शुक्रवार, १३ जून, २०२५

हिंदू धर्म आणि देवतांवर श्रद्धा आहे त्यांनाच सेवेत घ्यावे-सनातन संस्थेची मागणी -शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुस्लिम कर्मचारी हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती कडून स्वागत मुंबई, दि. १३ जून हिंदूंची मंदिरे ही श्रद्धास्थाने असून ज्यांची हिंदू धर्म आणि देवता यांच्यावर श्रद्धा आहे,अशांनाच मंदिरसेवेत घ्यावे,अशी मागणी, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे. तर शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृतीनेही स्वागत केले आहे. केवळ शनिशिंगणापूरच नव्हे, तर सर्वच देवस्थानांनी ही भूमिका घेऊन सेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणीही वर्तक यांनी केली आहे. दरम्यान श्री शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले आहे. शासनाच्या नियंत्रणात असलेल्या अन्य देवस्थानांमध्येही अन्यधर्मीय कर्मचारी असतील तर त्यांची चौकशी करून त्यांनाही तत्काळ सेवामुक्त करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: