गुरुवार, ५ जून, २०२५

'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत महाराष्ट्र १० कोटी वृक्ष लागवड- मुख्यमंत्री फडणवीस

'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत महाराष्ट्र १० कोटी वृक्ष लागवड- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई, दि. ५ जून 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत १० कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली, तरच ही मोहीम यशस्वी होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत फडणवीस बोलत होते. महाराष्ट्राने गेल्या आठ वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यापूर्वी ३३ कोटी व ५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करता येईल. वृक्ष लागवडीकडे लक्ष ठेवताना कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि रिमोट सेन्सिंग, उपग्रह आदी साधनांचाही वापर करावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली. वृक्षारोपण मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदांनी सहभाग घ्यावा आणि सामाजिक संस्थांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी या बैठकीला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: