुढेही तेच धोरण राहील. वसंतराव त्रिवेदी यांनी घालून दिलेल्या तत्वानेच आहुतीची वाटचाल अखंडपणे सुरु आहे. गेल्या तब्बल ५९ वर्षांत वाचकांना सकारात्मक आणि चांगलेच द्यायचा प्रयत्न केला आहे.
गेल्या ५९ वर्षातील आहुतीची ही वाटचाल एक दिशादर्शक वाटचाल आहे. गेल्या ५९ वर्षात आहुतीने केवळ वृत्तपत्र प्रकाशित करण्याचे काम केले नाही तर अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदि अनेक क्षेत्रात आपले योगदान दिले. साप्ताहिक आहुतीचा वर्धापन दिन साजरा करताना राजकीय, शासकीय वरिष्ठाना निमंत्रित करून त्या त्या परिसरातील समस्यांना वाचा फोडण्याची प्रथा आहुतीने सुरु केली.
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर व्हावे यासाठी आहुती आणि त्रिवेदी परिवार सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या प्रयत्नांना आता निश्चित अशी दिशा मिळाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहर हे 'मंदिराचे शहर' अर्थात टेम्पल सिटी करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु केला आहे. १४० कोटी खर्चाचा प्रस्ताव मंजुर होऊन काम सुरु झाले आहे. अंबरनाथ तालुका व्हावा, प्रशासकीय इमारत उभारून सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावी ही मागणी आहुतीने लावून धरली होती. भ्रमणध्वनी कंपन्यांनी मुंबई महाराष्ट्रातून वेगळी केली आहे ती पुन्हा एक करावी अर्थात मुंबई आणि महाराष्ट्र हे एकच सर्कल असावे यासाठीही आहुतीने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला काही प्रमाणात यश येवून सरकारी बी एस एन एल आणि एम टी एन एल या कंपन्यांनी मुंबई आणि महाराष्ट्र सर्कल एक केले आहे. कल्याण महापालिकेतून अंबरनाथ आणि बदलापूर स्वतंत्र पालिका कराव्यात या मागणीसाठीही आहुतीने योगदान दिले आहे. १४ एप्रिल १९९२ रोजी या दोन पालिका स्वतंत्र झाल्या. कल्याण जिल्ह्याची निर्मिती व्हावी यासाठी सुद्धा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या आकारात विशेषांक प्रकाशित करून आहुतिने इतिहास रचलेला आहे. वर्धापन दिन असो वा दिवाळी विशेष अंक असो एक विषय घेवून त्या विषयावर आहुतीने विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्यात "आई", प्राचीन शिवमंदिर विशेष अंक (शिवमंदिर विशेष अंकाच्या दोन आवृत्या प्रकाशित झाल्या.) आहुतीच्या इतिहासात गाजलेला विशेष अंक म्हणजे शिवमंदिर विशेष अंक. १४ जून १९९२ रोजी आहुतीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी शिव मंदिरात जावून दर्शन घेतले त्यावेळी मधुकरराव चौधरी, मनोहर जोशी आदींनी साबिरभाई शेख यांना विचारले की या मंदिराची माहिती देणारी पुस्तिका आहे का ? त्यावेळी सर्वांनी नकारार्थी उत्तर दिले. त्याच वेळी वसंतराव त्रिवेदी यांनी आदेश दिले की आहुतीचा शिवमंदिर विशेषांक प्रकाशित करायचा. त्याची पहिली आवृत्ती
९ मार्च १९९४ रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' येथे प्रकाशित झाली. शिवमंदिराचा अभ्यास करणाऱ्यांना कमी किमतीत भरपूर माहिती द्यायची याच हेतूने हा अंक अवघ्या पाच रुपयात उपलब्ध करून दिला होता. त्या अंकाच्या प्रती संपल्या नंतर २००९ मध्ये शिवमंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. याचे प्रकाशन २२ ऑगस्ट २००९ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. गो. बं. देगलूरकर, पद्मश्री डॉ. सदाशिव गोरक्षकर, डॉ. कुमुद कानिटकर, सदाशिव टेटविलकर, सदाशिव साठे, लक्ष्मणराव कुलकर्णी अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. शेती, इतिहास, पर्यटन, करोना, उद्योग, प्रशासकीय अधिकारी संधी आणि आव्हाने, कृषी उद्योग, विशेष मुलांच्या व्यथा आणि व्यवस्था आदी विविध विषयावर दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आले आहेत.
वृत्तपत्रांमध्ये अलीकडे जी स्पर्धा सुरु आहे ती गुणात्मक स्पर्धा वाटत नसून ती जीवघेणी स्पर्धा वाटत आहे असे वाटते. या पार्श्वभूमीवर एक उदाहरण आहुतीचे द्यावेसे वाटते. साप्ताहिक विवेकने अंबरनाथ शहरावर एक विशेषांक प्रकाशित केला होता. याचा प्रकाशन सोहळा अंबरनाथ शहरात आयोजित करण्यात आला. त्यावेळी "विवेक" साप्ताहिकाचे स्वागत करणारा, त्या चमूची माहिती देणारा आहुतीचा स्वतंत्र विशेषांक प्रकाशित करण्यात आला होता. वृत्तपत्रांनी अथवा पत्रकारांनी एकमेकांचे हेवेदावे न करता एकमेकाना सहकार्य करावे असे वसंतराव त्रिवेदी यांचे मत होते आणि त्याच तत्वाने आजही आहुतीची वाटचाल सुरु आहे.
आहुतीचे रौप्य महोत्सवी वर्ष जोरदार साजरे करण्यात आले. १४ जून १९९२ रोजी हा अविस्मरणीय असा सोहळा पार पडला. आहुतीचा सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ मातृवंदनाने ११ जून २०१५ रोजी करण्यात आला.
(साप्ताहिक आहुतीच्या सौजन्याने)
बुधवार, ११ जून, २०२५
'पु.ल. कट्टा' दर शुक्रवारी पुन्हा रंगणार
पु ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा
'पु.ल. कट्टा' दर शुक्रवारी पुन्हा रंगणार
- पुलंच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रम
मुंबई, दि. ११ जून
'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर उद्या (१२ जून) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमापासून 'पु.ल.कट्टा' हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
यापुढे हा उपक्रम दर शुक्रवारी अकादमीच्या खुल्या रंगमंचावर रंगणार असून राज्यभरातील सर्व कलाकारांना आपापली कला या रंगमंचावर सादर करण्याची संधी मिळणार आहे.
१२ जून रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणा-या कार्यक्रमात गायक शार्दूल कवठेकर, गायिका अदिती पवार , संवादिनी वादक प्रणव हरिदास, तबला वादक सौरभ शिर्के, अभिवाचक अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी, डाॅ कविता सोनावणे, नृत्यांगना राधिका जैतपाळ आणि डॉ. शिरीष ठाकूर हे कलाकार सहभागी होणार आहेत. पुलंच्या साहित्यकृतीवर आधारित हा कार्यक्रम असून तो सर्वांसाठी खुला आहे.
'उदकशांंत' दीर्घांकाचे शनिवारी कल्याणला सादरीकरण
शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेतील विजेत्या
'उदकशांंत'चे शनिवारी कल्याणला सादरीकरण
- मुलगा गमावलेल्या आई वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी
डोंबिवली, दि. ११ जून
शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या 'उदकशांत' या दीर्घांकाचा प्रयोग येत्या १४ जून रोजी रात्री साडेआठ वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग सशुल्क असून प्रयोगाचा कालावधी सलग एक तास २० मिनिटे इतका आहे.
आपला मतीमंद मुलगा आता या जगात नाही हे सत्य मुलाच्या आईने स्विकारले आहे पण मुलाचे वडील ते स्विकारायला तयार नाहीत. मुलाच्या मृत्यूची सावली या दोघांच्याही आयुष्यावर पडली आहे. ही सावली इतकी गडद आहे की ते दोघे सुखाने जगूही शकत नाहीत. या आई-वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी 'उदकशांत' या दीर्घांकात सादर करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे यंदा पहिल्यांदाच शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत डॉ. समीर मोने लिखित आणि अभिनेते मिलिंद अधिकारी दिग्दर्शित 'उदकशांत' या दीर्घांकाला प्रथम क्रमांक मिळाला. डोंबिवलीच्या तिहाई कलासाधक संस्थेने हा दीर्घांक सादर केला होता. महाराष्ट्रातून एकूण २७ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.
'उदकशांत' दीर्घांकात प्रतिक खिसमतराव, श्रद्धा भालेकर, धनंजय धुमाळ, मिनाक्षी जोशी, देवेश काळे हे कलाकार आहेत.
दिग्दर्शशनासह नेपथ्याची जबाबदारी मिलिंद अधिकारी यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना अनुक्रमे
आशुतोष वाघमारे व राजेश शिंदे यांची आहे.
'उदकशांत' मधील जोडप्याचा मतिमंद मुलगा गेल्याला आता एक वर्ष झाले आहे. परंतु ते दोघेही त्याच्या आठवणी विसरू शकत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे ते दोघेही आपल्या मतिमंद मुलाचे मरण स्विकारायला तयार नाहीत. हा दीर्घांक एका रात्रीतला असला तरी त्याची पार्श्वभूमी त्या जोडप्याच्या पूर्ण आयुष्याचे भोगणे असल्याचे 'उदकशांत' चे दिग्दर्शक व नेपथ्यकार मिलिंद अधिकारी यांनी सांगितले.
'एका कोंडीतून मुक्त होणाऱ्या जोडप्याची गोष्ट', असा प्रवास आपल्याला जाणवला आणि मी त्या पद्धतीने नाटक बसवत गेलो. सर्व कलाकारांची उत्तम साथ मिळाली आणि हा प्रयोग चांगल्या प्रकारे सादर करू शकलो, असेही अधिकारी म्हणाले.
शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेत 'उदकशांत'ने पुढील पारितोषिकेही पटकावली आहेत.
दिग्दर्शक (मिलिंदअधिकारी)- प्रथम
संगीत (आशुतोष वाघमारे) - प्रथम
अभिनेत्री ( श्रद्धा भालेकर) - प्रथम
अभिनेत्री (मीनाक्षी जोशी)- तृतीय
अभिनेता ( प्रतिक खिसमतराव) - तृतीय
'सहा सरसंघचालक' पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन
'सहा सरसंघचालक'पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर, दि. ११ जून
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर लिखित'सहा सरसंघचालक'तसेच
प्रा. डॉ. रवींद्र बेम्बरे (देगलूर) यांनी लिहिलेल्या‘नैसर्गिक आपत्तीत मराठी संतांचे मनोविज्ञान’या दोन पुस्तकांचे प्रकाशन येत्या १३ जून रोजी येथे होणार आहे.साहित्यभारती,देवगिरी प्रांत,शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
माजी लोकायुक्त-गोवा व माजी न्यायमूर्ती अंंबादासराव जोशी, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे सहसंघटनमंत्री मनोजकुमार,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा कार्य प्रमुख प्रा. डाॕ. उपेंद्र कुलकर्णी,साहित्य भारतीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बळिराम गायकवाड हे प्रमुख पाहुणे तर देवगिरी प्रांताचे संघचालक अनिल भालेराव हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.'सहा सरसंघचालक' या पुस्तकावर प्रा. डॉ. कैलास अतकरे भाष्य करणार आहेत.
हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता दामूअण्णा दाते सभागृह,
डॉ. हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
मंगळवार, १० जून, २०२५
विश्व संवाद केंद्राचे 'देवर्षी नारद' पुरस्कार जाहीर
विश्व संवाद केंद्राचे 'देवर्षी नारद' पुरस्कार जाहीर
- समीर कर्वे,संदीप रामदासी,अश्विनी मयेकर आणि अन्य मानकरी
मुंबई, दि. १० जून
विश्व संवाद केंद्र- मुंबईतर्फे देण्यात येणार-या ’देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.प्रसारमाध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या पत्रकारांचा दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने समीर कर्वे (मुद्रीत माध्यम),संदीप रामदासी(इलेक्ट्रॉनिक माध्यम),शैलेश गायकवाड (समाज माध्यम) यांना तसेच पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी(कविता) मयेकर यांना
सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदा २५ वे
वर्ष आहे
२०३ वर्षे जुन्या असलेल्या 'मुंबई समाचार'चा पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल तसेच गेली ७७ वर्षे कार्यरत असलेल्या 'हिंदुस्थान समाचार' या बहुभाषिक वृत्त संस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक, इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर,अमोल जामदारे यांची निवड करण्यात आली आहे.पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले याला गौरविण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ जून रोजी एनएसई बिल्डिंग, वांद्रा कुर्ला संकूल, वांद्रे (पू.) येथे होणार आहे. द इंडियन एक्सप्रेस समुहाचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका हे प्रमुख पाहुणे तर टाइम्स नेटवर्कच्या समुह संपादक व टाइम्स नाऊ नवभारतच्या मुख्य संपादक नाविका कुमार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ मुळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालय!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालय!
- निवती रॉकजवळ नियोजित प्रकल्प
मुंबई, दि. १० जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालय उभारण्यात येणार आहे. नौदलाच्या 'आयएनएस गुलदार' (आता सेवेत नाही) या युद्धनौकेचा यासाठी उपयोग केला जाणार असून देशातीलहा पहिलाच उपक्रम असणार आहे.
सागरी संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून केंद्र शासनाने भारतीय नौदलाचे 'आयएनएस गुलदार' हे जहाज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे.
मुंबईतील मंगळवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या एका कार्यक्रमात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नियोजित प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,
मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल हे उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर सहभागी झाले होते.
समुद्रातील या जहाजाभोवती प्रवाळ निर्मितीकरून त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटकांना या प्रवाळ व समुद्रतळाशी विराजमान जहाजाची सफर घडविण्याची योजना आहे.
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक वामन देशपांडे यांचे निधन
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक
वामन देशपांडे यांचे निधन
डोंबिवली, दि. १० जून
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक वामन देशपांडे यांचे मंगळवारी सकाळी डोंबिवलीत एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशपांडे यांच्यावर डोंंबिवलीत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांची अखेरचा श्वास घेतला.
संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दैनंदिन ज्ञानेश्वरी, दैनंदिन दासबोध, संत तुकाराम आदी धार्मिक विषयांवर तसेच कविता, भावगीते, भक्तिगीते, कथा, समीक्षा, कांदबरी इत्यादी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले होते. देशपांडे यांची १२५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
संत साहित्यासह विविध विषयांवरील ११८ पुस्तकांना वामन देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिल्या होत्या. धार्मिक विषयांसह विविध विषयांवरील सुमारे तीन हजाराहून अधिक पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता. 'अच्युतानंद' या टोपण नावाने त्यांनी ज्ञानेश्वरीवर लिखाण केले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते. संत साहित्यावर ते प्रवचनही करत असत.
सोमवार, ९ जून, २०२५
अशी ही साता-याची त-हा-! विशेष लेख
इंट्रो
आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा साता-यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्याचा योग जुळून आला आहे. त्यानिमित्ताने साहित्य, चित्रपट, कविता यातील 'अशी ही साता-याची त-हा'!
'अशी ही साता-याची त-हा-!'
शेखर जोशी
मराठी साहित्य व्यवहारातील 'कुंभमेळा' अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ओळख आहे. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या साहित्य संमेलनाचा आता 'इव्हेंट' झाला असून हे संमेलन राजकारण्यांच्या ताब्यात गेले आहे. साहित्य संमेलन आणि वाद ,कार्यक्रमातील साचेबद्धपणा हे नेहमीचे रडगाणे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मराठी साहित्य व्यवहारातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदा सातारा येथे साहित्य संमेलनाचा फड रंगणार आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर
सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून हे शहर कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे साता-याच्या गादीचे पहिले संस्थापक. १८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९ असा त्यांचा कार्यकाळ होता. १७०८ मध्ये त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. ब्रिटिशांच्या काळात सातारा हे एक अग्रगण्य संस्थान म्हणून ओळखले जात होते. शहराभोवती असलेल्या सात किल्ल्यांवरून शहराला सातारा हे नाव मिळाले. प्रत्येक शहराची स्वतःची काही ना काही अशी स्वतंत्र ओळख असते. अजिंक्यतारा किल्ला, व्योम धरण, कास पठार, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, जरंडेश्वर हनुमान, बारा मोट्याची विहीर, ही साताऱ्या जवळील काही प्रसिद्ध ठिकाणे सातारा शहर आणि जिल्ह्याची मुख्य ओळख ठरली आहेत. सातारी कंदी पेढे आणि सातारी जर्दा ही सुद्धा साता-याची वेगळी ओळख आहे.
साहित्य, चित्रपटातील सातारा
'सातारा' हे नाव असलेला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 'अलगूज' कादंबरीवर आधारित 'अशी ही साता-याची त-हा' हा चित्रपटही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अरुण सरनाईक, उमा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरलीधर कापडी यांनी केले होते. चित्रपटातील 'परभणीहुनी कुणी आलेत पाहुणे मला घालाया मागणी, काय करू काय करू' हे गाणे प्रसिद्ध आहे.
https://youtu.be/q7tTNzfDX5w?feature=shared या लिंकवर हे गाणे पाहता व ऐकता येईल.
अशाच एका अत्यंत लोकप्रिय गाण्यात/ लावणीत 'सातारा' आलेला आहे. 'सांगत्ये ऐका' चित्रपटातील 'बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला गं जाता साताऱ्याला ' हे ते गाणे. आज इतक्या वर्षांनंतरही गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. https://youtu.be/lSLMTR0tCZY?feature=shared
या लिंकवर क्लिक करून हे गाणे ऐकता येईल.
गदिमांचा 'जोगिया'
'आधुनिक वाल्मिकी' अशी ओळख असलेले कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचा 'जोगीया' हा पहिला काव्यसंग्रह. यातील १६ कविता संगीतबद्ध करून एक सांगितिक अल्बम प्रकाशित झाला आहे. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली असून सुरेश देवळे यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. श्रीधर फडके रवींद्र साठे उत्तरा केळकर चारुदत्त आफळे, ज्ञानदा परांजपे यांनीही गाणी गायली आहे. चारुदत्त आफळे यांची किर्तनकार/ प्रवचनकार अशी महाराष्ट्राला ओळख आहे. मात्र या आल्बममध्ये आफळे बुवांनी चक्क गदिमांनी लिहिलेली 'ही घोळ निऱ्यांचा पदी अडखळे, जलद चालणे जरा, दिसे ही साताऱ्याची तऱ्हा' ही लावणी गायली आहे. लावणीचे शब्द, संगीत आणि स्वर एकदम फक्कड आहेत. रसिक वाचकांना ही लावणी https://www.gadima.com/jogia/index.php#google_vignette या लिंकवर ऐकता येईल.
साताऱ्यात होणारे ४ थे साहित्य संमेलन
आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. या आधीही तीन संमेलने साता-यात झाली होती. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी 'ग्रंथकार संमेलन' सुरु केल्यानंतर १९०५ मध्ये तिसरे संमेलन रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात झाले होते.
सातारा येथे होणाऱ्या आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनला मिळाला आहे.
असाही एक योगायोग
सातारा येथे होणारे नियोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे. १९९३ साली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच ठिकाणी झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे एक मुख्य मंडप, दोन अन्य मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा अशी
व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर परिसंवाद/कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहेही उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये २५ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी आहे. स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर आहे. स्टेडियमच्या मागील बाजूस पोलीस परेड ग्राउंडची मोठी जागा असून त्याचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे.
पूर्ण--
शनिवारी डोंबिवलीत रंगणार चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव
शनिवारी डोंबिवलीत रंगणार
चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव
डोंबिवली, दि. ९ जून
चतुरंग प्रतिष्ठान आयोजित चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव येत्या १४ जून रोजी डोंबिवलीत रंगणार आहे.
या कार्यक्रमात म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत 'चतुरंग संगीत सन्मान' डॉ. पं. विद्याधर व्यास यांना तर 'चतुरंग संगीत शिष्यवृत्ती' अद्वैत केसकर यांना पं. अरुण कशाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय संगीत/ नाट्य संगीत गायिका आशा खाडिलकर यांच्या सत्तर वर्षपूर्ती निमित्ताने ‘आशाताई - एक सुरदासी’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. यात आशा खाडिलकर यांच्या सांगितिक कारकिर्दीचा आढावा घेण्यात येणार असून आशा खाडिलकर यांच्या कन्या वेदश्री खाडिलकर- ओक सहभागी होणार आहेत. त्यांना अनिरुद्ध गोसावी (संवादिनी), निषाद करलगीकर (तबला) हे संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन डॉ . समीरा गुजर - जोशी यांचे आहे.
याच कार्यक्रमात अद्वैत केसकर यांचेही गायन होणार आहे. त्यांना
निषाद चिंचोले (तबला), निनाद जोशी (संवादिनी) संगीतसाथ करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी साडेचार ते नऊ या वेळेत सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे होणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
शुक्रवार, ६ जून, २०२५
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे निधन
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते
दाजी पणशीकर यांचे निधन
ठाणे, ६ जून
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे अल्प आजाराने शुक्रवारी ठाण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.
पणशीकर यांनी लिहिलेली महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता?, कथामृतम, कणिकनिती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्र गंगा (दोन भाग), अपरिचित रामायण (पाच भाग), गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार आणि इतर पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
पणशीकर यांनी देशविदेशात सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली असून काही वृत्तपत्रातूनही त्यांनी लिहिलेल्या विविध लेखमाला प्रसिद्ध झाल्या आहेत.
पणशीकर यांच्या पार्थिवावर शनिवार ७ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता जवाहर बाग स्मशानभूमी, ठाणे पश्चिम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
हिंदुद्वेषी एम्.एफ्. हुसेन यांच्या मुंबईतील चित्रांच्या लिलावावर बंदी घाला - हिंदू जनजागृती समितीची मागणी
हिंदुद्वेषी एम्.एफ्. हुसेन यांच्या
मुंबईतील चित्रांच्या लिलावावर बंदी घाला
- हिंदू जनजागृती समितीची मागणी
मुंबई, ६ जून
भारतमातेचे ‘रेप ऑफ इंडिया’नावाने अत्यंत विकृत, बिभत्स, नग्न व अश्लील चित्र रेखाटणारे वादग्रस्त चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव मुंबईत येत्या १२ जूनला होणार आहे. या लिलावावर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि हुसेन यांच्या गुन्हेगारी कृत्याचे उदात्तीकरण बंद केले जावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
या प्रकरणी समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती याच्यासह मुंबईचे जिल्हाधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सादर केलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.
एम.एफ. हुसेन यांनी '२६/११' हल्ल्च्यायाच्या वेळी ‘रेप ऑफ इंडिया’ नावाच्या चित्रात भारतमातेचे नग्न व अपमानास्पद चित्र साकारून त्यांनी देशद्रोहाची परिसीमा गाठली. दुसऱ्या एका चित्रात भारतमातचे नग्न चित्रण काढून त्यावर विविध शहरांची नाव लिहिलेली दाखविली होती. माता सरस्वती, माता पार्वती, माता गंगा, माता यमुना आदी देवीदेवतांचे जाणीवपूर्वक विकृत, नग्न व अश्लील चित्रण करून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा त्यांनी अपमान केला असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
अशा अपमानास्पद चित्रांच्या विरोधात हुसेनविरोधात देशभरात
१ हजार २५० हून अधिक पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. देशभरातही त्यांच्या प्रदर्शनांना विरोध झाला आणि अखेर हुसेन यांनी भारतातून पलायन करून कतारचे नागरिकत्व स्वीकारले होते. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव म्हणजे त्यांच्या आधीच्या राष्ट्रविरोधी व समाजविघातक कृत्यांना अप्रत्यक्षपणे समर्थन देणे होय. ‘कलात्मक स्वातंत्र्य’ या नावाखाली धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि देशविघातक व्यक्तींचे गौरव करणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही, असे समितीने या निवेदनात म्हटले आहे.
दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयाने हुसेन यांच्या प्रदर्शनातील चित्रे जप्त करण्याचे आदेश दिले असून त्याची चौकशी चालू आहे. यापूर्वी देशभरात हुसेन यांच्या अनेक चित्रप्रदर्शनांना विरोध झालेला आहे. ती प्रदर्शने रद्द झालेली आहे. हुसेनच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारही रद्द करण्यात आले आहेत. आणि त्यामुळे
हुसेन यांच्या चित्रांचा प्रस्तावित लिलाव व विक्री त्वरित थांबवावी
आणि त्यावर कायदेशीर बंदी घालावी. तसेच या चित्रांचे प्रदर्शन किंवा विक्री करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा कला दालनांवरही कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर - अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर
- अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. ६ जून
नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
परिषदेतर्फे व्यावसायिक नाट्य पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. गेली ५१ वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अनुराग कल्याण या संस्थेला विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात गोविंदायन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात संगीत शारदा संगीत संशय कल्लोळ संगीत मृच्छकटिक नाटकातील प्रवेश सादर होणार आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ जून रोजी दुपारी चार वाजता यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे होणार आहे. या सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची रविवारी बैठक - संमेलन स्थळ औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर की सातारा?
साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची रविवारी बैठक
- संमेलन स्थळ औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर की सातारा?
मुंबई, दि. ६ जून
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची बैठक येत्या रविवारी ८ जून रोजी पुण्यात होत आहे. या बैठकीत आगामी ९९ वेळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे घ्यायचे? त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
अलीकडेच नवी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आता तीन वर्षांसाठी पुण्यात आले आहे. त्यामुळे स्थळ निवड समितीची बैठक पुण्यात होणार असून बैठकीनंतर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर केले जाणार आहे.
९९ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी महामंडळाकडे सदानंद साहित्य मंडळ -औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी- सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत.
आळंदीजवळ पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट
आळंदीजवळ पशूवधगृहासाठी जागा आरक्षित
होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट
वारकरी आणि जागरूक हिंदु समाज आळंदी तीर्थक्षेत्राजवळ कोणत्याही परिस्थितीत पशूवधगृह होऊ देणार नाहीत; परंतु या क्षेत्रात पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असे मत, दैनिक सनातन प्रभातचे विशेष प्रतिनिधी प्रितम नाचणकर यांनी व्यक्त केले आहे.
नाचणकर यांनी लिहिलेला 'पुणे जिल्ह्यातील आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृहाचे आरक्षण : महाराष्ट्राने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता !'हा लेख ६ जून २०२५ च्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रकाशित झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १४ मे या दिवशी शहराचा सुधारित विकास आराखडा घोषित केला. प्रशासनाच्या संकेतस्थळावर हा आराखडा अधिकृतरित्या ठेवण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आळंदी तीर्थक्षेत्राच्या जवळ मोशी-डुडुळगावी या मार्गावर ३.७८ एकर जागा पशूवधगृहासाठी आरक्षित करण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष १९९५ मध्ये महानगरपालिका प्रशासनाने शहरात अन्य ठिकाणी पशूवधगृहासाठी जागा आरक्षित केली होती; मात्र नागरिकांच्या विरोधामुळे ते आरक्षण रहित करण्यात आले. सामाजिक समतोलासाठी समाजात पशूवधगृह आवश्यक असल्याची सूचना हरित लवादाकडून प्राप्त झाल्यावर यापूर्वीच्या आराखड्यात रहित केलेले पशूवधगृह महानगरपालिकेने आळंदी तीर्थक्षेत्राजवळ आरक्षित केले. ‘पशूवधगृह धार्मिक स्थळाजवळ असू नये’, हे तारतम्यही महानगरपालिकेच्या लक्षात न येणे आणि आळंदीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राजवळ त्यासाठी जागा आरक्षित करणे, ही प्रशासनाची अक्षम्य चूक असल्याचे नाचणकर यांनी या लेखात म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने हरकती मागवण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली. याविषयी समजताच वारकरी, धर्मप्रेमी हिंदु आणि सतर्क नागरिक महानगरपालिकेकडे निषेध नोंदवत आहेत. महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात राज्य सरकारचा थेट हस्तक्षेप नसला, तरी आळंदी तीर्थक्षेत्राजवळ पशूवधगृह आरक्षित झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष घालणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याविषयी स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते; मात्र तसे आढळले नाही
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी श्रीक्षेत्र आळंदी येथे जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थानाचे दायित्व असलेल्या ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी’ यांच्या विश्वस्तांची भेट घेतली. ‘आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृह होऊ नये, यासाठी त्यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे का ?’, याविषयी विचारणा केली; मात्र हे खेदाने सांगावे लागते, ‘या देवस्थानने साधे पत्रही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला पाठवण्याचा सोपस्कार केला नव्हता, अशी माहिती लेखात पुढे देण्यात आली आहे.
दरम्यान आळंदीक्षेत्राजवळ पशूवधगृहाच्या आरक्षणाचा निर्णय सरकारने रद्द केला नाही, तर सरकारला वारकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. वारकर्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका, असा इशारा वारकरी युवक संघाचे संस्थापक ह.भ.प. अनंत महाराज पाटेकर यांनी प्रशासन आणि सरकारला दिला आहे.
या लेखाची लिंक पुढीलप्रमाणे
https://tinyurl.com/4avty6bf
कल्याण येथे हिंदू अस्मिता एकत्रीकरण – हिंदू मंचतर्फे आयोजन
कल्याण येथे हिंदू अस्मिता एकत्रीकरण
– हिंदू मंचतर्फे आयोजन
कल्याण, दि. ६ जून
हिंदू मंचतर्फे शनिवार, ७ जून रोजी कल्याण येथे दुर्गाडी किल्ला विषयासंदर्भात हिंदू अस्मिता एकत्रीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
७ जून रोजी सकाळी सहा वाजता सर्व हिंदुत्ववादी संस्थां, संघटना, नागरिकांनी टिळक चौक, कल्याण (पश्चिम) येथे उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू मंचाचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी केले आहे.
किल्ले श्री दुर्गाडी आपल्या अस्मितेचा प्रश्न असून त्याबाबत आपण जागृत आहोत. गेली अनेक वर्षे एकत्र येऊन याबाबत संघर्ष करत असल्याचे हिंदू मंचचे म्हणणे आहे.
गुरुवार, ५ जून, २०२५
अयोध्येतील श्रीराम मंदिरात राम दरबारची प्रतिष्ठापना
अयोध्येतील श्रीराम मंदिरात
राम दरबारची प्रतिष्ठापना
अयोध्या, दि. ५ जून
अयोध्येतील श्रीराम मंदिरात गुरुवारी राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात अन्य साद देवळात विविध देवतांचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राम दरबारात श्रीराम, सीता, लक्ष्मण, शत्रुघ्न, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाची मूर्ती असून पहिल्या मजल्यावर राम दरबारची स्थापना करण्यात आली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.
या सोहळ्यात राम मंदिर परिसरात शेषावतार, भगवान शंकर, गणपती, मारुती, सूर्य, भगवती देवी आणि अन्नपूर्णा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण
इगतपुरी, दि. ५ जून
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ठाणे जिल्ह्यातील आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, शांताराम भोईर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार -कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार
-कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. ५ जून
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यात येतील, अशी घोषणा कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, उपाययोजना व सांगली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयासंदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, कृषी आयुक्त सूरज मांढरे यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतक-यांना याचा फायदा होईल. त्यांचा वेळ वाचून त्यांना सर्व कृषी माल विक्री व कृषीसाठी लागणा-या सर्व सहसाहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.’एक पीक एक गाव’ ही संकल्पना देखील विकसित करण्यासाठी विचाराधीन असल्याचेही कोकाटे म्हणाले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...