सोमवार, ९ जून, २०२५

शनिवारी डोंबिवलीत रंगणार चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव

शनिवारी डोंबिवलीत रंगणार चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव डोंबिवली, दि. ९ जून चतुरंग प्रतिष्ठान आयोजित चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव येत्या १४ जून रोजी डोंबिवलीत रंगणार आहे. या कार्यक्रमात म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत 'चतुरंग संगीत सन्मान' डॉ. पं. विद्याधर व्यास यांना तर 'चतुरंग संगीत शिष्यवृत्ती' अद्वैत केसकर यांना पं. अरुण कशाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय संगीत/ नाट्य संगीत गायिका आशा खाडिलकर यांच्या सत्तर वर्षपूर्ती निमित्ताने ‘आशाताई - एक सुरदासी’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. यात आशा खाडिलकर यांच्या सांगितिक कारकिर्दीचा आढावा घेण्यात येणार असून आशा खाडिलकर यांच्या कन्या वेदश्री खाडिलकर- ओक सहभागी होणार आहेत. त्यांना अनिरुद्ध गोसावी (संवादिनी), निषाद करलगीकर (तबला) हे संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन डॉ . समीरा गुजर - जोशी यांचे आहे. याच कार्यक्रमात अद्वैत केसकर यांचेही गायन होणार आहे. त्यांना निषाद चिंचोले (तबला), निनाद जोशी (संवादिनी) संगीतसाथ करणार आहेत.‌ हा कार्यक्रम दुपारी साडेचार ते नऊ या वेळेत सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे होणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: