रविवार, १५ जून, २०२५

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा; चबुतऱ्यालगतची जमीन खचली

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा; चबुतऱ्यालगतची जमीन खचली सिंधुदुर्ग, दि. १५ जून मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले असून, त्या ठिकाणी जमीन खोलवर खचल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने, चबुतरा आणि पुतळा भक्कम असून त्याला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. मात्र चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: