गुरुवार, ५ जून, २०२५

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार -कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार -कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे मुंबई, दि. ५ जून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यात येतील, अशी घोषणा कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, उपाययोजना व सांगली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयासंदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, कृषी आयुक्त सूरज मांढरे यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतक-यांना याचा फायदा होईल. त्यांचा वेळ वाचून त्यांना सर्व कृषी माल विक्री व कृषीसाठी लागणा-या सर्व सहसाहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.’एक पीक एक गाव’ ही संकल्पना देखील विकसित करण्यासाठी विचाराधीन असल्याचेही कोकाटे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: